ऐतिहासिक 'मारबत महोत्सवाच्या' अनुषंगाने दोन दिवसीय भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी

नागरिकांना जुने फोटो पाठविण्याचे आवाहन

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
नागपूर,
nagpur marbat festival नागपूरची पारंपारिक आणि ऐतिहासिक ओळख असणारी 'मारबत' आता केवळ शहरापुरती मर्यादित न राहता देशभरात पोहोचली आहे. काळी व पिवळी मारबत या पारंपरिक नावाने सुरू झालेली ही परंपरा आज विविध स्वरूपांत साजरी केली जाते. मारबत महोत्सवच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने येत्या १० व ११ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, तळमजल्यावरील प्रदर्शन हॉल, येथे सकाळी १०:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत एका भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांतील मारबतीचे दुर्मिळ फोटो गोळा करून त्याचे सार्वजनिक प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. अशी माहिती स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी दिली आहे.
 

nagpur marbat festival, marbat mahotsav 2026, nagpur marbat, marbat photo competition, marbat exhibition, nagpur cultural heritage, marbat badgya festival, nagpur municipal corporation, nmc nagpur, historic photos, old marbat photos, nagpur events, nagpur news, september 2026 events, traditional festivals of nagpur 
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्यासह क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड यांच्या देखरेखीत मारबत व बडग्या महोत्सवाची तयारी केल्या जात आहे.
'ऑरेंज सिटी फोटोग्राफर क्लब'कडे संयोजनाची जबाबदारी
या विशेष छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे संपूर्ण संयोजन 'ऑरेंज सिटी फोटोग्राफर क्लब' तर्फे श्री. गजानन रानडे पाहणार आहेत. त्यांच्या संग्रही असलेले मारबतीचे जुने व ऐतिहासिक छायाचित्र क्लबच्या ocpc.ngp@gmail.com या अधिकृत ईमेलवर पाठवून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा.
नागपूरच्या या समृद्ध सांस्कृतिक वारशाची साक्ष देणारी जुनी छायाचित्रे नव्या पिढीसमोर आणण्यासाठी आणि मारबत महोत्सवाचा उत्साह अधिक द्विगुणीत करण्यासाठी या स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी केले आहे.