हसत खेळत मराठी’ उपक्रमाचा शुभारंभ

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
नागपूर,
AdyaBrahmavadini Foundation आद्यब्रह्मवादिनी फाउंडेशन नागपूरच्या वतीने दीनदयाळ नगर येथील श्री पांडुरंगेश्वर मंदिराच्या सभामंडपात ‘गुरुकुल-हसत खेळत मराठी’ या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी झाला. सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान दर रविवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. वृषाली शिलेदार यांच्या संकल्पनेतून आणि प्रमुख संचालिका जयश्री धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मराठी भाषा शिकताना विद्यार्थ्यांवरील दडपण कमी करून त्यांना खेळकर पद्धतीने मराठी बोलता व वापरता यावी, हा उपक्रमाचा उद्देश आहे.

devrav1 
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंगेश्वर शिवमंदिर मंडळाचे अध्यक्ष दिलीप कातरकर होते. यावेळी डॉ. वृषाली शिलेदार, डॉ. योगिता कस्तुरे, आरती महाजन, दीपक पथे, डॉ. मेघा जोशी व अरुंधती महाजन उपस्थित होत्या. संयोजिका डॉ. ज्योती शिवलकर यांनी उपक्रमाची माहिती दिली.दिलीप कातरकर यांनी मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन सीमा घिसाड यांनी केले. सुनीती मोहरील यांनी आभार मानले. या उपक्रमासाठी ९ ते १२ वयोगटातील ३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र