मुंबई
Share Market Today देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीचे सत्र मंगळवारीही कायम राहिले. आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय बाजाराने पुन्हा एकदा लाल निशाण्यावर सुरुवात केली. सेन्सेक्स ०.२१ टक्क्यांच्या घसरणीसह उघडला, तर निफ्टी ५० मध्ये ०.१५ टक्क्यांची घट नोंदवत व्यवहाराला सुरुवात झाली. सुरुवातीच्या सत्रात अॅक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा आणि एनटीपीसी यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये दबाव दिसून आला.
मंगळवारी बीएसई सेन्सेक्स १६२.५३ अंकांनी म्हणजेच ०.२१ टक्क्यांनी घसरून ७५,९७०.२८ अंकांवर उघडला. त्याचवेळी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी ५० निर्देशांक ३६.०५ अंकांनी म्हणजेच ०.१५ टक्क्यांनी घसरून २३,७४३.१० अंकांवर खुला झाला. याआधी सोमवारीही देशांतर्गत शेअर बाजारात घसरण नोंदवण्यात आली होती.
बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात बहुतांश कंपन्यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव राहिला. सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी केवळ चार कंपन्यांचे शेअर्स तेजीसह हिरव्या निशाण्यावर उघडले, तर उर्वरित २६ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाण्यावर राहिले. निफ्टी ५० मधील चित्रही फारसे वेगळे नव्हते. निर्देशांकातील ५० पैकी केवळ ११ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर तब्बल ३९ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह उघडले.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या बीईएलच्या शेअर्सनी मंगळवारी सर्वाधिक तेजी नोंदवत ०.८२ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहाराला सुरुवात केली. त्यानंतर एटर्नलचे शेअर्स ०.८१ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.२५ टक्के आणि टाटा स्टीलचे शेअर्स ०.०८ टक्क्यांच्या वाढीसह उघडले.
दुसरीकडे, खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. या शेअर्समध्ये ०.८७ टक्क्यांची घट नोंदवत व्यवहाराला सुरुवात झाली. महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स ०.६६ टक्के, टेक महिंद्रा ०.६३ टक्के आणि एनटीपीसी ०.६२ टक्क्यांच्या घसरणीसह उघडले.
याशिवाय भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये ०.५९ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.५६ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.५५ टक्के, एचडीएफसी बँक ०.५१ टक्के आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये ०.५० टक्क्यांची घसरण झाली. हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स ०.३३ टक्के, एचसीएल टेक ०.३१ टक्के, इंडिगो ०.३० टक्के आणि आयटीसीचे शेअर्स ०.३० टक्क्यांनी घसरले.
एसबीआयच्या शेअर्समध्ये ०.२९ टक्के, पॉवर ग्रिड ०.२८ टक्के, बजाज फायनान्स ०.२६ टक्के, एशियन पेंट्स ०.२५ टक्के, एलअँडटी ०.२५ टक्के, ट्रेंट ०.२५ टक्के आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये ०.२० टक्क्यांची घट झाली. टीसीएसचे शेअर्स ०.२० टक्के, टायटन ०.१९ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.१९ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.०९ टक्के, मारुती सुझुकी ०.०८ टक्के आणि इन्फोसिसचे शेअर्स ०.०६ टक्क्यांच्या घसरणीसह उघडले.
आठवड्याच्या सुरुवातीलाच बाजारात घसरण झाल्यानंतर मंगळवारीही प्रमुख निर्देशांक लाल निशाण्यावर उघडल्याने गुंतवणूकदारांमध्ये सावधतेचे वातावरण कायम असल्याचे चित्र सुरुवातीच्या व्यवहारातून दिसून आले.