राजकीय देणग्या; कर सवलतीचा फंडा

अमान्यताप्राप्त पक्षांना मिळाला १,५०० कोटींपेक्षा जास्त निधी

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली/अहमदाबाद, 
gujarat-political-donationsराजकीय देणग्यांसंदर्भात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुजरातमधील सहा नोंदणीकृत परंतु अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना २०२२-२३ या आर्थिक वर्षात तब्बल १,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या आहेत. या पक्षांना मिळालेली एकूण देणगी ही भाजपा वगळता इतर सर्व राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकत्रित देणगीपेक्षा जास्त आहे.
या सहा पक्षांमध्ये सत्यवादी रक्षक पार्टी, आम जनमत पार्टी, गरीब कल्याण पार्टी, स्वतंत्र अभिव्यक्ती पार्टी, भारतीय नॅशनल जनता दल आणि न्यू इंडिया युनायटेड पार्टी यांचा समावेश आहे. या सर्वांची मुख्यालये गुजरातमध्ये आहेत. यापैकी पाच पक्ष अहमदाबादमध्ये आणि एक आनंदमध्ये नोंदणीकृत आहे.
 
gujurat
आम जनमत पक्षाला मिळाली ६२० कोटींची देणगी
अहवालानुसार, आम जनमत पक्षाला २०२२-२३ मध्ये सुमारे ६२० कोटी रुपयांची सर्वाधिक देणगी मिळाली. सत्यवादी रक्षक पक्षाला ३३० कोटी, न्यू इंडिया युनायटेड पक्षाला २०० कोटी आणि गरीब कल्याण पक्षाला १३८ कोटी रुपये मिळाले. इतर दोन पक्षांनाही भरीव रक्कम मिळाली. तथापि, या सहा पक्षांनी मिळून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केवळ १५ उमेदवार उभे केले. याचा अर्थ, कोट्यवधींच्या देणग्यांच्या तुलनेत त्यांची निवडणूक उपस्थिती अत्यंत कमी होती.
३३० कोटी मिळाले; एकच उमेदवार रिंगणात
सत्यवादी रक्षक पक्षाचे प्रकरण विशेष चर्चेत आले आहे. २०२२-२३ मध्ये सुमारे ८५ कोटी रुपयांची देणगी मिळाल्यानंत, पुढील आर्थिक वर्षात ही रक्कम ३३० कोटी रुपयांपर्यंत पाेहाेचली. असे असूनही, पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केवळ एकच उमेदवार उभा केला. निवडणूक प्रचारावर सुमारे ८ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा पक्षाने केला आहे. सामाजिक कार्य किंवा धर्मादाय कार्यावर अंदाजे ३१६ कोटी रुपये खर्च केल्याचे अहवालात नमूद आहे.