केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आणखी एक अटक

चेतन चौधरीचा मित्र रितेश हिंगे पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
पुणे

ketan agrawal murder case केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले असून पुणे पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. मुख्य आरोपी चेतन चौधरीचा मित्र रितेश हिंगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हिंगे हा कथित कटाचा भाग होता आणि केतनच्या हत्येच्या नियोजनाची त्याला आधीपासून माहिती होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून, हत्येच्या कटातील त्याची नेमकी भूमिका तसेच त्याच्याशी संबंधित अन्य व्यक्तींबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंगेला १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, या प्रकरणात त्याला सहआरोपी केले जाणार आहे.
 

ketan agrawal murder case pune police arrest ritesh hinge over alleged conspiracy 
केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाल्याचे सुरुवातीला मानले जात होते. त्यामुळे ही घटना अपघात असल्याचा प्राथमिक समज होता. मात्र, तपास पुढे गेल्यानंतर पोलिसांनी हा अपघात नसून हत्या असल्याचे निष्पन्न केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. जूनमध्ये मंगेतर आणि तिच्या कथित प्रियकराने केतनची हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन चौधरीचा वर्गमित्र असलेल्या रितेश हिंगेला केतनच्या हत्येबाबत आधीपासून माहिती होती. केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन जाऊन तेथील दरीत ढकलण्याचा कथित कट रचण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यामुळे हिंगेच्या अटकेनंतर या कथित कटातील महत्त्वाच्या कड्या जोडण्यास मदत होईल, अशी अपेक्षा तपास यंत्रणेला आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांच्या हत्येपूर्वी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी रितेश हिंगेसोबत हत्या कशी करायची आणि ती कशी अंमलात आणायची, याबाबत चर्चा केली होती. हत्येच्या दिवशी लोहगडला सोबत येण्यासाठी चेतन आणि सिया यांनी हिंगेला अनेकदा सांगितले होते; मात्र, त्याने त्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हत्येपूर्वी हिंगेला कथित कटाची माहिती होती, असा पोलिसांना संशय आहे.
तपासादरम्यान आणखी काही बाबी पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत. केतन अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर लगेचच चेतन चौधरीने हिंगेची भेट घेतल्याचे तपासातून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, सिया गोयलही हिंगेच्या संपर्कात होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या संपर्कांचा आणि त्याम