वाशीम,
washim district ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडी ही पिके शेतकर्यांच्या हातून गेली आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकर्यांनी पेरणीपासून आतापर्यंत बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत व मजुरीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र उत्पादनात मोठी घट होण्याची शयता असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे वाशीम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वाशीम जिल्हा काँग्रेस कमिटी चे वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वाशीम जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना हेटरी ७५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, खरीप हंगामातील सोयाबीन व इतर पिकांचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी व विम्याची रक्कम शेतकर्यांना तातडीने मिळवून द्यावी, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसेच शेतकर्यांकडून कर्जवसुलीस स्थगिती देण्यात यावी, नवीन स्मार्ट मीटर बसविणे बंद करावे, सक्तीने बसवू नये, शेतकर्यांना वीज पुरवठा दिवसा करण्यात यावा, राज्यभर उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात. सार्वजनिक जनगणनेमध्ये ओबीसी चा स्वतंत्र उल्लेख करण्यात यावा या इतर मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देतांना काँग्रेस कमिटीचे वाशीम जिल्हाध्यक्ष राजू चौधरी, प्रदेश सरचिटणीस अॅड. दिलीप सरनाईक, मधुकर जुमडे, किसनराव मस्के, दिलीप देशमुख, गजानन आमदाबादकर, विजय देशमुख, रामनाथ राठोड, सय्यद आजम, उज्वल देशमुख, सुरेश रत्नपारखी, राजू जानीवाले, रामेश्वर देवकर, शेख नजीर, प्रल्हाद बाजड, मीना वाठोरे, सुजाता वाठोरे, अनिल धुळे, स्वप्निल वाघ, सय्यद याकूब, सुरेश चौधरी, विनोद पडघान, दिनेश चौधरी, विठ्ठल वानखेडे आदींची उपस्थिती होती.