दिल्लीत पाच मजली इमारत अचानक कोसळली

ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
दिल्ली
delhi five-storey building collapses दिल्लीतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी शिव मंदिराजवळ पाच मजली इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले.
 
 

delhi five-storey building collapses in satya niketan, several feared trapped
मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये पीजी अर्थात पेइंग गेस्टची व्यवस्था कार्यरत होती. त्यामुळे इमारतीत अनेक विद्यार्थी उपस्थित असण्याची शक्यता असून, त्यापैकी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बचाव पथकाने आतापर्यंत दोन ते तीन जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश मिळवले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इमारत कोसळल्याची माहिती  delhi five-storey building collapses मिळताच स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्यात मदत करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इमारत अचानक कोसळल्याने घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला.सध्या अग्निशमन दल आणि बचाव पथकांकडून ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, या दुर्घटनेनंतर नेमके किती जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेची व्याप्ती आणि संभाव्य जीवितहानीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.