वर्धा
tiger-missing बोर व्याघ्र प्रकल्पातील बीटीआर-८ युवराज नामक वाघ बेपत्ता असतानाच आता बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात निसर्गमुत करण्यात आलेली ‘भूमी’ नामक वाघीण बेपत्ता असल्याची धकादायक बाब पुढे आली आहे.
अतिशय रुबाबदार आणि तरुण असलेल्या या वाघिणीचे निसर्गप्रेमींकडून ‘भूमी’ असे नामकरण करण्यात आले होते. जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सेलू तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्पात निसर्गमुत केल्यावर सुरूवातीला काही दिवस बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात मुत संचार होता. त्यानंतर ती थेट बफर क्षेत्रात शिरली. नंतर तिने आपला मोर्चा पुन्हा एकदा कोअर क्षेत्राकडे वळविला होता. पण, सध्या ती बोर व्याघ्र प्रकल्पातून बेपत्ता असल्याचे पुढे आले आहे.
समुद्रपूर तालुयातील गिरड-खुर्सापार परिसरात काही वर्षांपूर्वी टीएफ-१ या वाघिणीने चार पिलांना जन्म दिला. त्यापैकी एकाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर या वाघिणीने उर्वरित तीन पिलांना शिकारीचे धडेही दिले. तिन्ही पिल्लं आईपासून दूर होत असतानाच ते शेत शिवारापर्यंत येऊन पाळीव प्राणी ठार करू लागल्याने मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका लक्षात घेता वनविभागाच्या वरिष्ठांच्या आदेशानंतर टीएफ-१ च्या बछड्यांना पिंजराबंद करण्याची मोहीम राबविण्यात आली. सुरूवातीला एक-एक करून दोन पिलांना वनविभागाने बेशुद्ध करून पिंजराबंद केले. जुलै महिन्यात टीएफ-१च्या तिसर्या मादी पिलाला पिंजराबंद करण्यात आले. काही दिवस पिंजर्यात राहिलेल्या या तरुण वाघिणीला निसर्गमुत करण्याचा आदेश झाल्यावर बोर व्याघ्रच्या कोअर क्षेत्रात निसर्गमुत करण्यात आले. या वाघिणीची सुरूवातीला बोरच्या कोअर क्षेत्रातच मुव्हमेंट राहिली. नंतर ही वाघीण थेट बफर क्षेत्रात शिरली. तिने बोरच्या बफर क्षेत्रात येणार्या सालई (कला) परिसरात जनावरांची शिकारही केली होती. मात्र, या वाघिणीने पुन्हा आपला मोर्चा बोरच्या कोअर क्षेत्राकडे वळविला. नंतर ती प्रादेशिक वनक्षेत्रात निघून गेल्याचे सांगितले जात आहे. पण, सध्या तिची मुव्हमेंट बोरच्या बफर किंवा कोअर क्षेत्रात नसल्याचे आणि मागील एक महिन्यांपासून ती बेपत्ता असल्याचे वनविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
ती बोर व्याघ्र प्रकल्पात नाही : ठेंगडी
समुद्रपूर तालुयात पिंजराबंद केलेल्या वाघिणीला जुलैच्या अखेरच्या आठवड्यात बोरच्या कोअर क्षेत्रात निसर्गमुत केले होते. सध्या ती बोर व्याघ्र प्रकल्पात नाही. कदाचित ती प्रादेशिक वन क्षेत्रात गेली असावी, अशी प्रतिक्रीया बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी दिली.