चंद्रपूर
fire-at-district-bank चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजुरा शाखेत रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. मात्र, बँक प्रशासनाने पूर्वनियोजित केलेल्या सुरक्षा व्यवस्थेसह वेळोवेळी करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून, सुदैवाने कोणतीही जीवित अथवा मोठी आर्थिक हानी झाली नाही.
रविवारी रात्रीच्या सुमारास राजुरा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा सक्रिय झाली. बँकेच्या शाखेत करण्यात आलेल्या तांत्रिक सुरक्षा उपाययोजना आणि पूर्वनियोजित सुरक्षा नियोजनामुळे आगीचा धोका वेळीच नियंत्रित करण्यात आला. यावेळी राजुरा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागासह पोलिस विभागाचेही सहकार्य लाभले.
घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी सोमवारला पहाटे 4 वाजताच राजुरा शाखेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकार्यांकडून घटनेची माहिती घेत आवश्यक त्या सूचना केल्या. त्यानंतर सकाळी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, राजुरा विभागीय कर्ज समिती अध्यक्ष उल्हास करपे, संचालक विजय बावणे, संचालक तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनीही राजुरा शाखेला भेट देऊन पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला.
घटनेनंतर आवश्यक ती पाहणी, तपासणी व सुरक्षेच्या उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर सोमवारला सकाळपासून राजुरा शाखेतील बँकेचे नियमित कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. ग्राहकांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी बँक प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही केली.
सर्व शाखांमध्ये तांत्रिक सुरक्षा
जिल्हा बँक प्रशासनाने आपल्या सर्व शाखांमध्ये तांत्रिक सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. तसेच शाखांचे सेफ्टी ऑडिट करण्यात आलेले आहे. त्यामुळे राजुरा शाखेतील आग मोठ्या नुकसानीत रूपांतरित होण्यापूर्वीच नियंत्रणात आणता आली. या पूर्वतयारीचा फायदा या घटनेत प्रकर्षाने जाणवला.दरम्यान, बँक प्रशासनाने बँकेच्या सुरक्षेसाठी विमा संरक्षणही घेतलेले आहे. त्यामुळे अशा आकस्मिक घटनांमध्ये संस्थेच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्याच्या दृष्टीनेही बँकेने आवश्यक खबरदारी घेतल्याचे स्पष्ट झाले.
Fire at District Bank's Rajura Branch Due to Short Circuit
Safety Systems Avert Major Disaster; Ravindra Shinde Reviews the Situation
Chandrapur
A fire broke out suddenly at the Rajura branch of the Chandrapur District Central Cooperative Bank during the night, caused by a short circuit. However, thanks to the safety measures pre-planned by the bank administration and the periodic safety audits conducted, the fire was brought under control in time. Consequently, a major disaster was averted; fortunately, there was no loss of life or significant financial damage.