काँग्रेसने बदलले सहा राज्यांचे प्रभारी

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
congress-state-inchargesकाँग्रेसने पक्षात संघटनात्मक फेरबदल करत सहा राज्यांचे प्रभारी बदलले आहे. अनेक नेत्यांना तात्काळ प्रभावाने नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. सचिन पायलट यांची पंजाबचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर भूपेश बघेल यांच्याकडे आसामची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, भूपेश बघेल यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव म्हणून आसामचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

rahul 
 
रणदीप सिंग सुरजेवाला यांची गुजरात, सचिन पायलट यांची पंजाब, सुखदेव भगत यांची छत्तीसगड, डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची महाराष्ट्र तर पी. व्ही. मोहन यांची आंध्र प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रणदीप सिंग सुरजेवाला यांना गुजरातसोबतच कर्नाटकचे प्रभारी महासचिव म्हणून अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. दरम्यान, पक्षाने मावळत्या प्रभारी महासचिवांच्या योगदानाचाही गौरव केला आहे. यात जितेंद्र सिंग, रमेश चेन्नीथला आणि मणिकम टागोर यांचा समावेश आहे. मात्र, मुकुल वासनिक यांना काँग्रेस समितीच्या महासचिवपदी कायम ठेवले आहे.