आरमोरी
educationist honored पूर्व विदर्भातील उत्कृष्ट संस्था चालक म्हणून आरमोरी येथील श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे यांचा पुरस्कार देऊन चंद्रपूर येथे सन्मान करण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, गोविंदराव वंजारी फाउंडेशन तसेच गोविंद मैना फाउंडेशन चंद्रपूर यांच्यावतीने सन्मान कर्तुत्वाचा उत्कृष्ट शिक्षक सन्मान सोहळा तसेच उत्कृष्ट संस्थाचालक सन्मान सोहळा प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे रविवारी उत्साहात पार पडला. यावेळी हा सन्मान पार पडला.
चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ज्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा सुरू ठेवली असे आरमोरी येथील श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच संताजी समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा अंबाबाई शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे यांना यावर्षीचा उत्कृष्ट संस्थाचालक म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारून उत्तर देताना भाग्यवान खोब्रागडे म्हणाले, आपण शिक्षणाचे कार्य हे अविरतपणे सुरू ठेवलेले असून समाजातल्या अगदी शेवटच्या घटकापर्यंतचे शिक्षण हे मोफत व दर्जेदार कसे मिळेल आणि त्या माध्यमातून भविष्यातील पिढी उत्तमपणे कसे निर्माण होईल यासाठी आपले प्रयत्न अहोरात्र सुरू आहे आणि यापुढेही सुरू राहील.
खोब्रागडे यांना यावर्षीचा उत्कृष्ट संस्था चालक पुरस्कार मिळाल्याबद्दल आरमोरी शहरातील अनेक प्रतिष्ठित मंडळी तसेच सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.