आता एमपी टीईटी परीक्षा होणार ऑनलाइन आणि ऑफलाइन

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
भोपाळ, 
mp-tet-online-offlineमध्य प्रदेशात आता शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेतली जाईल. शिक्षक दिनानिमित्त भोपाळ येथे आयोजित राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ही घोषणा केली. सरकारच्या मते, या निर्णयामुळे उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होतील आणि शिक्षकांच्या आव्हानांना सामोरे जाण्यासही मदत होईल.

mp 
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर, मध्य प्रदेश शालेय शिक्षण विभागाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दोन्ही पद्धतींनी टीईटी घेण्याच्या शक्यतेवर भाष्य केले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. या दिशेने, टीईटी परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यांनी सांगितले की, सरकार शिक्षकांच्या मेहनतीचा आदर करते आणि त्यांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक निर्णय घेत आहे. मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, टीईटी परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार घेतली जात आहे, मात्र दोन्ही पद्धतींनी परीक्षा केव्हा आणि कशी घेतली जाईल याचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.