शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
नागपूर ,
Navayug Primary School राजाबाक्षा येथील नवयुग प्राथमिक शाळेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गजानन पिलपीले होते. प्रमुख अतिथी रवींद्र देशपांडे, मंडळाचे कार्यवाह उपेंद्र जोशी, सहकार्यवाह ऋचा हळदे, मुख्याध्यापक अजय काळे, शिक्षकवर्ग व पालक उपस्थित होते. दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
 
kale
 
 
यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशात त्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले.सूत्रसंचालन गौरव शिंदे यांनी केले, तर आभार राजेश सिर्तावार यांनी मानले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य :अजय काळे,संपर्क मित्र