कृषी:

कृषी

रासायनिक किटकनाशके, बुरशीनाशके तसेच तणनाशके इ. मिश्रणे तयार करणे

कीड नियंत्रणासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त किडनाशके, बुरशीनाशके, तणनाशके किंवा रासायनिक खते यांचे शिफारशीनुसार योग्य प्रकारे मिश्रण केल्यास वेळेची, मजुरांची, उपकरणांची तसेच फवारणीच्या खर्चात बचत होते. या व्यतिरिक्त शिफारशीत किडनाशकांचे मिश्रण वेळीच किडींच्या विशिष्ट नाजुक अवस्थेवर वापरल्यास प्रभावी व एकापेक्षा जास्त किडींचे नियंत्रण होते. दोन वेगवेगळ्या किडनाशकांच्या मिश्रणा पेक्षा दोन तण नाशकांचे मिश्रण करणे सामान्य आहे. उदा. तणनाशक व बुरशीनाशकांचे मिश्रण फार कमी वेळा केल्या जाते कारण वेगवेगळ्या ..

पिकांच्या अधिक उत्पादनासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

एकात्मिक अन्नद्रव्ये पुरवठा पध्दतीमध्ये रासायनिक खतांच्या वापराबरोबर सेंद्रिय, हिरवळीची खते, जीवाणू आणि नत्रयुक्त अॅझोला यासारखी खते, पीक अवशेष व इतर पालापाचोळा इतर टाकाऊ पदार्थ कुजवून तयार केलेल्या खतांचा समतोल साधला जातो. चक्रीकरणामध्ये द्विदल धान्य पिकांचा फेरपालटीत तसेच आंतरपीक पद्धतीत समावेश करून जमिनीची सुपिकता टिकविण्याचा प्रयत्न केला जातो. जमिनीतील अन्नद्रव्यांचा मुख्य स्त्रोत हा जमिनीच्या खडकापासून बनलेला आहे. त्यामधील अन्नद्रव्ये, सेंद्रिय खते, रासायनिक खते आणि जैविक खते ही होत. यापैकी कोणत्याही ..