आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांना शैक्षणिक मदत

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Agricos Welfare Society ॲग्रीकोज वेलफेअर सोसायटीतर्फे विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना वस्त्रवाटप तसेच त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. सीताबर्डी येथील अमृत भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला डॉ. शरद निंबाळकर, रवी बोरटकर, मनोहर चंद्रिकापुरे आणि बाबासाहेब कंगाले उपस्थित होते.
 

reva 
 
 
संस्थेतर्फे गेल्या ११ वर्षांपासून शेतकरी व आदिवासी घटकांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे डॉ. निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी विजय तपाडकर, अर्जुन घुगल, सुभाष पानसे, प्रमोद जोशी, राजेश कळमकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
सौजन्य:वीरेंद्र जोगी,संपर्क मित्र