अल्गोरिदमवर बंदी, सोशल मीडियाच्या दादागिरीला चाप

तुम्ही काय पाहायचं हे आता इन्स्टाग्राम-fb ठरवणार नाही

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली
ban-on-algorithm सोशल मीडियावर तुम्हाला नेमके काय दिसणार आणि काय दिसणार नाही, हे बहुतांश वेळा प्लॅटफॉर्मचे अल्गोरिदम ठरवतात. तुम्ही फेसबूक, instagrram आणि tiktok वर कोणता व्हिडिओ पाहता, कोणत्या पोस्टला लाईक करता आणि कोणत्या कंटेंटवर जास्त वेळ घालवता यावर आधारित पुढचा कंटेंट तुमच्या फीडमध्ये दाखवला जातो. मात्र आता ऑस्ट्रेलिया सरकार या व्यवस्थेवर लगाम घालण्याच्या तयारीत आहे.
 
ban
ऑस्ट्रेलिया सरकार सोशल मीडिया कंपन्यांच्या कंटेंट रिकमेंडेशन सिस्टममध्ये मोठा बदल करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. प्रस्तावित नियम लागू झाल्यास फेसबूक, instagrram आणि tiktok सारख्या प्लॅटफॉर्मवर यूजर्सना कंटेंट दाखवण्याची सध्याची पद्धत बदलू शकते.
ऑस्ट्रेलिया सरकार सोशल मीडिया फीडवर यूजरचे नियंत्रण वाढवण्याच्या उद्देशाने my feed, my way या संकल्पनेवर आधारित नियम आणण्याच्या तयारीत आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूजरच्या ऑनलाइन वर्तनाचा अभ्यास करून त्याला आवडू शकणारा कंटेंट सतत दाखवतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने एका विशिष्ट विषयाचा व्हिडिओ पाहिला तर त्याच विषयाशी संबंधित अनेक व्हिडिओ त्याच्या फीडमध्ये दिसू लागतात. प्रस्तावित बदलांमुळे या पर्सनलाइज्ड अल्गोरिदमवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
सोशल मीडिया अल्गोरिदम नेमकं काम कसं करतं?
तुम्ही instagram वर एखादा व्हिडिओ पाहिला, त्यावर लाईक केले किंवा तो काही सेकंद जास्त वेळ पाहिला तर प्लॅटफॉर्मला तुमची त्या प्रकारच्या कंटेंटमध्ये रुची असल्याचे संकेत मिळतात. यानंतर त्याच धाटणीचे आणखी व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये येऊ लागतात. याचप्रमाणे तुम्ही facebook वर एखाद्या विषयावरील पोस्टवर जास्त वेळ घालवला किंवा ढळज्ञढेज्ञवर एखाद्या प्रकारचे व्हिडिओ वारंवार पाहिले तर प्लॅटफॉर्मचा अल्गोरिदम तुमच्या आवडीनुसार फीड तयार करतो. यामुळे यूजरला आवडणारा कंटेंट सतत समोर येतो आणि तो अधिकाधिक वेळ सोशल मीडिया वापरण्याची शक्यता वाढते.
अल्गोरिदमवर निर्बंध आले तर काय बदलेल?
जर ऑस्ट्रेलिया सरकारची योजना लागू झाली आणि पर्सनलाइज्ड रिकमेंडेशन सिस्टमवर निर्बंध आले तर सोशल मीडिया फीड दाखवण्याची पद्धत बदलू शकते.