अफगाणिस्ताननंतर म्यानमारही हादरले...भूकंपांची मालिका

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
काबूल,
Afghanistan hit by earthquake भारताच्या शेजारी असलेल्या अफगाणिस्तानमध्ये सोमवारी पहाटे भूकंपाचा धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.१ इतकी नोंदवण्यात आली. पहाटे ५:३६ वाजता हा भूकंप झाला असून त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली तब्बल १३० किलोमीटर खोलीवर होता.भूकंपाची तीव्रता मध्यम स्वरूपाची असली तरी सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजीदेखील अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे दोन धक्के जाणवले होते. त्यामुळे या भागातील भूकंपीय हालचालींकडे लक्ष वेधले जात आहे.
 
 
35547
 
दरम्यान, सोमवारी पहाटे भारताचा आणखी एक शेजारी देश म्यानमारलाही भूकंपाचा धक्का बसला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, पहाटे २:५० वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९ होती. त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली ८९ किलोमीटर खोलीवर होता. याआधी बुधवारी नेपाळमध्येही भूकंपाची नोंद झाली होती. सायंकाळी ६:५९ वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता ३.८ इतकी होती, तर त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली २० किलोमीटर खोलीवर होता.