विद्यार्थ्यांनी घेतले शिक्षक दिनाचे धडे

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Teachers' Day ‘झेप यशाची’ कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांचे स्वयंशासन आयोजित करण्यात आले. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांचे अध्यापन केले.
 
 
nav
 
माधवराव उराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात डॉ. राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. नीलम कावळे यांनी स्वयंशासनाचे मूल्यमापन केले. यावेळी निवृत्त होत असलेले शिक्षक माधव तेलंग यांचा सत्कार करण्यात आला. प्रकल्प प्रमुख वीरेंद्र मल्होत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनीआयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अग्रिमा शेंदरे हिने केले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य :रोशनी नवघरे,संपर्क मित्र