हिंगणघाट,
dilip joshi शिक्षकांनी केवळ ज्ञान देणारे नव्हे तर विद्याथ्र्यांच्या जीवनाला दिशा देणारे चैतन्यमूर्ती बनावे असे आवाहन विद्यावाचस्पती प्रा. दिलीप जोशी यांनी केले. विद्या भारती विदर्भशी संलग्नित प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शिक्षकदिनाचे औचित्य साधून शिक्षकांसाठी आयोजित विशेष ‘उद्बोधन वर्ग’त बोलत आज ५ रोजी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव रमेश धारकर होते.
जोशी यांनी विद्या भारतीच्या कार्याचा व्यापक आवाका स्पष्ट करतानाच शिक्षक हा विद्याथ्र्यांपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचविणारा दीपस्तंभ असावा. शिक्षण क्षेत्रात अनेक अडचणी असल्या तरी संपूर्ण समाज शिक्षकांकडे आदराने पाहतो. त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत या क्षेत्रात आलो असलो, तरी विद्याथ्र्यांना आपले सर्वोत्तम योगदान देणे ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले.
चरित्र्यसंपन्न नागरिक घडविणे आणि ‘भारतात शिक्षण व शिक्षणात भारत’ ही संकल्पना साकार करणे. भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृती व जीवनमूल्यांचे दर्शन शिक्षण प्रक्रियेत घडविण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. ज्ञान आहे म्हणून शिक्षक होत नाही आणि सांगता येते म्हणूनही शिक्षक होत नाही; ग्रहण केलेले ज्ञान आचरणात आणून विद्याथ्र्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारा शिक्षक असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्व. अटलबिहारी वाजपेयी आणि स्व. मोरोपंत पिंगळे यांसारख्या प्रभावी वक्त्याांनीही भाषणापूर्वी सराव केला, याचा दाखला देत शिक्षकांनी सातत्याने अभ्यास व सराव करावा असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी शिक्षकाचे अनुकरण करीत असतो. त्यामुळे शिक्षकाचे वर्तन, विचार, आचार-विचार व सकारात्मक दृष्टिकोन हे विद्याथ्र्यांसाठी आदर्श असले पाहिजेत. शिक्षकांनीही काही मूल्याधिष्ठित पथ्ये पाळावे असा संदेश त्यांनी दिला. ‘ही माझी संस्था, हे माझे विद्यार्थी’ हा भाव मनात ठेवून अहंकार बाजूला सारत प्रत्येकाने आपले संपूर्ण योगदान द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
विद्या ही केवळ उपजीविकेचे साधन नसून माणसाला मुक्त करणारी, विनयशील बनविणारी आणि पात्रता निर्माण करणारी शक्ती आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला संजय देशपांडे यांच्यासह तालुयातील संस्थेंतर्गत चालवल्या जाणार्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.