गडचिरोली
markandadev gadchiroli विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या मार्कंडा नगरीत वैनगंगा नदीच्या पवित्र तीरावर श्रावण सोमवारनिमित्त महागंगा आरतीचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण श्रावण महिन्यात दर सोमवारी महागंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या आरतीने या उपक्रमाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
वैनगंगेच्या तीरावर विधिवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपेंद्र कोठेकर, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसाकडे, रोशनी वरघंटे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. श्रावण महिन्यात दर सोमवारी झालेल्या या महागंगा आरतीमुळे मार्कंडा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी वैनगंगा नदीचे पूजन करून महाआरतीत सहभागी होत दर्शनाचा लाभ घेतला.