गडचिरोली,
shravan month विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडा देव येथे श्रावण मास समाप्तीनिमित्त सोमवारी रामप्रसाद महाराज जयस्वाल मराठा धर्मशाळा, मार्कंडा देव आणि महेश काबरा मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मार्कंडा नगरीतील तसेच जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. महेश काबरा मित्र परिवाराच्या वतीने तब्बल दोन हजार भाविकांना पारंपरिक पद्धतीने भोजनदान करण्यात आले. श्रावण महिन्यात भगवान मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांच्यासाठी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून धार्मिक परंपरेसोबतच सेवाभाव जपण्याचा संदेश देण्यात आला.

महाप्रसादाच्या आयोजनात धर्मशाळा ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी तसेच काबरा मित्र परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोविंद राठी यांनी महाप्रसादाच्या आयोजनाकडे जातीने लक्ष देत भाविकांना महाप्रसादाचा सुरळीतपणे लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून संपूर्ण आयोजनाला सहकार्य मिळाले. यावेळी धर्मशाळा ट्रस्टचे पदाधिकारी गंगाधर कोंडूकवार , अशोककुमार तिवारी, प्रमोद वायलालवार , गोपाल महाराज रणदिवे , केशव आंबटवार,राजेश सुरावार , मनोहर बोदलवार, महेश काबरा, लक्ष्मीकांत गिरडकर, प्रकाश कापकर , जयराम चलाख आदी तसेच उमेश काबरा, नंदकिशोर काथवटे, सुरज शर्मा उपस्थित होते.