नागपूर,
Mahila Kala Niketan महिला कला निकेतन, गोरेपेठ येथे संस्थेची वार्षिक आमसभा ५ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली. अध्यक्ष प्रेरणा जामदार, सचिव अॅड. सुफला ताटके, कोषाध्यक्ष आरती आठवले, कार्यकारिणी सदस्य तसेच सर्वसाधारण सदस्य उपस्थित होते.सचिव अॅड. सुफला ताटके यांनी वार्षिक अहवाल, तर कोषाध्यक्ष आरती आठवले यांनी आर्थिक लेखापरीक्षण अहवाल सादर केला. दोन्ही अहवालांना सभेने एकमताने मंजुरी दिली. संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व सदस्यांनी विविध प्रकल्पांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन ताटके यांनी केले.
रा. से. समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी २७ वर्षे संस्थेत सेवा देऊन निवृत्त झालेल्या बालशिक्षिका लतिका बक्षी यांचा शांताक्का यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बक्षी यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला.लेखापरीक्षक सीए यश वर्मा यांनी लेखापरीक्षणातील बारकावे समजावून सांगितले. तसेच अॅड. अमृता सावजी, सीए यश वर्मा आणि डॉ. रश्मी देशकर यांच्या अनुक्रमे कायदेशीर, लेखापरीक्षण व वैद्यकीय सल्लागार म्हणून नियुक्तीस सभेने मान्यता दिली.
सौजन्य:सुफला ताटके,संपर्क मित्र