निकालस माऊलींचा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Itwari Nikalas Temple इतवारी येथील निकालस मंदिरात निकालस माऊलींचा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. पुण्यतिथीनिमित्त सकाळपासून माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
 

mauli 
 
 
यावेळी विठ्ठल-रुख्मिणी पूजन, माऊलींच्या गादीचे पूजन, अभिषेक व नामस्मरण करण्यात आले. माऊलींच्या जीवनकार्याचे तसेच त्यांनी दिलेल्या आध्यात्मिक व सामाजिक संदेशाचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन निकालस महाराज देवस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले.
सौजन्य:कल्पना वाराणशीवर,संपर्क मित्र