मुंबई,
maharashtra-rain-alertराज्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरीप हंगामावर संकट ओढावले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. गणरायांच्या आगमनासोबतच पावसाचेही आगमन होणार आहे. १३ ते १८ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकणातही पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे़.
दरम्यान, हवामान विभागाने सात सप्टेंबर राेजी देशातील तब्बल २२ राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे़ यादरम्यान, ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही आहे.