रामनामात रंगला श्रावण !

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
नागपूर,
Ramdaspeth Kirtan Ceremony रामदासपेठेत नऊ दिवसीय कीर्तन सोहळा कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.‘अवसर बार बार नहीं आवे’ या पूर्वरंगातील पदाने कीर्तनाची सुरुवात झाली. भगवान श्रीकृष्णाच्या लीला, विविध संत-महात्मे तसेच राजे-महाराजांच्या कथा आणि संतवचनांच्या माध्यमातून बुवांनी भक्तांना आध्यात्मिक विचारांची मेजवानी दिली. कृष्णजन्माचे रेखीव वर्णन तसेच कृष्णाच्या बाललीलांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.

pallvi 
 
 
हार्मोनियमवर आनंद घोटकर व तबल्यावर दिलीप लोणारे यांनी सुरेख साथसंगत केली. अशोक पत्की, शोभा आपटे यांच्यासह देवस्थानाच्या कार्यकारिणीने कार्यक्रमाचे नियोजन केले. गोपालकाल्याने या नऊ दिवसीय कीर्तन सोहळ्याची सांगता झाली.
सौजन्य:आशिष नाईक,संपर्क मित्र