मुंबई
preity zinta अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या तिच्या एका व्हिडीओमध्ये तिने परिधान केलेल्या काळ्या रंगाच्या टी-शर्टवर ‘टीम तुकाराम मुंढे’ असा मजकूर लिहिलेला दिसत आहे. त्यामुळे प्रिती झिंटाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, तुकाराम मुंढे यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या या अनोख्या अंदाजाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये प्रिती झिंटा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. काळ्या रंगाचा टी-शर्ट, निळी जीन्स आणि स्पोर्ट्स शूज असा साधा मात्र स्टायलिश पेहराव तिने केला आहे. तिच्या या लूकपेक्षा टी-शर्टवरील ‘टीम तुकाराम मुंढे’ या मजकुरानेच सर्वांचे लक्ष वेधले. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडीओची विशेष चर्चा सुरू झाली आहे.
तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक शिस्तीसाठी तसेच कामाच्या बाबतीत स्पष्ट आणि ठाम भूमिकेसाठी ओळखले जातात. प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे ते सातत्याने चर्चेत राहिले आहेत. सध्या महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनातील त्यांच्या कामामुळेही त्यांची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
आपल्या कामगिरीमुळे तुकाराम मुंढे सर्वसामान्य नागरिकांमध्येच नव्हे, तर सेलिब्रिटींमध्येही लोकप्रिय ठरत आहेत. विविध सेलिब्रिटींकडून त्यांच्या कामाला पाठिंबा आणि कौतुक मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता प्रिती झिंटाने ‘टीम तुकाराम मुंढे’ असा मजकूर असलेला टी-शर्ट परिधान करून त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविल्याचे स्पष्ट होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
याआधी सलमान खान आणि preity zinta ट्विंकल खन्ना यांसारख्या सेलिब्रिटींनीही तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीचे कौतुक केले होते. त्यानंतर आता प्रिती झिंटाचा हा व्हिडीओ समोर आल्याने त्याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असून, प्रिती झिंटाच्या ‘टीम तुकाराम मुंढे’ या टी-शर्टने नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.