न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये ‘विद्यार्थी शिक्षक’ बनले!

    दिनांक :09-Sep-2026
Total Views |
नागपूर,
New English High School न्यू इंग्लिश हायस्कूल, काँग्रेस नगर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून पहिल्या चार तासिका विद्यार्थ्यांनी स्वयंशासनाच्या माध्यमातून शाळेचा कारभार उत्तम प्रकारे सांभाळला. विद्यार्थ्यांपैकी रुद्र गायकी याने मुख्याध्यापकाची, तर बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी शिवानी चौरिवार हिने पर्यवेक्षिकेची जबाबदारी पार पाडली.

New English High School 
 
उत्तम अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. मुख्याध्यापक रंगारी सर आणि पर्यवेक्षिका मेधा पडळकर मॅडम यांच्या हस्ते या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. पर्यवेक्षिका मेधा पडळकर मॅडम यांची घेण्यात आलेली मुलाखत हा कार्यक्रमातील विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी सावली मून हिने केले, तर रविषा माटे हिने आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमानंतर मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उपक्रमाचे अभिनंदन केले.
सौजन्य: सुधीर अग्रवाल, संपर्क मित्र