भंडारा,
two jewelry shops broken into in pahela ज्वेलर्सचे दोन दुकाने फोडून जवळपास 13 लाखाचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना सप्टेंबरच्या पहाटे घडली. विशेष म्हणजे चोरट्यांनी एका दुकानातील गायब केल्याचे पुढे आले आहे. या घटनेनंतर स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पहाणी करीत आवश्यक त्या सूचना दिल्या.
वैष्णवी आणि दुर्गा ज्वेलर्स नावाची प्रतिष्ठाने आहेत. 5 सप्टेंबर च्या पहाटे तीन ते चार वाजता च्या दरम्यान या दोन्ही दुकानांवर अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला. दुकानांचे शटर वाकवून चोरी करण्यात आली. गणेश निनावे यांच्या वैष्णवी ज्वेलर्स दुकानातून जवळपास दीड किलो म्हणजेच अंदाजे तीन लाख 25 हजाराची चांदी चोरण्यात आली. भूषण निखारे यांच्या मालकीच्या दुर्गा ज्वेलर्स दुकानातून तीन किलो पाचशे ग्रॅम चांदी, 75 हजार रुपये नगदी आणि कागदपत्रे असलेली तिजोरी असा अंदाजे 9 लाख पन्नास हजाराचा माल लंपास करण्यात आला.
दोन्ही दुकान मिळून जवळपास 13 लाखाच्या चोरीची घटना आज सकाळी उघडकीस येताच, पोलीस प्रशासन ताबडतोब कारवाईला लागले. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पहेला येथील घटनास्थळी भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विशेष तपास पथकाचे अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. अड्याळ पोलिसांच्या हद्दीत घटना घडली असल्याने तपास अड्याळ पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. चोरट्यांनी तिजोरी पळविल्याने लोकांसाठी हा चर्चेचा विषय झाला असून, तिजोरी पळविण्याचे कारण काय यावर मत मतांतरे मांडली जात आहे.