अग्रलेख

फडणवीसांचा मार्ग अधिक प्रशस्त!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान आटोपल्याबरोबर, सोमवारी रात्री एक्झिट पोलचे निष्कर्ष आले आणि राज्यातली राजकीय परिस्थिती एकदम स्पष्ट झाली. केंद्रात पुन्हा नरेंद्र आल्यानंतर राज्यातही देवेंद्रच येणार, याची चर्चा सुरुवातीपासूनच होती आणि अखेर 21 ऑक्टोबर रोजीच तसे स्पष्ट संकेत मिळाले. 24 ऑक्टोबर रोजी त्यावर शिक्कामोर्तब होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत महायुतीच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत जी ऐतिहासिक कामगिरी केली, त्यावर हे शिक्कामोर्तब होणार आहे. देवेंद्र फडणवीस ..

लष्कराची अभिनंदनीय कारवाई!

‘एयर स्ट्राईक’ आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतरही पाकिस्तानच्या वागणुकीत सुधारणा होत नसल्यामुळे, भारताने रविवारी पुन्हा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी गुलाम काश्मीरच्या नीलम आणि लिपा घाटीत लष्करी कारवाई केली. या धडाकेबाज कारवाईत पाकिस्तानचे 10 जवान आणि हिजबुल मुजाहिदीन आणि जैश ए मोहम्मदचे जवळपास दोन डझनावर अतिरेकी मारले गेले. या कारवाईत लष्कराने चार लॉन्चिंग पॅडही उद्ध्वस्त केले. विशेष म्हणजे या भागात भारतीय लष्कराने सात दिवसांत केलेली ही दुसरी मोठी कारवाई होती. त्यामुळे पाकिस्तानला ..

आज दिवस कर्तव्यपूर्तीचा!

आजचा दिवस हा कर्तव्यपूर्तीचा दिवस. तो यासाठी की, आज महाराष्ट्र आणि हरयाणातील मतदारांना आपल्या भविष्याचा फैसला स्वत: करायची मोलाची संधी चालून आली आहे. आज या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान आहे आणि मतदारांंना आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडायचे आहे. पाच वर्षे गतवेळच्या सरकारचे आणि एक दिवस मतदारांचा असतो. मतदार हाच लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे. सिंहासनावर आरूढ असलेला राजा कुणीही असो, त्याला आरूढ करण्यात मतदार राजाचा सर्वात मोठा वाटा असतो. महाराष्ट्र आणि हरयाणात गेली पाच वर्षे भारतीय ..

दे दान... करा मतदान!

‘‘सामान्य माणूस लोकशाहीत देशाला काय देऊ शकतो? तर अत्यंत जागरूकतेने तो मतदान करू शकतो. तो जितके सुदृढ मतदान करेल तितकी त्याची सत्ता बळकट होत जाईल!’’ असे रॉबर्ट फ्रॉस्ट नावाचा लेखक-विचारवंत म्हणाला होता. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशातल्या नागरिकांना, मतदान करा, असे सांगावे लागते. अजूनही अत्यंत सुबुद्ध आणि उच्चभ्रूंच्या वसतीतच कमी मतदान होते. शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी असते आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात मतदानाची टक्केवारी 70 च्या वर जाते. साधारण 60 टक्क्यांच्या ..

सुनावणीच्या वनवासाची अखेर!

 इंग्रजीत एक म्हण आहे- ‘जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड.’ न्याय देण्यास विलंब झाल्यास तो नाकारल्यासारखाच आहे, असा याचा सरळसाधा अर्थ आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणात तो नाकारला गेला का? याचे उत्तर पूर्णतः नकारात्मक नसले, तरी या प्रकरणात न्याय देण्यास विलंब झाला, असा सर्वसाधारण निष्कर्ष निश्चितच काढला जाऊ शकतो. वर्षानुवर्षांपासून या खटल्याची सुनावणी निरनिराळ्या न्यायालयांत सुरू होती. हो, नाही म्हणत कोर्टाची एकेक पायरी चढत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले होते. पण, तेथेही युक्तिवादा..

महाराष्ट्राच्या भरारीचा संकल्प!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा परवा घोषित झाला. जबाबदार सरकार म्हणून कालपर्यंत पार पाडलेल्या जबाबदार्‍यांची जाणीव अन्‌ भविष्यात लोक मोठ्या विश्वासाने आपल्याच हाती सत्ता सोपविणार असल्याचा दुर्दम्य विश्वास, या पृष्ठभूमीवर राजकीय आश्वासनांचा भडिमार न करता, वास्तविकतेचे भान राखत, मतांचे राजकारण न करता, भविष्यातील विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकारण्यासाठी जाहीर केलेला मनोदय म्हणजे भाजपाचे हे निवडणूक ‘संकल्पपत्र’ आहे.  सुमारे दशकापूर्वीचा ..

तत्काळ प्रतिक्रियेची आवश्यकता होती?

मूळ भारतीय वंशाचे, पण सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले प्रख्यात अर्थशास्त्री अभिजित बॅनर्जी यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले, ही समस्त भारतीयांसाठी आनंदाची बाब होय. नोबेल मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! अभिजित बॅनर्जी हे बंगालचे आहेत आणि या आधी अमर्त्य सेन या बंगाली अर्थतज्ज्ञालाच अर्थशास्त्राचे नोबेल मिळाले आहे, यावरून बंगाली माणूस अर्थशास्त्रात किती हुशार आहे, याची प्रचीती सहज येते. अर्थशास्त्राचे नोबेल मूळ भारतीय असलेल्या दोन बंगाली व्यक्तींनाच मिळावे, हा योगायोग की आणखी काही, ..

मोदी, पवार आणि राहुल गांधी...

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 35 ए आणि 370 कलम पुन्हा लागू करून दाखवा, तसेच तीन तलाकसंदर्भातील नवा कायदा रद्द करून दाखवा, असे आव्हान विरोधकांना देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जागतिक मंदीच्या परिस्थितीतून सावरत देशाची अर्थव्यवस्था लवकरच प्रगतिपथावर गेलेली दिसेल, असा जो निर्वाळा दिला आहे, त्याने वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या दोन्ही मुद्यांवरून मोदी यांनी विरोधकांना चांगलेच आडव्या हाताने घेतले, हे बरे झाले. जम्मू-काश्मीरच्या जनतेत वेगळेपणाची ..

मोदी-जिनपिंग भेटीचे फलित...

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिंपग यांच्या भारत भेटीचे फलित काय, असा प्रश्न सहज निर्माण होतो. त्याचे कारण आहे. सध्याच्या घडीलाच नव्हे, तर अगदी चीनने भारतावर 1962 साली आक्रमण केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध हे तणावाचे राहिले आहेत. त्यात भर पडली ती अक्साई चीनचा भाग चीनने गिळंकृत करणे, लडाख आणि अरुणाचल प्रदेशावर दावा सांगणे, मध्यंतरी डोकलामचा तिढा निर्माण होणे आणि नुकतीच 370 कलमावर चीनने पाकिस्तानची कड घेणे. 370 कलमावर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत अक्साई चीन आणि गुलाम काश्मीरसह संपूर्ण जम्मू-काश्मीर ..

विनाकारण... ‘राज’कारण!

महाराष्ट्रात भाऊबंदकीचं राजकारण आहे तसंच ते जिवाभावाचंही आहे. म्हणजे भाऊबंदकीपेक्षाही खतरनाक असं हे राजकारण आहे. एकमेकांच्या जिवावर भाऊदेखील उठतात त्याला जिवाभावाचं राजकारण म्हणतात. म्हणून राजकारण हे लोकांच्या (अर्थात सामान्य) जिवावर येतं. नकोसं वाटतं. कुठल्याही मुद्याचं राजकारण केलं जातं, म्हणून मग विनाकारण राजकारण वाटू लागतं. आता जिवाभावाचं राजकारण करणार्‍या एका भावाची गोष्ट सार्‍या मराठी मुलुखाला माहीत आहे. काकांच्या पक्षाची सावली सोडून यांनी आपला पक्ष स्थापन केला तेव्हा ते म्हणाले ..

चीन, भारत आणि अक्साई चीन...

अक्साई चीन हा भारताचा अविभाज्य भाग असल्याने तो भारताला परत करावा, अशी मागणी इंद्रेशकुमार यांनी चीनकडे केली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिंपग यांच्या भारत आगमनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी ही मागणी केली. सोबतच पाकिस्तानने बळजबरीने बळकावलेला भारताचा भूभाग (गुलाम काश्मीर) परत करण्यास सांगावे, असेही इंद्रेशकुमार यांनी म्हटले आहे. इंद्रेशकुमार हे संघाचे स्वयंसेवक असल्याने ही संघाचीच मागणी आहे, असे बातम्यांमध्ये म्हटले आहे. समजा ही मागणी संघाने केली तर त्यात काय चूक आहे? हीतर संघाची जुनीच मागणी आहे. अक्साई ..

विमानपूजन!

खरंच चुकलंच राजनाथसिंहांचं! तलवारी म्यान झाल्यात, धनुष्यबाण अर्थहीन ठरलेत, अग्नीपासून जलापर्यंत अन्‌ वायूपासून भस्मापर्यंतची सारी शस्त्रास्त्रे ग्लान्त झाली असताना, या अत्याधुनिक युगात थेट विमानाची पूजा करायला निघाले देशाचे संरक्षणमंत्री! गंध, फुलं, अक्षता घेऊन फ्रान्सच्या वारीला निघालेत ते. देशाच्या संरक्षणदलात दाखल होऊ घातलेल्या राफेल विमानांची विधिवत पूजा केली त्यांनी. छे! छे! चुकलंच संरक्षणमंत्र्याचं! असे करणे, या देशातल्या काँग्रेस धुरीणांच्या पसंतीस पडणार नाही, याचीतरी जाणीव बाळगायला हवी ..

विजयादशमीचे पाथेय...

विजयादशमीच्या, सरसंघचालकांच्या भाषणाकडे सार्‍या जगाचे लक्ष लागलेले असते, ही काही आजचीच बाब नाही. संघाशी संबंधित मंडळी सत्तेत आहेत म्हणून जग त्यांच्या भाषणाकडे डोळ्यांत जास्त तेल घालून बघतेे, असेही नाही. संघाच्या स्थापनेपासूनच ही परंपरा चालत आलेली आहे. अगदी डॉ. हेडगेवारांनी आपल्या 8-10 सवंगड्यांसह महालातील मोहिते वाड्याच्या मैदानावर संघाची स्थापना केली तेव्हापासूनच ही परिपाठी चालत आली आहे. सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण हे पुढील वर्षभरासाठी स्वयंसेवकांना पाथेय असते. पुढच्या वर्षीची दिशा मिळाल्याने ..

निवडणूक आणि बंडखोरी...

निवडणूक महानगरपालिकेची असो, जिल्हा परिषदेची असो, की विधानसभा आणि लोकसभेची, प्रत्येक निवडणुकीत बंडखोरी होतच असते. बंडखोरी हा लोकशाहीचा अपरिहार्य भाग झाला आहे. कारण, लोकशाहीने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे. लोकशाही तुम्हाला निवडणुकीत विजयी करण्याची खात्री देऊ शकत नाही, मात्र निवडणूक लढवण्याचा तुमचा अधिकारही नाकारू शकत नाही. महाराष्ट्र आणि हरयाणात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होत आहेत. या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 4 ऑक्टोबर होती, 5 ऑक्टोबरला ..

श्वास विकत घ्यायचा, की तडफडून मरायचे?

आज फुकट मिळत असलेला श्वास भविष्यात विकत घ्यायचा का, की श्वासाशिवाय तडफडून मरायचे, याचा निर्णय करण्याची वेळ आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या अफाट प्रगतीने आपण सगळेच भारावून गेलो आहोत. या प्रगतीने भौतिक सुखाची दारं आपल्यासाठी खुली झाली आहेत. पण, या भौतिक सुखासाठी आपण पर्यावरणाची वाट लावली आहे, याकडे आपले साफ दुर्लक्ष होत आहे. जीवन आनंदाने जगायचे असेल तर आजचा विचार करावा, उद्यात डोकावू नये, असा प्रेमळ सल्ला काही महाभाग देत असतात. पण, आजचा दिवस आनंदात जगण्याच्या नादात उद्याची पर्वा करत नाही ..

उपोषण, उपास पडणे आणि उपवास!

टोपी मे कि रोटी खाना हो बाबूजीटोपी मे कि रोटी खाना...मनोज कुमार यांच्या ‘शोर’ या सिनेमातल्या गाण्याचा मुखडा आहे. खट्याळ जया भादुरी, उपोषणाला बसलेल्या मनोजकुमारला टोपी देते घालायला... टोपी म्हणजे हॅट असते. तो उपोषण करून मरेल, या भीतीने त्याच्यावर मनोमन प्रेम करू लागलेली ही भाबडी पोर त्याला टोपीत पोळ्या लपवून देते अन्‌ खा, असे सांगण्यासाठी डफ वाजवून गाणे म्हणते. त्यात मध्येच हे, ‘टोपी मे कि रोटी खाना हो बाबुजीऽऽऽ’ अशी एक ओळ येते... अर्थात, भारतकुमार यानेकी मनोजकुमार तिच्यावर ..

महायुती, ‘सरकार-2’च्या वाटेवर...

‘प्रात कि ही ओर हैं रात चलती, कौन बदलता हैं रंगमंच इतनी खूबीयोंके साथ, यह निशाका सपना था या अपने आप पर किया था गजब का अधिकार तुमने...’ या हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळी आहेत. यातली, ‘कौन बदलता हैं रंगमंच इतनी खूबीयों के साथ?’ ही ओळ तशी वर्तमान परिप्रेक्ष्यात महत्त्वाची आहे. या प्रश्नाच्या उत्तराचं गूढच त्याचं सौंदर्य आणि शाश्वतता वाढविणारं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे चित्र अगदीच स्पष्ट झालेले होते. तसे ते त्या आधीही स्पष्टच ..

राजी-नाराजी

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा होताच, जवळपास सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण झाली आहे. बंडखोरी हे जिवंतपणाचेच लक्षण आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटावी, न्याय मिळावा, यासाठी लोकशाहीने दिलेल्या शस्त्राचा वापर करण्यात गैर काहीच नाही. बंडखोरांनी वर काढलेले डोके काही आजचेच नाही. दरच निवडणुकीत- मग ती लोकसभेची असो, राज्यसभेची असो, विधानसभेची असो की पंचायत समितीची, त्यात बंडखोरी ही होतच असते. हेच कशाला, आपल्याकडे वॉर्डातील पक्षकार्यकारिणीच्या निवडणुकीतही बंडखोरी होते आणि शाळांमध्ये ..

सुंदर देशा, स्वच्छ देशा, गांधींच्या देशा...

 1930 साली महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला. ‘उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया’ अशी कविता गदिमांनी केली. कृश देहाचा एक वृद्ध चालू लागायचा आणि त्याच्या मागे सारा देश झपाटल्यागत पावले टाकत असायचा... इंग्रजांनी अटकसत्र आरंभले. पुढच्या सत्याग्रहींना अटक केली की मागे दुसरी फळी तयारच असायची. सविनय कायदेभंग म्हणून केवळ एक मूठ मीठ उचलायचे. 60 हजार भारतीय अटकेत गेले. तुरुंग कमी पडले आणि मग मिठावरचा हा कर कमी करण्यात आला... नेतृत्व सच्छील असेल तर जनता नि:शस्त्र मरायलाही ..

आता युतीचा भगवा निश्चित फडकणार...!

होणार... होणार... म्हणून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना युतीचं घोडं अखेर गंगेत न्हालं! प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी युतीची घोषणा एका संयुक्त निवेदनातून मुंबईत केली. ही युती भाजपा आणि शिवसेना या दोन राजकीय पक्षांतील नाही, तर हिंदुत्ववादी विचारांच्या दोन पक्षांतील सर्वात जुनी युती म्हणावी लागेल. ज्या वेळी भाजपा राजकीयदृष्ट्या फार प्रभावी नव्हती आणि तिला मित्रपक्षांची गरज होती, त्यावेळपासून शिवसेना आणि शिरोमणी ..

काश्मीरची वास्तव स्थिती!

वास्तव हे कटु असते, पण देशहितासाठी ते मांडावेच लागते. भारताच्या मुख्य धारेतील प्रसिद्धिमाध्यमे (मीडिया) नेमके हेच विसरले आहेत. या मीडियाचा उथळ व पोकळपणा काश्मीरच्या संदर्भात फारच प्रकर्षाने जाणवत आहे. 5 ऑगस्टनंतर काश्मीरची काय स्थिती आहे, हे सर्व जाणतातच. या दिवसानंतर जम्मू-काश्मीर हे राज्य न राहता, त्याचे दोन- जम्मू व काश्मीर आणि लडाख असे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले आणि त्या पूर्वी संविधानातील कलम 370 निष्प्रभ करण्यात आले. याला विरोध होणार होता. तो हिंसकच राहण्याची शक्यता अधिक होती. ..

मोदींचा बुद्ध, इम्रानचे युद्ध...

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत भाषण करताना, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जे भाषण केले, ते पाहता एखादा दहशतवादीच भाषण देत आहे की काय, असेच जाणवले. दोन मुद्यांवर इम्रानने भर दिला. एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी उच्चारलेल्या ‘रॅडिकल इस्लामिक टेररिझम’ आणि दुसरा आवडता विषय म्हणजे काश्मीर. पहिल्या विषयावरही ते खूपकाही बोलले. स्वत:ला एकीकडे शांतिदूत म्हणत असतानाच, कुख्यात क्रूरकर्मा ओसामा बिन लादेन याच्या विचारसरणीचाही त्यांनी पुरस्कार केला. अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर झालेल्या हल्ल्यानंतर ..

शारदीय उतावीळपणा...

महाराष्ट्राच्या राजकारणावर गेली काही दशके अनभिषिक्त राज्य करणारे माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षण मंत्री, माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाला विरोध करून वेगळा पक्ष स्थापन करणारे व नंतर मात्र अनाकलनीय रीतीने पायाशी जाणारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात अनाहूत जाण्याचा आपला बेत रद्द केला, हे एका अर्थाने बरेच झाले. झाकली मूठ सवा लाखाची! शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला म्हणून संतप्त झालेल्या राष्ट्रवादी ..

अर्ध्या जगाच्या आनंदिंबदूंचे ‘दृष्टी’दर्शन!

जगात दोन संस्कृती नांदतात. एक संस्कृती जी भारतीय जीवनपद्धतीनुसार कार्य करते आणि दुसरी पाश्चात्त्य विचारसरणीवर आधारित आहे. दोन्ही संस्कृतींत अनेक आचार-विचारांबाबत साम्य असले, तरी वैयक्तिक जीवनातील स्वैराचारी आचार-विचारांना पाश्चात्त्य संस्कृतीत ठायीठायी स्थान मिळालेले दिसते. त्यामुळे त्या संस्कृतीतून प्रस्फुटित झालेल्या संकल्पनांमध्ये भारतीय जीवनपद्धतीनुसार जगणार्‍या स्त्री-पुरुषांच्या आचार-विचारांशी अनुरूप, येथील परंपरा आणि संस्कृतीचा सर्वांगीण विचार करून कुठले अहवाल सादर होत नाहीत अथवा त्यांच्याकडून ..

उरलो बारामतीपुरता!

महाराष्ट्राचे स्वयंघोषित जाणते राजे, पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योजकांचे तारणहार, जातीयवादी राजकारणाचे प्रणेते, सत्तेच्या राजकारणासाठी रचावयाच्या षडयंत्राचे संशोधक, माननीय शरद पवारसाहेब यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने बँक घोटाळ्यासंदर्भात गुन्हे दाखल करताच, अख्ख्या बारामतीच्या मर्यादित भौगोलिक परिसरात जी संतापाची लाट उसळलीय्‌, ती पुरेशी बोलकी आहे. देशपातळीवर पक्षाचे नेतृत्व करणार्‍या, वर्षानुवर्षे महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणार्‍या, स्वपक्षीयांना दगा देण्याचा ..

डिजिटल जनगणनेचा क्रांतिकारी निर्णय!

विरोधी पक्ष आणि विरोधक बेंबीच्या देठापासून कितीही बोंबलत सुटले असले, तरी केंद्रातले मोदी सरकार देशातील जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेत आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांमुळे कॉंग्रेस या प्रमुख विरोधी पक्षासह राज्याराज्यांतील विविध प्रादेशिक पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीने विरोधी पक्षांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातल्यानंतरही विरोधी नेत्यांची दृष्टी सुधारली नाही, ही त्यांच्यासाठी दुर्दैवाची बाब होय. ज्याची दृष्टी ..

अद्भुत, अकल्पनीय आणि अविश्वसनीय...!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, अमेरिकेतील ह्युस्टन येथील एनआरजी स्टेडियममध्ये झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने इतिहास घडवला आहे! या कार्यक्रमाने जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील मैत्रीवर फक्त शिक्कामोर्तबच केले नाही, तर ती आणखी दृढ केली आहे. यासोबतच या दोन देशांनी इस्लामिक दहशतवादाविरुद्ध लढाईचे रणशिंगही फुंकले, हाही जगाला मोठा संदेश मानला पाहिजे. मोदी हे इतिहास घडवणारे नेते म्हणून ओळखले जातात, आतापर्यंत आपल्या ..

सर्वात मोठे आर्थिक निर्णय!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी परवा, आर्थिक स्थिती मजबूत होण्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला. यामुळे कार्पोरेट क्षेत्राला मोठा लाभ तर पोहोचेलच, शेअर बाजाराच्या प्रचंड उसळीमुळे आताच भागधारकांना सात लाख कोटींचा फायदा झाला आहे. विरोधकांचा मात्र या निर्णयामुळे तिळपापड झाला आहे. सध्या मोदी सरकारविरोधात कोणताही ठोस मुद्दा नसल्याने, सरकारने घेतलेल्या कोणत्याही चांगल्या निर्णयाला विरोध करणे, हा एकमेव कार्यक्रम त्यांच्याजवळ आहे. डाव्यांचे एकवेळ समजू शकते. कारण, मोदी अमेरिकेच्या अधिक जवळ जात आहेत ..

निकाल निवडणुकीचा वाटे असाच असावा!

एखादी कहाणी मग ती कुठल्याही रूपात तुमच्यासमोर येणार असो (नाटक, चित्रपट, कादंबरी) तिची सुरुवात, मध्य आणि शेवटही रसिकांना माहिती असावा अन्‌ तरीही एकुणातच मांडणार्‍याची शैली इतकी छान असावी की तरीही ती कहाणी रोमांचक वाटावी. पुढे काय होणार हे माहिती असतानाही कुठेही कंटाळा येणार नाही... राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची पूर्ण कथाच अगदी सामान्य मतदारांना माहिती आहे. केवळ निकालासाठी सारे उत्सुक आहेत. या कथानकात विविध भूमिका निभावणार्‍या सर्वच पात्रांना आणि पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ञांन..

न्यायव्यवस्थेवर विश्वास

कुणीही ऐर्‍यागैर्‍याने उठावे आणि राममंदिरावर जीभ सैल सोडावी, जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोमणे हाणता येईल, असा जो प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता, त्याने विरोधकांना आणि विशेषत: मोदीद्वेषाने पछाडलेल्यांना गुदगुल्या होत असल्या तरी, या प्रकारावर कठोर आघात होणे आवश्यक होते. गुरुवारी नाशिकच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास शैलीत या तमाम लोकांचा जो व्यवस्थित समाचार घेतला, ते एका परीने बरे झाले. सर्वोच्च न्यायालय आणि त्यामधील काही न्यायाधीश, 2014 सालापासून ..

यंत्र सत्य की माणूस?

‘एकदा का तुम्ही यंत्रशरण झालांत की मग मानवी कार्यसंस्कृती आणि संस्कार संपतील आणि माणूस यंत्रांचा गुलाम होईल...’ असे महात्मा गांधी म्हणाले होते. भारत हा देश खर्‍या अर्थाने कळलेला हा महात्मा होता. हा देश 40 हजार खेड्यांत वसलेला आहे आणि एक गाव म्हणजे संपूर्ण देशच आहे, अशी ग्रामकेंद्री व्यवस्था त्यांना हवी होती. त्यामुळे माणसांनी माणसांची कामे करावीत आणि व्यवहार पूर्ण व्हावेत, असे त्यांचे मानणे होते. त्यांच्या दृष्टीने ही लोकशाही होती. त्यात नंतर बरेच बदल होत गेले. नेहरूंनीच ते केले. ..

प्लॅस्टिक बंदी

गत काळात झालेल्या अभ्यासानुसार जगभरातील सुमारे 127 देशांनी प्लॅस्टिक वापराबाबत पर्यावरणपूरक विचार केलेला आढळून आला आहे. मार्शल आयलंड सारखा देश ज्याने प्लॅस्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातलीय्‌, तिथपासून तर मालडोवा, उझबेकिस्तान सारखे देश ज्यांनी यासंदर्भात काही कठोर पावलं उचलली आहेत, रोमानिया, व्हिएतनाम सारखे देश ज्यांनी पुन्हा वापरता येईल अशाच प्लॅस्टिकच्या वापराला परवानगी दिली आहे, इथपर्यंत... सर्वच देशांनी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात याबाबतीत कायदे केले आहेत. उपाय योजले आहेत. नाही म्हणायला, ..

इंधन दरवाढीचे संकट!

जग खूप छोटे झाले आहे, त्यामुळे एका देशात ढग आले तर दुसर्‍या देशात पाऊस पडू शकतो. यातील अतिशयोक्ती सोडली, तरी एका देशातील चांगल्या आणि वाईट परिस्थितीचा परिणाम दुसर्‍या देशाला भोगावा लागू शकतो. मध्यंतरी सौदी अरबच्या तेल शुद्धीकरण केंद्रावर ड्रोनहल्ला झाला. हा हल्ला कुणी आणि का केला, याबाबत वेगवेगळे प्रवाह आहेत. मात्र, या हल्ल्याचा सौदी अरबवरच नाही तर संपूर्ण जगावर परिणाम होणार, यात शंका नाही. तेल शुद्धीकरण केंद्रावरील हल्ल्याचा तत्काळ परिणाम म्हणजे तेलाच्या उत्पादनात झालेली घट. ही घट ..

नापिकी : निसर्गशोषणाचेच अपत्य!

उत्क्रांती ही मानवी जीवनात सतत होत राहणारी अवस्था आहे. मनुष्यजीवन जसजसे उत्क्रांत होत गेले, तसतशा सोयी-सुविधांची निर्मिती होत गेली. त्यामुळेच आज एकविसाव्या शतकापर्यंतच्या कालावधीत अनेकानेक शोध लागले आणि मानवी जीवन सुकर होत गेले. आज परिस्थिती अशी आहे की, प्रचंड यांत्रिकीकरणामुळे माणसाचे श्रम कमी झाले असून, तो भौतिकतेच्या अतिआहारी गेला आहे. यामुळे अनेक समस्या ‘आ’ वासून उभ्या ठाकल्या. पाण्याचा, खतांचा, वाहनांचा, विजेचा मोठ्या प्रमाणात वापर, यांत्रिकीकरणावर निर्भरता वाढणे, प्रचंड प्रमाणात ..

गाढवांचा बाजार...

पाकिस्तानातील लाहोर प्रांतातील एका गावात सध्या गाढवांच्या बाजाराने धूम उडवून दिली आहे. पाकमधील काही वाहिन्यांनी या बाजाराची ब्रेकिंग न्यूज दिली आहे, तर काहींनी विशेष वृत्त म्हणून बातमी दिली आहे. सार्‍या वाहिन्यांचे अँकर अगदी पोट धरून हास्यकल्लोळात या बातमीचे विश्लेषण करीत आहेत. आता कुणीही म्हणेल की, असे काय विशेष आहे या गाढवांच्या बाजारात. भारतात अनेक ठिकाणी गाढवांचा बाजार भरतो. अगदी आपल्या महाराष्ट्रातही. पण, लाहोरच्या या बाजाराचे वैशिष्ट्य आहे. कारण, या बाजारात असेही गाढव आले आहेत, ज्यांची ..

गणपती नंतर आता सरकार बसवूया!

काय म्हणता? तर आता बघता बघता गणपती आले अन्‌ गेलेही. त्यांना निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या, असे आवतन त्यांना आपण देऊनही टाकले आहे. ‘चैन पडेना आम्हाला’ असेही आपण त्याला म्हणजे बाप्पाला सांगत असतो. नंतर मात्र नवरात्र येते. दिवाळी येते अन्‌ ‘चैन पडेना’ म्हणणारे चैन करत असतात. बाप्पाचा उत्सव गेला असला, सरला असला तरीही उत्साह मात्र संपलेला नसतो. तो कधी संपतही नाही. तसा बाप्पाचाही ‘सीझन-टू’ येतोच. म्हणजे या दहा दिवसांत गणपतीची प्रतिष्ठापना करता आली नाही, ..

पशुधन लसीकरण अभियान

दुसर्‍या सत्तापर्वात मंत्रिमंडळाची घोषणा करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका बदलाची नोंद कुणी घेतली नव्हती. आतापर्यंत कृषी मंत्रालयातील एक उपविभाग म्हणून असलेल्या पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, मत्स्यपालन याचे स्वतंत्र खाते निर्माण करण्यात आले. एवढेच नव्हे, तर या खात्याला एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्री देण्यात आले. आता आतापर्यंत एक उपविभाग असलेल्या विभागाला स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा आणि त्याला दोन राज्यमंत्री! परंतु, याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. सध्या या खात्याचे गिरिराजिंसह हे कॅबिनेट ..

या रे या, सारे या...!

 या रे या, सारे या. लगबग करा. पटापट या...! इतर कुठेही जाऊ नका! सध्या सत्तेत येण्याची शक्यता केवळ आणि केवळ भाजपा-सेनेचीच असल्याने, धरायचीच झाली तर फक्त त्याच पक्षांची कास धरा. निवडणूक तोंडावर असल्याने घाई करा. लवकरात लवकर निर्णय घ्या. नवीन पक्षात प्रवेश करून स्वत:ची उमेदवारी अन्‌ आमदारकी आरक्षित करून घ्या. तसेही, विचारांचे लोढणे खांद्यावर वाहिले नव्हतेच तुम्ही कधी. त्यामुळे, कालपर्यंत ज्याला शिवीगाळ केली, ज्याच्या नावानं कडाकडा बोटं मोडली, ज्यांचं नाव निघालं तरी नाकं मुरडलीत, ज्यांच्यावर ..

देश जोडण्याचे काम केले चांद्रमोहिमेने!

विक्रम लॅण्डरशी इस्रोचा संपर्क होऊ शकला नसला, तरी लॅण्डर सुरक्षित आहे आणि ते कललेल्या स्थितीत पडले आहे, ते सुरक्षित असून त्याची कुठलीही तुटफूट झालेली नाही, असे इस्रोने स्पष्ट केले आहे. विक्रम सुरक्षित आहे आणि त्याच्याशी संपर्क करण्याचा इस्रोचा प्रयत्न सुरू आहे, ही आनंदाची बाब आहे. विक्रमशी संपर्क झाला नसला तरी चांद्रयान-2 ने आपले 95 टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे, हे वैज्ञानिकांचे म्हणणे खरे मानले, तर चांद्रयान-2 मोहीम यशस्वीच झाली आहे, असे म्हणण्यास वाव आहे. 22 जुलैला प्रक्षेपण झाल्यानंतर तब्बल 47 दिवसांचा ..

मसूद अजहरची सुटका, पाकची नापाक कृती!

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेचे 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय भारताने घेतला आणि पाकिस्तान बिथरला. मुळात यात पाकिस्तानने बिथरण्याचे काही कारण नव्हते. कारण भारताने जम्मू-काश्मीरबाबत जो काही निर्णय घेतला तो त्याच्या भौगोलिक अधिकारक्षेत्रातील आणि घटनेला धरून होता, पाकिस्तानातील कोणत्या प्रांताबाबत नव्हता. मात्र, पाकिस्तानची गेल्या काही दिवसांतील वागणूक ही पिसाळल्यासारखी आहे. पाकिस्तान आधीही भारतात घातपाती कारवाया घडवून आणत होता, आता तर त्याची वागणूक चेकाळल्यासारखी झाली आहे. भारताचे ..

पावसाचा पुन्हा कहर...

महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी मान्सूनचे वेळापत्रक कोलमडून ते अनिश्चित झाले आणि त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला, अजूनही बसत आहे. ही स्थिती आपल्याच राज्यात नाही, तर अन्य राज्यांतही आहे. यावेळच्या मान्सूनने निर्धारित वेळी हजेरी न लावता, अवेळी आपले रूप दाखविले आणि ही स्थिती उद्भवली. जागोजागी पूर आले. त्यात जीवहानी, वित्तहानी, शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. गेल्याच महिन्यात मुंबईत आलेल्या मुसळधार पावसाने अवघ्या दोनच दिवसांत हाहाकार उडवून दिला. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि सर्वाधिक कर ..

संन्यस्त खड्‌ग...

2014 साली झालेला विजय योगायोग नव्हता, हे ठासून सिद्ध करणारा 2019 सालचा दणदणीत विजय संपादल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाजाचा जो सपाटा लावला आहे, तो अभूतपूर्व असाच आहे. त्यासाठी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!  2014 ते 2019 या काळातील नरेंद्र मोदी यांचा कारभार, तसेच 2019 च्या विजयानंतर 100 दिवसांत त्यांनी घेतलेले दूरगामी परिणाम करणारे निर्णय बघता, त्यांना ‘संन्यस्त खड्‌ग’ हेच विशेषण शोभून दिसते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी लेखणीतून निर्माण झालेले ‘संन्यस्त ..

चंद्र आहे साक्षीला...

‘तळमळीने केलेल्या कामाला तत्क्षणी यश आले नाही, असे वाटत असले तरीही ते भविष्यात येणारे यशच असते...’, असे डॉ. एपीजे अब्दुल कलाम म्हणाले होते. अखेर यश आणि अपयश ही संकल्पना सापेक्ष आहे. आम्हाला हवे तसेच घडणे याला आम्ही यश समजतो. वास्तवात कधीकधी मनासारखेच घडत नाही, तरीही ते खूप काही देऊन जाणारे असते. एखादे लक्ष्य निर्धारित असणे अत्यंत आवश्यक असते, त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना ऊर्जा मिळते, गती येते आणि मग त्या मंथनातून जे काय हाती लागते ते तुम्ही निर्धारित केलेल्या लक्ष्याच्या जवळ जाणारे असते, ..

कुठवर सहन करणार आम्ही भ्रष्टाचार?

भारतातल्या लोकांना लाच दिली की कुठलेही काम होते, असा संदेश जर जगात जाणार असेल, तर त्याचा आपल्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आशिया प्रशांत क्षेत्रात भारत सर्वाधिक भ्रष्टाचार असलेला देश आहे, हे वाचून भारतीयांना आश्चर्यही वाटणार नाही. कारण, आपले काम करवून घेण्यासाठी सरकारी बाबूचा खिसा गरम केला नाही, असा नागरिक शोधूनही सापडायचा नाही! मी लाच घेणार नाही आणि देणार नाही, अशी प्रतिज्ञा अनेक लोक करतात. पण, लाच घेणार नाही हे जरी तुमच्या हाती असले तरी लाच देणार ..

फार लवकर जिरली पाकिस्तानची!

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारताने हटविल्यानंतर, पाकिस्तान जगभर बेंबीच्या देठापासून बोंबलत सुुटला होता. भारताला अणुयुद्धाची धमकी देण्यापर्यंत पाकिस्तानची मजल गेली होती. अजूनही तिथल्या अनेक नेत्यांच्या तोंडून युद्धाची भाषा निघते आहे. एकीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, पंतप्रधान इम्रान खान कटोरा घेऊन भीक मागत फिरत आहे, अमेरिकेने बुडावर लाथ मारली आहे, चीनचा डोळा पाकिस्तानी भूमीचा वापर करण्यावर आहे आणि अशा स्थितीत पाकिस्तानी राज्यकर्ते, लष्कर, आयएसआय हे भारताला युद्धाची धमकी ..

ई-1 वाघीण आणि काही प्रश्न...

वनविभागाने नुकत्याच राबविलेल्या मोहिमेत, ई-1 या वाघिणीला जिवंत पकडले आणि नागपूरनजीकच्या प्राणिसंग्रहालयात पाठविले. दोन नागरिकांना ठार मारल्यानंतर तिला पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आणि ती यशस्वी रीत्या पार पडली. ब्रह्मपुरी वनक्षेत्रात तिचा वावर होता. वास्तविक पाहता, तिला गेल्या मे महिन्यातच पकडण्यात आले होते. तिचे पुनर्वसन करण्यासाठी तिला मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डोलार येथील कोअर क्षेत्रात मुक्त करण्यात आले होते. पण, ती कोअर क्षेत्र सोडून बफर क्षेत्रात आली आणि मेळघाट येथील प्रादेशिक वनविभागाच्या ..

दिग्विजय सिंह यांचे डोके तर फिरले नाही!

‘‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का,’’ असा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रज सरकारला उद्देशून विचारला होता. मुळात इंग्रजांना डोके होते, पण ते काही कारणाने ठिकाणावर नव्हते. त्यामुळे हा प्रश्न उचित होता. पण, आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे डोके तर फिरले नाही, असा प्रश्न त्यांच्या वागणुकीतून सतत सगळ्यांना पडत असतो. मात्र याचे उत्तर, ज्याला थोडेफार डोके असेल त्याचेच डोके फिरू शकेल. ज्याला मुळातच डोके ..

बँकांचे विलीनीकरण...

 देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी 10 बँकांचे विलीनीकरण करून 27 बँकांची संख्या 12 वर आणण्याचा निर्णय घेतला. देशाचा जीडीपी 5.8 टक्क्यांवरून 5 वर आल्याची बातमीही तत्पूर्वी घोषित झाली. त्याआधी रिझर्व्ह बँकेने 2018-19 च्या वार्षिक अहवालात, बँकिंग व्यवहारात 71 हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याचे जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून मोटारी, गृहनिर्माण, उत्पादन, मोठे उद्योग यांसारख्या मोठ्या क्षेत्रातील लोक कर्जाची उचल करीत नसल्याने या उद्योगांवर काहीसे मंदीचे सावट निर्माण झाल्याचे ..

खंजीर काळजात घुसला!

आता या अशा शीर्षकाचे दुसरे संगीत नाटक लिहिले जावे. एकतर बराच काळ झाला, चांगलं संगीत नाटक रंगभूमीवर आलेले नाही आणि राजकीय नाटकही आलेले नाही. त्यामुळे आता ही योग्य वेळ आहे. कारण परवा साहेबांचा लाडका खंजीर त्यांच्याच काळजात खुपसला गेला. एका पत्रकाराने अनवधानाने का होईन हे काम केले.साहेब आजकाल अस्वस्थ असतात. नाहीतर साहेबांचे पाणी खूपच खोल, तळ दिसत नाही अन्‌ ढवळूनही काढता येत नाही. साहेबांच्या या खोलपणाचे खूपसारे किस्से आजही लोक कडवट कौतुकाने सांगत असतात. साहेबांनी सांगितले, मंत्रिपदाची शपथ घेण्याची ..

बैल वाचला तर पोळा!

ग्रामीण भागात पोळा सण उत्साहात साजरा झाला, अशी बातमी वाचून आपण आपल्या दैनंदिन कामाला लागतो. परंतु, पोळ्याच्या निमित्ताने कुणीच बैलांच्या आणि एकूणच ग्रामीण भागातील पशुधनाच्या बाबतीत बोलताना दिसत नाही. खूपच झाले तर बैलाच्या कष्टमय जीवनाविषयी उसासे सोडल्याचे दिसून येईल. एक बाब मात्र सर्व मान्य करतात की, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा बैल हा केंद्रिंबदू आहे. ही वस्तुस्थिती हजारो वर्षांपासून लोकांना माहीत होती, म्हणूनच केवळ बैलांसाठी पोळा हा सण प्रारंभ करण्यात आला. पोळ्याच्या दिवशी बैलांचा जो थाट असतो, जो मान ..

जनहितकारी निर्णय!

मोदींच्या कामाचा झपाटा सुरूच आहे, त्याला जोड त्यांच्या मंत्रिमंडळातील तत्पर मंत्र्यांच्या कार्यशैलीची मिळत आहे. एकापाठोपाठ एक निर्णय घेऊन ते, लोकहितकारी सरकार कसे असले पाहिजे, हे सिद्ध करून दाखवत आहेत. मोदींच्या सरकारने 75 दिवसांच्या त्यांच्या नव्या सरकारच्या कार्यकाळात थक्क करणारे निर्णय घेतले. तिहेरी तलाक, चांद्रयान मोहीम आणि घटनेचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी बहुमताचे सरकार काय करू शकते, त्यांची ताकद काय असते, हे दाखवून दिले आहे. त्यांच्या या निर्णयांमुळे सार्‍या जगाचे लक्ष ..

मंदीविरुद्ध लढण्यासाठी...

सारे जग मंदीच्या भीषण संकटातून मार्गक्रमण करीत असताना, भारतासारख्या देशाने त्यातून मार्ग काढण्याचे वेगवेगळे प्रयोग आरंभले आहेत, याचे कौतुक करायचे, की त्यासाठी सरकारच्या नावाने बोटे मोडायची? सध्यातरी विरोधकांनी दुसरा पर्याय स्वीकारलेला दिसतो आहे. मुळात, जर जगभरातच मंदी तेजीत असल्याची खात्री तमाम अर्थतज्ज्ञांना असेल, तर मग त्यासंदर्भात सरकारने मौन धारण करून त्याकडे निष्क्रियतेने बघत राहायचे, की त्यावरील उपायांसाठी धडपड करायची, हेही त्या जाणकरांनी सांगायला हवे. भारतीय रिझर्व्ह बँक ही काही सरकारची मालमत्ता ..

मोदींची मुत्सद्देगिरी...!

कलम 370 रद्द करण्याच्या मुद्यावरून एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातून व्यापक समर्थन मिळत असताना तिकडे पाकिस्तान मात्र एकाकी पडत चालला आहे. काश्मीरच्या मुद्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यात आपल्याला यश आल्याची डिंग  हाकत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मात्र स्वत:च्याच धुंदीत वावरत आहेत. इम्रान खान अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले होते. त्यावेळी बोलताना ट्रम्प यांनी, मोदी यांनी आपल्याला काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची विनंती केली ..

खेलो इंडिया, फिट इंडिया...

बॅडिंमटनमधील एकेरीचे विश्वविजेतेपद पटकावून पी. व्ही. सिंधू हिने भारताची मान उंचावली आहे, तर स्पेनची राजधानी माद्रिद येथे झालेल्या विश्व युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या कोमलिका बारीने सुवर्णपदक जिंकत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे या दोघींनी आपल्या कर्तृत्वाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.रविवारी झालेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या सिंधू ने आधीच्या दोन वेळच्या विजेत्या नोजोमी ओकुहारा हिला हरवीत आपल्या आधीच्या दोन वेळच्या ..

नारायण मूर्ती यांच्या नजरेतील अर्थव्यवस्था

 जगात कुठेही जा, मग ते राष्ट्र विकसित असो की विकसनशील, त्याची सगळी भिस्त ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर असते. गेल्या वर्षभरात जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतो आहे, हे खरे. भारतही त्यातून सुटलेला नाही. पण, यामुळे भारतात मंदी आली, असे म्हणणे सयुक्तिक होणार नाही. आज जगातील अनेक देश, प्रामुख्याने जपान वगळता सर्वच देशात सध्या मंदीचे काहीसे वातावरण निर्माण झाले आहे. याला स्थानिक स्थिती कमी आणि जागतिक स्थिती प्रामुख्याने जबाबदार आहे. यातील सर्वात मोठा घटक म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून ..

अर्थ अरुणास्त!

अवतार म्हणून कुणीच जन्माला येत नाही. मात्र या जन्माचे सार्थक करणारे जीणे कुणी जगत असेल आणि आपल्या कर्तृत्वाची रेखा बुलंद करत असेल तर मग अशांच्या मरणापाशी जग थांबतं, त्यांच्या जगण्याचे सगळेच संदर्भ इतरांना मार्गदर्शक ठरतात. त्यांचा जन्म मग महात्म्याचा अवतार म्हणून पूजला जात असतो... पात्र विशाल झाले की मग त्याच्या उगमाचा शोध घेतला जातो आणि ते पवित्र स्थळ होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि गेल्या पाच वर्षांतील नव भारताच्या अर्थनीतीची मांडणी करणारे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या बाबत असेच म्हणता येईल. ..

यशवंतराव यांना माफ करतील?

मोठमोठे कार्यकर्ते व नेते पक्ष सोडून जात असतानाच, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या एका आदेशाने, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्ष आणखीनच संकटात सापडला आहे. गुरुवारी उच्च न्यायालयाने एका निर्णयान्वये, राज्य सहकारी बँकेच्या अजित पवारांसह 50 संचालकांवर आर्थिक घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत. आतापर्यंत स्वत:वर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून वेगवेगळ्या क्लृप्त्या या संचालक मंडळींनी वापरल्या होत्या. परंतु, उच्च न्यायालयासमोर त्या चालल्या नाहीत, असे दिसते.  राज्य सहकारी ..

चिदम्बरम्‌ यांच्या अटकेचे कवित्व!

सध्या देशात विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या चौकशींची मालिकाच सुरू आहे. चौकशी हा राज्यघटनेने तपास संस्थांना दिलेल्या विविध आयुधांचा एक भाग आहे. ज्या व्यक्तीवर, मग ती कितीही मोठी का असेना, तिच्यावरील भ्रष्टाचार, गैरव्यवहार, बेशिस्त वर्तन, अनियमितता अथवा घोटाळ्यांच्या आरोपांच्या चौकशीचा अधिकार या निमित्ताने तपास संस्थांना मिळत असतो आणि पुरावे मिळाल्यास न्यायालयात ते सादर केले जातात. देशात गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, गुन्हे अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचालनालय, आयकर आदी निरनिराळ्या क्षेत्रातील ..

चिदम्बरी मगरुरीला चपराक!

देशाचे माजी गृहमंत्री पोलिसांच्या भीतीने पळून गेले. एका घोटाळ्यात अडकलेले देशाचे माजी वित्तमंत्री, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारताच फरार झाले... काय दुर्भाग्य आहे बघा या देशाचे! कधीकाळी संसदेत बसलेली, विविध राज्यांच्या विधानसभेत बसलेली लालूप्रसाद यादवांपासून तर ए. राजापर्यंत, सुरेश कलमाडींपासून तर कानीमोझी, अमरिंसहांपर्यंतची मंडळी कधीतरी कारागृहात जाऊन आली आहे. आता पी. चिदम्बरम्‌ त्या रांगेत आहेत. ज्यांनी कधीकाळी गृहमंत्री म्हणून, हाताशी असलेल्या यंत्रणेच्या बळावर देशाच्या कानाकोपर्‍यात ..

जलप्रलय आणि सुरक्षा दले

महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी भयानक पूर येऊन हे दोन्ही जिल्हे पुराच्या पाण्याने वेढले गेले होते. एनडीआरएफ, नाविक दल, वायुसेना यांनी मोलाची भूमिका पार पाडली आणि तब्बल सात लाख लोकांना पुराच्या पाण्यातून बोटींतून बाहेर काढले आणि सुरक्षितस्थळी पोचविले. तेथील लोकांनी त्यांना देवदूत संबोधले. ते खरेच आहे. पूर ओसरल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांना थोडी उसंत मिळाली आणि त्यांनी सर्वात आधी आपल्या पायांकडे लक्ष दिले. अनेक जवानांच्या पायाच्या पृष्ठभागाचे सालटे निघाले होते आणि ते पायांना ..

मुस्लिमांनी आपले हितिंचतक ओळखावे!

तीन तलाकचे समर्थन करताना लाज कशी वाटत नाही, या शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कॉंग्रेसवर हल्ला चढवत तीन तलाकच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेबद्दल कॉंग्रेसचे पुरते वस्त्रहरण करून टाकले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 370 कलम रद्द करण्याच्या मुद्यावर जी चूक आता कॉंग्रेस करत आहे, तशीच चूक याआधी कॉंग्रेसने तीन तलाकच्या मुद्यावर केली आहे. मुळात एकदा चूक केली तर त्याला चूक म्हणता येईल, पण एकच चूक जर कुणी वारंवार करत असेल, तर त्याला चूक नाही तर मूर्खपणा म्हणावा लागेल. कॉंग्रेसची स्थिती ..

हात दाखवून अवलक्षण!

आपल्याच कृतीने स्वत:ची आणि आपल्या देशाचीही बेइज्जती मोल घेणारे एक महाशय आहेत. त्यांचं नाव इम्रान खान! हे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. दहशतवाद्यांना पोसणारा देश म्हणून जगभरात कुख्यात असलेल्या पाकिस्तानला आज कुणीही दरवाजात उभे करायला तयार नसताना, आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याचे कृत्य या महाशयांनी नुकतेच जागतिक व्यासपीठावर केले. कारण काय तर म्हणे, भारताच्या संसदेने जम्मू-काश्मिरातील 370 कलम हटवून टाकले.   यामुळे पाकिस्तानचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे. कारण, या देशाचे राजकारणच आतापर्यंत काश्मीर ..

साहेबांचे राज्य...

आटपाट नगर होते. आता नगर आटपाटच का असते, असा सवाल तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे... असे सांगण्यामागे एक चलाखी आहे. आजकाल व्यवस्था तुम्हाला कुठले प्रश्न आणि समस्या पडल्या पाहिजे हे ठरविते आणि त्याची रेडीमेड उत्तरेही देवून टाकत असते. म्हणजे आधुनिक बाजाराकडे आधी रेडीमेड उत्तरे आणि समस्यांचे समाधान असते आणि नंतर ते प्रश्न कि‘एट (मराठीत काय म्हणायचं बर?) करतात. ते निर्माण केलेले प्रश्न आपल्याला पडले, असे आपल्याला वाटते नि मग कार्पोरेट जग त्याची त्यांच्याकडे विकायला तयार असलेली उत्तरे देत असते... तर आट ..

नव्या भारताचे भाषण!

एक गोष्ट मान्य करावीच लागेल की, 15 ऑगस्टच्या पंतप्रधानांच्या भाषणाचे महत्त्व आणि उत्सुकता 2014 पासून नरेंद्र मोदी यांनी वाढविली आहे. त्यामुळे 73व्या स्वातंत्र्यदिननिमित्त लाल किल्ल्याच्या तटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले भाषण सार्‍या देशाने ऐकले, सार्‍या जगाने ऐकले. आपल्या 92 मिनिटांच्या या प्रदीर्घ भाषणात पंतप्रधानांनी सर्वाधिक वेळ काश्मीर व कलम 370ला दिला आणि ते स्वाभाविकच होते. कलम 370 निष्प्रभ केल्यानंतर, पाश्चात्त्यांचे ध्वनिवर्धक असलेले भारतीय बुद्धिजीवी, दरबारी पत्रकार ..

याला म्हणतात खरे स्वातंत्र्य...!

 भारताला स्वातंत्र्य मिळून आज 72 वर्षे पूर्ण होत आहेत. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्या 75 दिवसांत जे अभूतपूर्व निर्णय घेतले गेले, ते विचारात घेतले, तर देशवासीय खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याची अनुभूती घेत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. देशात खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याला पोषक असे वातावरण निर्माण केले जात आहे. देश स्वतंत्र होऊन 72 वर्षे उलटली असली, तरी आजही 30 टक्के लोक अर्धपोटी वा उपाशी झोपतात, असंख्य लोकांना निवारा मिळत नाही, अंगावर घालायला नीट कपडे मिळत नाहीत. ..

सरकारने दखल घ्यावी

गेल्या आठवड्यात शिक्षण क्षेत्राशी संबंधित दोन मोठे निर्णय घेण्यात आले. यातील एक निर्णय सीबीएसईचा म्हणजे केंद्र सरकारचा, तर दुसरा राज्य सरकारचा आहे. या दोन्ही निर्णयांचे विद्यार्थ्यांवर दूरगामी परिणाम होणार आहेत. पहिला निर्णय सीबीएसईचा आहे, सीबीएसईने अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. दुसरा निर्णय महाराष्ट्र शासनाचा आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा आणि समाजशास्त्राची लेखी परीक्षा आता 80 गुणांची राहणार आहे, तर 20 गुण अंतर्गत मूल्यमापनातून ..

पुन्हा ‘गांधी’च!

दिल्लीत कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक चाललेली. एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर सारे चिंतन करताहेत. मनन करताहेत. कुठल्याशा एका निर्णयाप्रत यायचं तर आहेच, पण काही केल्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचणे जिकिरीचे होते आहे. पर्याय तर अनेक आहेत, पण त्यातील एकाही नावाचा विचार होत नाही. जो तो 10, जनपथकडे आशाळभूत नजरेने बघतोय्‌. त्यांची ही लाचारी बघून ‘दयावान’ मॅडम शेवटी निर्वाणीचा इशारा देतात. स्वत: बैठकीत उपस्थित होतात. त्यांच्या केवळ उपस्थितीनेच मेंढरांच्या कळपाला ..

‘हेल्लारो’च्या निमित्ताने...

 कुठल्याही पुरस्कारांवर चर्चा करण्याचा तो विषय असतो असे नाही. त्यातही ते सरकारी पुरस्कार असतील, तर त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नाही. त्याचीही आपली कारणे आहेत. सरकार म्हटलं की, सत्ताधारी आलेत आणि मग कुठल्याही पुरस्कार, सत्कारात आपली माणसं लाभार्थी म्हणून बसविण्याची त्या क्षेत्राची निकड म्हणा किंवा सवय म्हणा असते. त्यातही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नेहमीच वादळी चर्चा होत राहिली आहे. अमक्यालाच पुरस्कार द्या म्हणून कुणावर दबाव आल्याच्या बातम्याही येत राहिल्या आहेत. मात्र, गेल्या ..

महापूर, टंचाई आणि राजकारण

 भारताच्या बहुतेक भागांत यंदा उशीरा का होईना, पावसाने थैमान घातले आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहात आहेत. धरणे तुडूंब भरली आहेत. त्यातून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत असल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आधी मुंबईला पावसाने झोडपून काढले. तेथे सालाबादाप्रमाणे यावेळीही रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. रेल्वे खोळंबून जीवनवाहिनी बंद पडली. उल्हासनगरजवळ रेल्वेगाडी पाच फुटापर्यंत पाण्यात बुडाली. मुंबईतील रस्ते फुटले. खड्डे पडले. पण, याचे समाधान शिवसेना प्रशासनाने गेल्या पाच वर्षांपासून शोधले ..

काश्मिरी जनतेला आश्वस्त करणारे संबोधन!

जम्मू-काश्मीरला असलेला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला उद्देशून संबोधन केले आणि काश्मिरी जनतेच्या प्रगतीसाठी आपले सरकार कसे कटिबद्ध आहे, हे स्पष्ट केले, याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन करायला पाहिजे. गेली सत्तर वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35 अ लागू होते. त्यामुळे काश्मिरी जनतेची कशी अधोगती झाली आणि त्यातून तेथील जनतेला बाहेर काढण्यासाठी 370 रद्द करणे का आवश्यक होते, याचा ऊहापोह पंतप्रधानांनी केला आणि त्यामुळे देशवासीयांपुढे सरकारची भूमिका ..