ज्ञानेश्वर काळे शिक्षक पुरस्काराने सन्मानीत

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
देवळी
teachers-award शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवळी येथील स्व. रावसाहेब निवासी मतिमंद विद्यालयाचे विशेष शिक्षक ज्ञानेश्वर काळे यांचा राज्यस्तरीय विशेष शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला.

teacher award 
विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची व सेवाभावी योगदानाची दखल घेत काळे यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्यातून केवळ पाच विशेष शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये ज्ञानेश्वर काळे यांचा समावेश आहे.
 
काळे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, समाज कल्याण विभागाच्या सहायक सल्लागार सोनाली शिंदे, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी प्रतिभा भागवतकर, संस्थेचे अध्यक्ष यादव सूर्यवंशी यांनी अभिनंदन केले.