पुलगाव
rasta-roko-protest पुलगाव-शिरपूर रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेमुळे संतप्त झालेल्या परिसरातील सुमारे २० ते २५ गावांतील नागरिकांनी आज ७ रोजी नाचनगाव चौफलीवर रस्ता रोको आंदोलन केले. आता डागडुजी नको, नवीन रस्ताच हवा अशी मागणी पुलगाव-शिरपूर रोड कृती समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली.
६० ते ७० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. केवळ खड्डे बुजवणे आणि तात्पुरती डागडुजी करण्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून या रस्त्यामुळे अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले. यापूर्वी विविध राजकीय पक्ष व संघटनांनी वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर सर्वपक्षीय ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. ८ सप्टेंबरपासून वार्षिक देखभाल व दुरुस्ती अंतर्गत डांबरी पॅचेस बुजवण्याचे काम सुरू केले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले.
आंदोलनात कृउबाचे सभापती मनोज वसू, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष छोटू चांदूरकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विलास मुत्तेलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकत्र्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.