nagpur-pune-nagpur-express मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील हडपसर-पुणे-घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स विभागातील तिसऱ्या मार्गाच्या कमिशनिंगसाठी पुणे आणि हडपसर यार्ड येथे प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात नागपूर-पुणे-नागपूर एक्सप्रेस एक दिवसासाठी रद्द करण्यात आली आहे. यासह काही गाड्यांच्या मार्गात बदल आणि समाप्ती व प्रस्थान ठिकाणात बदल करण्यात आले.
दरम्यान, रेल्वेगाडी क्रमांक १२२२१ पुणे-हावडा एक्सप्रेस १९ सप्टेंबर व ३ ऑक्टोबरला आणि रेल्वेगाडी क्रमांक १२१३५ पुणे-नागपूर एक्सप्रेस २० सप्टेंबर रोजी लोणावळा-कर्जत-पनवेल-कल्याण-इगतपुरी-मनमाडमार्गे धावणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक १२२२२ हावडा-पुणे एक्सप्रेस ३ ऑक्टोबर रोजी मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-कर्जत-लोणावळामार्गे चालविण्यात येणार आहे. यासह रेल्वेगाडी क्रमांक २२८४६ हटिया-पुणे एक्सप्रेेस २ ऑक्टोबरला दौंड स्थानकावर समाप्त होईल, तर २२८४५ पुणे-हटिया एक्सप्रेस ४ ऑक्टोबर रोजी दौंड स्थानकावरून प्रस्थान करेल. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे आणि प्रवासापूर्वी संबंधित रेल्वेगाडीची परिचालन स्थिती तपासून घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.