आमदार निवासाजवळ गुन्हेगाराची हत्या

हप्ता देण्यास नकार दिल्याचे कारण

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,


nagpur crime पानठेला चालवायचा असेल तर हप्ता द्यावा लागेल, अन्यथा ठार करु, अशी धमकी दिल्यानंतरही पानठेलाचालक हप्ता देण्यास तयार नव्हता. त्यामुळे एका गुन्हेगाराच्या टोळीने पानठेलाचकाचा खून केला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास आमदार निवासासमोर घडली. आकाश सुरेश नेवारे (२५, तेलंगखेडी, गोंडटोली) असे मृताचे नाव आहे. या हत्याकांडात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
 

nagpur murder news, nagpur crime news today, pan shop owner murdered in nagpur, aamdar nivas murder nagpur, extortion murder in nagpur, aakash nevare murder case, sitabardi police nagpur, nagpur pan shop murder, four accused arrested nagpur, nagpur latest crime news, maharashtra murder news, extortion case nagpur, nagpur police crime news, pan shop owner killing, crime near aamdar nivas 
तेलंगखेडीच्या गोंडटोलीत राहणारा आकाश गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. तो रविनगर चौकात एमएच ४० नावाने पानठेला चालवत होता. आरोपी विशाल उर्फ बब्बू उर्फ काल्या शालिकराम चचाणे (वय २९,रा. रामनगर,तेलंगखेडी), रंजीत उर्फ रंजू गोपाल महतो (वय २५ , सुदामनगरी, हिलटॉप), पीयूष उर्फ पेढा विनोद बघेल (३१, रा. रामनगर अंबाझरी) आणि मृणाल भोला दिवाण (वय २३, रा. दामु कनेरे गल्ली, रामनगर) हे आकाशचे गुन्हेगारी क्षेत्रातील मित्र आहेत. आकाश आणि आरोपी हे पूर्वी सोबतच राहायचे. जुगार अड्डा, दारू आणि वसुलीच्या रकमेतून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांच्यात खटकेही उडत होते. आकाशने पानठेला लावला होता. त्यातून त्याची बरीच कमाई होती. त्यामुळे आरोपींनी दरमहिन्याला हप्ता द्यावे लागेल, अन्यथा ठार मारु, अशी धमकी दिली होती. मात्र, आकाशने हप्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी त्याचा काटा काढण्याचा कट रचला. रविवारी मध्यरात्री आरोपी धरमेपठेतील किंग बारमध्ये दारू पिले. तेथून दारूच्या बाटल्या घेऊन पुन्हा आमदार निवासाजवळच्या एका गल्लीत दारू पिण्यासाठी गेले. तेथे आकाश याला हप्ता न दिल्याच्या कारणावरुन मारहाण केली. त्यानंतर चाकूने भोसकून त्याचा खून केला. ही घटना घडल्यानंतर बराच वेळ सिताबर्डी पोलिस घटनास्थळावर पोहचले नाही. त्यामुळे अशा गंभीर घटनांमध्ये पोलिस तत्परता दाखवत नसल्याचे दिसले. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

चार आरोपींना अटक
सोमवारी सकाळी ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात दहशत निर्माण झाली. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा छडा लावण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्यांनाही या घटनेबाबत विचारणा केली असता आरोपी विशाल चचाणे, पीयुष बघेल, रंजित महतो, मृणाल दिवाण यांना अटक केली. या गुन्ह्यात आरोपी म्हणून सचिन आणि अंकूर यांचीही नावे चर्चेत होती. ठाणेदार सुहास राऊत यांनी हत्याकांडाबाबत माहिती देण्यास बराच वेळ टाळाटाळ केली हे विशेष.