अकोला:

अकोला

शरद पवारांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल, मुस्लिम समाजात रोष

अकोला, सत्काराच्या हारामध्ये पातूर नगरपरिषदेच्या काँग्रेसच्या स्विकृत नगरसेवकाने टाकलेला चेहरा मागे ढकलत नाकावर ढोपर मारणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर सोशल मिडियावर जोरदार टिका होत आहे. सतत अल्पसंख्याकांचे कैवारी अशी भूमिका दाखविणारे पवार बाळापूर मतदार संघातील वाडेगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारात ढोपर मारुन अल्पसंख्याकांना धडा शिकवत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. यामुळे अल्पसंख्याक समाजात तीव्र नाराजी असून हे ढोपर अकोला जिल्ह्यातील बाळापूरच्या उमेदवाराबरोबर ..

वकीलांवर न्यायालयाची प्रतिमा जपण्याची जबाबदारी - न्यायमूर्ती भूषण गवई

अकोला,अकोला न्यायालयाला शतकोत्तर वर्षांची परंपरा लाभली आहे. अनेक नामवंत वकीलांनी या न्यायालयात वकीली केली आहे. नावलौकीक असलेल्या अशा या न्यायालयाची प्रतिमा जपण्याची जबाबदारी वकीलांवर असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन अतिरिक्त इमारतीचे उद्घाटन आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती रोहीत देव होते. कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे, ..

प्रभात'ची पुनम राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत विदर्भातून दुसरी

अकोला : प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्य शिष्यवृत्त्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून प्रभातची पुनम सावरकर व ईशा कोरडे यांनी सीबीएसई व आयसीएसई शाळांच्या राज्य गुणवत्ता यादीत अनुक्रमे पाचवे व नववे स्थान प्राप्त केले आहे तर विदर्भातून अनुक्रमे दुसरे व चवथे स्थान प्राप्त केले आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे राज्य शिष्यवृत्ती स्पर्धा इयत्ता पाचवी व आठवीच्या स्टेट बोर्ड व सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. यावर्षी ही परीक्षा गत फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल बुधवार ..