जिल्ह्यात १९ तीव्र तर ३२१ मध्यम कुपोषित बालके

४२ हजार ६३५ बालकांची तपासणी

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
वर्धा,
malnourished children जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी जुलै महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत तब्बल ४२ हजार ६३५ बालकांचे उंची व वजन मोजण्यात आले. या तपासणीदरम्यान जिल्ह्यात ३२१ बालके मध्यम तर १९ बालके तीव्र कुपोषित असल्याचे निदर्शनास आले आहे. तीव्र कुपोषित बालकांची संख्या तुलनेने कमी असली तरी या बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
 
malnourished children
 
महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. जुलै महिन्यातील मोहिमेत बालकांचे उंची व वजन घेऊन त्यांच्या पोषणस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. त्यातून ३२१ बालके मध्यम कुपोषित आढळली असून, त्यांचे प्रमाण ०.७५ टके आहे. याशिवाय १९ बालके तीव्र कुपोषित आढळली असून, त्यांचे प्रमाण ०.०४ टके इतके आहे.
 
 
तालुकानिहाय आकडेवारी पाहता समुद्रपूर तालुयात सर्वाधिक ७ तीव्र कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. कारंजा व हिंगणघाट तालुयात प्रत्येकी ४ बालके तीव्र कुपोषित आढळली आहे. आष्टी तालुयात २, तर देवळी आणि वर्धा तालुयात प्रत्येकी १ बालकाची नोंद करण्यात आली आहे. या आकडेवारीमुळे संबंधित तालुयांमध्ये कुपोषणाच्या समस्येवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यत केली जात आहे.
 
 
तीव्र कुपोषित बालकांना वेळेत उपचार, सकस आहार आणि आवश्यक पोषणमूल्य मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा बालकांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून त्यांच्या पोषणस्थितीत सुधारणा करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील १ हजार ४२२ अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्य व पोषणस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
 
जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांचे प्रमाण ०.०४ टके असले तरी एकही बालक कुपोषित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कुपोषणाचे प्रमाण आणखी कमी करून वर्धा जिल्हा कुपोषणमुत करण्याच्या दिशेने महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. त्यासाठी नियमित तपासणी, योग्य पोषण आहार आणि आवश्यक उपचारांच्या माध्यमातून कुपोषित बालकांना सर्वतोपरी मदत करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी दिली.