जन्माष्टमी व दहीहंडी उत्साहात

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Institute of Indian Services भारतीय सेवा संस्थान, विदर्भ प्रदेशद्वारा संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विजयनगर, कळमना येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी साजरी करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा तसेच विविध पात्रांची आकर्षक वेशभूषा धारण केली होती. ‘हाथी घोडा पालखी, जय कन्हैयालाल की’च्या जयघोषात विद्यार्थ्यांनी परिसरातून मिरवणूक काढली. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला.
 
21234
 
 
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव कृष्णदास गुप्ता, समाजसेविका सीमा अग्रवाल, पियुष अग्रवाल, कपिल बन्साली व अंकित अग्रवाल उपस्थित होते. मान्यवरांनी जन्माष्टमी व दहीहंडीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.मुख्याध्यापिका विद्या बानबले यांच्यासह किरण राठोड, सपना जनबंधू, मनीषा कारवाटकर, श्वेता तिजारे व वैशाली घारपेंडे यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. गोपालकाला व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. परिसरातील नागरिक, पालक व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
सौजन्य :सतीश देशपांडे,संपर्क मित्र
    
दीनदयाळ नगरात दहीहंडी उत्साहात
नागपूर :
दीनदयाळ नगरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. दीनदयाळ सायं शाखा, राष्ट्र सेविका समितीच्या वैष्णवी शाखा आणि पांडुरंगेश्वर शिव मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्सवात बालगोपाल व गोपिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.नगरातील चार-पाच ठिकाणी दहीहंडी बांधण्यात आली होती. बालगोपालांनी हंडी फोडण्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे काही चिमुकले बालगोपाल घरून ढोलकी घेऊन आले होते. त्यांच्या ढोलकीच्या तालामुळे उत्सवाचा उत्साह अधिकच वाढला.बालगोपालांच्या आनंदात पालकांसह परिसरातील कुटुंबांनीही सहभागी होत उत्सवाचा आनंद घेतला. कलाश्री फाउंडेशनचे कलाकार व कार्यकारी मंडळानेही उपस्थित राहून बालगोपालांचा उत्साह वाढविला.
 

dhi 
 
 
 
सौजन्य :विकास देशपांडे ,संपर्क मित्र