रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

    दिनांक :08-Sep-2026
Total Views |
चामोर्शी,
students-protest-demanding-road-repairs येथील केवलरामजी हरडे महाविद्यालयाकडे जाणार्या खराब व चिखलमय रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी विद्यार्थी व ग्रामस्थांनी 6 सप्टेंबर रोजी आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले. याउपरही रस्ता दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला.
 
 
students-protest-demanding-road-repairs
 
केवलरामजी हरडे महाविद्यालयाकडे जाणार्या रस्त्यावर मुरूम टाकल्यानंतर रस्त्याची अवस्था अधिकच खराब होऊन दलदल निर्माण झाली आहे. या रस्त्याचा वापर भिवापूर, वलसरा व आमगाव येथील ग्रामस्थ तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात. मात्र खराब रस्त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
 
 
 
यावेळी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी रस्त्यावर वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती, पाण्याचा योग्य निचरा आणि सुरक्षित पक्का रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. जर प्रशासनाकडून यावर काहीच कारवाई झाली नाही तर महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी रास्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.