बांधकाम विभागाकडे १४ हजार तक्रारी

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |

 

नागपूर
municipal-administration-negligent महानगरपालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग नागरिकांची कामे किती कार्यक्षमतेने करतो, हे समोर आले आहे. मनपाच्या अंतर्गत प्रणालीतून मिळालेल्या अंतिम एकत्रित अहवालानुसार विभागातील ७७ कर्मचाऱ्यांकडे एकूण १४,८०८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील केवळ ४१ टक्के कामेच वेळेत पूर्ण झाली असून, तब्बल २० टक्के कामांवर नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत तक्रारी पुन्हा उघडल्या आहेत.
 
nmc
मनपाने अलीकडेच वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम ही नवीन डिजिटल प्रणाली सुरू केली. नवीन प्रणालीमुळे पारदर्शकता येईल, असे सांगितले जात असले तरी, जुन्या तक्रारींचा अनुशेष किती मोठा आहे, हे या अहवालातून स्पष्ट होते.
 

आकडेवारीचा सविस्तर पंचनामा -

तपशील संख्या टक्केवारी

एकूण आलेल्या तक्रारी -१४,८०८

वेळेत पूर्ण - ६,११८ म्हणजे ४१.३१ टक्केच

उशिरा पूर्ण १,९७२, टक्केवारी १३.३१

पुन्हा उघडल्या - २,९७३ टक्केवारी २०.०७

वेळेत प्रलंबित ४८१ टक्केवारी ३.२४

मुदतीबाहेर प्रलंबित २१२ टक्केवारी १.४३

पुन्हा उघडून प्रगतिपथावर-१४३ टक्केवारी ०.९६

दुसऱ्या विभागाकडे वर्ग - ३५६ टक्केवारी २.४०

निधीची गरज- २६६ टक्केवारी १.७९

 

धक्कादायक निष्कर्ष
 
- कामाचा दर्जा निकृष्ट - २,९७३ तक्रारी -हा अहवालातील सर्वांत गंभीर मुद्दा आहे. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी २,९७३ कामे पूर्ण झाल्याचे प्रणालीत दाखवले. मात्र प्रत्यक्षात कामे अर्धवट, निकृष्ट दर्जाची किंवा केवळ कागदावरच पूर्ण असल्याने नागरिकांनी ती मान्य केली नाहीत आणि पुन्हा तक्रारी केल्या. म्हणजेच ५ पैकी १ काम नागरिकांना पसंतच पडले नाही.

-वेळेवर काम होतच नाही

१४,८०८ पैकी केवळ ६,११८ कामेच वेळेत झाली. १,९७२ कामे मुदतीनंतर पूर्ण झाली. अजूनही ४८१ + २१२ = ६९३ तक्रारी प्रलंबित आहेत. २१२ तक्रारी तर मुदत संपूनही महिनोमहिने प्रलंबित आहेत.

- जबाबदारी ढकलण्याचा प्रकार

३५६ तक्रारी दुसऱ्या विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत, तर २६६ तक्रारींमध्ये आर्थिक गुंतवणुकीची गरज असल्याचे कारण दाखवून त्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत
 
.झोननिहाय चित्र

- धरमपेठ झोन (वॉर्ड ३६) - २७५ तक्रारी

- धंतोली झोन (वॉर्ड ३५) - २२९ तक्रारी

- हनुमान नगर झोन (वॉर्ड ३४) - २०० तक्रारी

- लक्ष्मी नगर, गांधीबाग, सतरंजीपुरा येथेही तक्रारींचा आकडा १५० च्या वर आहे.