नागपूर
Navayug Primary School राजाबाक्षा येथील नवयुग प्राथमिक शाळेत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत अध्यापन, हजेरी आणि वर्गव्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण व जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गार्गी अभय घनोटे व देवयानी अतुल घनोटे यांनी विद्यार्थी-शिक्षकांचे वर्गनिहाय परीक्षण करून उत्कृष्ट विद्यार्थी-शिक्षकांची निवड केली. यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक अजय काळे यांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आनंद बुरडे व गिरीश डोये यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची तसेच शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाला प्रविण खणगन, किशोर पटोले, वसुधा जोशी, सुरेखा कामळे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन मितल ठाकरे व निलीमा चिकटे यांनी केले. शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य:अजय काळे,संपर्क मित्र