गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Durgadevi Temple, Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दुर्गादेवी मंदिर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. ९८ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.नगरसेविका माया हाडे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रभाग अध्यक्ष संजय देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. अरुंधती रंभाड यांनी मुख्य वक्ते डॉ. अविनाश कोकाटे यांचा परिचय करून दिला.
 
 
 
maya
 
 
डॉ. कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्ग दर्शन करत भविष्यातील करिअरसाठी ध्येय निश्चित करून मेहनत करण्याचे आवाहन केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव सुनील मित्रा, शहर महामंत्री व नगरसेवक रितेश गावंडे, त्रिमूर्तीनगर मंडळ अध्यक्ष व नगरसेवक ईश्वर ढेंगळे यांच्यासह अमोल श्यामकुळे, लहुकुमार बेहते, मीनाक्षी तेलगोटे, शेखर भागवत, अश्विनी सावदेकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. खेरगडे यांनी आभार मानले.
सौजन्य :माया हाडे,संपर्क मित्र