कामगार प्रशिक्षण केंद्र उभारणार

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
 नागपूर,
Workers' Training Centre एनएमसी एम्प्लॉईज युनियन, मनपा ठेकेदार-कामगार संघटना, मनपा ऐवजदार कामगार संघटना आणि मनपा अस्थायी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित कामगार प्रशिक्षण केंद्राच्या छायाचित्र फ्रेम व सचित्र विवरणिकेचे विमोचन परवाना भवन सभागृहात झाले.
 

prabhu 
 
 
यावेळी अप्पर कामगार आयुक्त क. वि. दहीफळकर, कामगार नेते भाई जम्मू आनंद, प्रबंधक विश्वस्त डी. एस. बुचे, सनदी लेखापाल तजेंदर सिंग रावल, वास्तुशिल्पकार प्रिया चौधरी व शुभम चौधरी उपस्थित होते. महापौर निता ठाकरे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.नागपूर-काटोल मार्गावरील चारगाव येथे संस्थेच्या जागेवर कामगार-कर्मचारी आवासीय, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातूनअसंघटित कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचा या केंद्राचा उद्देश आहे. सूत्रसंचालन अनिल हजारे यांनी केले, तर आभार किरण ठाकरे यांनी मानले.
सौजन्य:प्रभुदास रामटेके ,संपर्क मित्र