मुकेश फॅन्सची स्वरांजली !

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Mukesh Chandra Mathur सुप्रसिद्ध पार्श्वगायक स्व. मुकेशचंद्र माथुर यांच्या ५०व्या स्मृतिदिनानिमित्त स्थानिक मुकेश फॅन्सच्या गायक-कलावंतांनी ‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’ या संगीत रजनीतून भावपूर्ण स्वरांजली अर्पण केली. संघ बिल्डिंग रोड, महाल येथील कार्तिक सभागृहात हा कार्यक्रम झाला.
 

gjendr 
 
 
‘ज्योत से ज्योत जगाते चलो’ या गीताने गजेंद्र डोळके यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर ‘दीवानोंसे मत पूछो’, ‘किसी के मुस्कुराहटों पे’, ‘संसार है एक नदिया’, ‘चंदन सा बदन’, ‘सावन का महीना’, ‘चांद सी महबूबा हो मेरी’, ‘दिल की नजर से’, ‘चांदी की दीवार ना तोड़ी’, ‘हम तो तेरे आशिक हैं’ यांसह मुकेश यांच्या गाजलेल्या २७ एकल व द्वंद्वगीतांचे सादरीकरण करण्यात आले. गायक-कलावंतांच्या हळव्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन ॲड. अर्चना (भक्ता) डोळके यांचे होते. यावेळी मुकेश फॅन्सच्या वतीने राजेंद्र चांद्रयण यांना पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. प्रविण मुदलियार यांनी दर्जेदार ध्वनीव्यवस्था सांभाळली.
सौजन्य: गजेंद्र डोळके,संपर्क मित्र