नगरसेवक आकाश दळवी यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार

    दिनांक :09-Sep-2026
Total Views |
बुलढाणा
lethal attack  शहरातील कारंजा चौक येथील दुर्गा देवी मंदिरामध्ये आरती सुरू असताना किरकोळ वादातून मारहाण आणि तलवारीचा धाक दाखवून भाजपचे नगरसेवक आकाश दळवी यांना जीव मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भाजप नगरसेवक आकाश विजय दळवी यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
attack on
तक्रारीत नमूद आहे की ८ सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास आकाश दळवी हे आपल्या सहकार्‍यासोबत मंदिरामध्ये आरती करत होते. यावेळी तेथे आलेल्या निखिल शर्मा आणि त्यांचे दोन मुले आर्यन शर्मा, वंश शर्मा, राजकीय वादातून दळवी यांच्याशी हुजत घालत अश्लील शिवीगाळ केली. या वादात मध्यस्थी करण्यास आलेल्या तिलक तोंडीलायता यांनाही चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर आकाश दळवी हे जाब विचारण्यासाठी निखिल शर्मा यांच्या घरासमोर गेले असता शर्मा यांनी घरातून लोखंडी तलवार, लोखंडी रॉड तुझे तुकडे करुन कारंजा चौकात फेकतों अशी धमकी देत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.दरम्यान पोलिसांनी परिसरातील सदर घटनेच्या बाबतीत सिसिटीव्हीची फुटेज एकत्रित करण्यास सुरुवात केली आहे. .