रस्ता की अपघाताचा सापळा ?

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Bhagwannagar Banerjee Layout भगवाननगर-बॅनर्जी लेआउट परिसरातील साहिल ड्रायव्हिंगजवळ रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक व मातीचा भाग अस्ताव्यस्त असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पाणी साचल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.

khda 
 
 
या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. विशेषतः रात्रीच्या वेळी अर्धवट रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून दुचाकी घसरण्याची शक्यता आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढण्याची भीती आहे.एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून खड्डे व असमतल भाग दुरुस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र