अमरावती

ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या छात्रावासात बालकास अमानुष मारहाण

 प्रकरण पोलिस ठाण्यात धारणी : ख्रिश्चन असोसिएशनद्वारे संचालित धारणी शहराच्या छात्रालयात राजेंद्र बेठेकर नावाच्या विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरून अमानुष मारहाण करण्यात आल्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचल्याने मिशनर्‍यांची एकच धावपळ सुरू झाली आहे. हे प्रकरण चांगलेच पेट घेण्याची शक्यता दिसत आहे.   धारणी शहरात परतवाडा ते धारणी मार्गावरील जागेत मिशन बंगल्याच्या आवारात 25 वर्षांपासून आदिवासी गरीब मुलांसाठी एक वसतिगृह चालत आहे. या वसतिगृहात दहावीपर्यंत विद्यार्थी राहतात. ..

मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांनी घेतली बंड कुटुंबीयांची भेट

 अमरावती,शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांच्या कुटुंबीयांची आज अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आणि शोकसंवेदना व्यक्त केल्या.               ..

कचरा कंटेनरने चिमुरडीला चिरडले

- बडनेरा नवी वस्तीतली घटना अमरावती, महापालिकेच्या कचरा कंटेनर वाहनाने दोन वर्षांच्या चिमुकलीला चिरडल्याने ती जागीच ठार झाली. बडनेरा नवी वस्ती प्रभाग क्रमांक २२ अंतर्गत येणाऱ्या मिलचाळ परिसरात दुपारी १ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. नाहीद फिरदोस असे मृत मुलीचे नाव आहे.   अमरावती महापालिकेने आठ दिवसांपासून शहराच्या विविध भागात नागरिकांच्या घरातील कचरा नेण्यासाठी नव्याने कंटेनरची व्यवस्था केली आहे. या कचरा कंटेनरवर ध्वनिक्षेपकाद्वारे स्वच्छ भारत अभियान जनजागृतीबाबत कर्कश ..

भाजपा-शिवसेनेचा शुक्रवारी महामेळावा

- दूपारी अमरावतीत, सायंकाळी  नागपूरात- मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे येणार   अमरावती,निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून विविध पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकसभेत विदर्भातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे यासाठी भाजपा-शिवसेनाही जोर लावत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार १५ मार्च रोजी अमरावती व नागपूर येथे दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा व कार्यकर्त्यांचा महामेळावा होणार आहे.  संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सकाळी ११ वाजता ..

धारणी सीमेवर अवैध शस्त्रसाठा जप्त

-निवडणुकीत उपयोगाची शंका धारणी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धारणी तालुक्याच्या सीमेपासून थोड्या अंतरावर मध्यप्रदेश पोलिसांनी दोघा जणांकडून  १५ बंदूका जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व पिस्तुली प्लास्टीकच्या कॅनमध्ये लपवून इतर ठिकाणी नेण्याची तयारी सुरू असताना ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने मेळघाट व वन्यजीव विभागाच्या जंगलाला लागूनच असलेल्या मध्यप्रदेशच्या पाचोरी गावात शस्त्रे बनविण्याचे अनेक गृह उद्योग सुरु असल्याचा पुरावा मिळालेला ..

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत अमरावतीत जनजागृती कार्यशाळा

अमरावती : राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पत्रकारांसाठी आज अमरावतीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेदरम्यान, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत माहिती दिली. या यंत्रणेचा इंटरनेटशी कुठलाही संबंध नसल्याने ईव्हीएम हॅक होते, अशा आरोपात तथ्य नसल्याचेही शरद पाटील यांनी स्पष्ट केले. मतदान केंद्रांवर जेष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही शरद पाटील म्हणाले. ..

अट्टल मोटारसायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात

दोन महीन्यापुर्वी मालेगाव येथुन चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोराला मालेगाव पोलीसांनी आज धामणगाव येथे अटक केली. ..

धावत्या बसमधून शेतकर्‍याचे ४८ हजार लंपास

आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला आणखी एक धक्का   धामणगाव रेल्वे : चना विकून चूकारा घेऊन जात असलेल्या वृद्ध शेतकर्‍याच्या बॅग मधील रोकड चालत्या बस मधून लंपास केल्याची घटना आज दुपारी ४ दरम्यान घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.चांदुर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील  ७५ वर्षीय रामराव खुरपुडे या शेतकर्‍याने शनिवार स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या शेतातला १२.८८ क्विंटल चना व्यापारी प्रमोद मुंधडा यांच्याकडे विकला. चुकार्‍याची रक्कम ४८ ..

पाणी टंचाईची एकही तक्रार नको- प्रवीण पोटे पाटील

 जिल्ह्याबाहेर चारा नेण्यावर बंदीपालकमंत्र्यांचे प्रशासनाला सक्त निर्देशअमरावती: पालकमंत्री पोटे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पेयजल परिस्थितीबाबत आज  आढावा बैठक झाली. पेयजलाबाबत ३० जूनपर्यंत नियोजन होणे आवश्यक आहे. पाणीटंचाईबाबत प्रत्येक गावाची गरज लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन करावे व उपाययोजना राबवाव्यात. एकही तक्रार येता कामा नये. अन्यथा शासनाकडून गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी दिला.    &n..

शाळांच्या मालमत्ता कराचा प्रश्न सोडवावा - शैलेश जोशी

अकोला: ‘एज्युकेशन हब’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या अकोला शहरातील महापालिका हद्दीतील शाळांकडून मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर आकारला जातो. अनेक शाळा विद्यार्थ्यांकडून डोनेशन न घेता ज्ञानदानाचे कार्य करीत आहे,पण यात शाळा मात्र कराच्या ओझ्याखाली दबत आहेत. त्यांना या जोखडातून मुक्त करा व त्यासाठी अकोला शहराचे महापौर, लोकप्रतिनिधी यांच्याशी त्वरित चर्चा करून यातून मार्ग काढावा अशी मागणी विद्या भारतीचे संघटन मंत्री शैलेश जोशी यांनी स्थायी समितीचे सभापती विनोद मापारी यांना भेटून केली. ..

अमरावतीत दूचाकी चोरीचा भांडाफोड; आठ दुचाकी जप्त

  गुन्हे शाखेच्या कारवाईत एकास अटकअमरावती : शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. गुन्हे शाखेने चोरीच्या आठ दुचाकी जप्त केल्या असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. जुबेर खान वल्द मेहबूब खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सुफियान नगर अमरावतीचा रहिवासी आहे.    शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांचा शोध लावण्यासाठी पोलिस आयुक्त संजय बावीस्कर यांनी विशेष पथकाचे गठन केले होते. यात सैय्यद इमरान अली शौकत अली ..

स्वच्छ सर्वेक्षणात अमरावती ७४ व्या स्थानी

- राज्यात २१ वा क्रमांक  अमरावती,केंद्र शासनाकडून राबविण्यात येणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण - २०१९ चे निकाल आज घोषित करण्यात आले.  त्यात अमरावती शहर देश पातळीवर ७४ व्या क्रमांकावर तर राज्यस्तरावर २१ वा क्रमांक प्राप्त झाला ..

अमरावतीत सिलेंडरचा स्फोट ; ६ घरे जळून खाक

-आदिवासी नगरातली घटना अमरावती, येथील आदिवासी नगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत ६ घरे जळून खाक झाले. यात लाखोंचे नुकसान झाले असून परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.   कॅम्प परिसरातल्या कलेक्टर कॉलनीजवळील वनिता समाज शाळेच्या मागे आदिवासी नगर आहे. या नगरातून जाणाऱ्या नाल्याच्या काठावर काही घरे आहेत. त्यातील राजू धुर्वे यांच्या घरात मध्यरात्रीनंतर सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. आगीचा ..

जबलपूर एक्सप्रेस उद्यापासून पूर्ववत होणार

अमरावती,  काही तांत्रिक कारणामुळे १५ फेब्रुवारीपासून ३१ मार्चपर्यंत अमरावती-जबलपूर एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. या निर्णयाचा नियमित प्रवाशांनी जबरदस्त विरोध केल्यामुळे सदर एक्सप्रेस १ मार्चपासून पूर्ववत सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.    बडनेरा ते नागपूरपर्यंतच्या रेल्वे मार्गाचे काम सुरु असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने नियमित धावणार्‍या ७ रेल्वेगाड्या ३१ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात अमरावतीवरुन सुटणार्‍या जबलपूर एक्सप्रेसचा..

सामदा रस्त्यावर कापसाच्या ट्रकला आग

-शंभर क्विंटल कापूस जळून खाकदर्यापूर,जैनपूर येथून कापूस भरून येणार्‍या ट्रकला रस्त्यावरील इलेक्ट्रीक वायरचा स्पर्श झाल्याने अचानक आग लागली. या आगीत जवळपास १०० क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. आज दूपारी जैनपूर येथील आढवू नामक शेतकर्‍याचा कापूस एका व्यापार्‍याने विकत घेतला व तो कापूस खाजगी जीनिंगमध्ये विक्रीसाठी आणण्यात येत होता.   सामदा गावाजवळून ट्रक जात असताना रस्त्यावरच्या विद्युत तारेचा ट्रकमधल्या कापसाला स्पर्श झाल्याने स्पार्किंग झाले. कापसाने ..

वायूदलाच्या कामगिरीवर अमरावतीकर खूष

- ठिकठिकाणी जल्लोष  अमरावती,पुलवामा येथील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने आज पहाटे पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला करून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची शिबिरे नष्ट केली. या धाडसी कारवाईचे वृत्त अमरावतीत धडकताच राजकमल चौक व शहराच्या विवीध भागात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल याच्यासह अनेक संघटनांनी ढोल-ताशे वाजवून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. यावेळी भारत मातेचा जयघोषही करण्यात आला.    आज पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान भारतीय वायुसेनेच्या मिराज-२००० या ..

महिला सरपंच व उपसरपंच्यामध्ये हाणामारी

-घटनेनंतर वलगावमध्ये तणाव-परतवाडा मार्गावर टायर जाळले चक्काजामचा प्रयत्न हाणून पाडलाटाकरखेडा संभु,येथून जवळच असलेल्या वलगाव येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या निवडीवरून ग्रामपंचायत सरपंच मोहिनी विठ्ठल मोहोड व उपसरपंच महेश गुलाबराव उकटे यांच्यात चांगलीच हाणामारी झाली. हा वाद पोलिस स्टेशन पर्यंत पोहचला. दरम्यान सरपंच समर्थकांनी परतवाडा मार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.   प्राप्त माहीती वरून कृष्णराव तायडे हे ग्रामपंचायत येथे इलेक्टशियन ..

परीक्षेसाठी चाललेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घात

धारणी,इयत्ता बारावीचा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता दिया फाट्यावर घडली.   आदित्य उर्फ भुरू प्रकाश नायडे रा. दिया असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. १२ वीची पेपर देण्यासाठी आदित्य परीक्षा केंद्राकडे निघाला होता. मार्गतल्या धारणी - दिया फाटयावर त्याच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाली. सदर विद्यार्थ्यांचा धारणी जिल्हा परिषद हाईस्कूल परीक्षा केंद्रावर पेपर होता. घटना घडताच घटनास्थळावरच..

अमरावती जिल्हा शिवसेना अध्यक्षपदी श्याम देशमुख यांची नियुक्ती

   अमरावती : माजी आमदार संजय बंड यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या शिवसेनेच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी श्याम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्याम देशमुख हे शहर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. जिल्ह्यातील तिवसा, मोर्शी आणि धामणगाव रेल्वे या तीन विधानसभा मतदार संघाची जबाबदारी श्याम देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यापूर्वी शिवसेनेत तालुका प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.   संजय बंड यांच्या संस्कारात ..

चिखलदर्‍यात कार दरीत कोसळून एकाच मृत्यू

आईचा मृत्यू, मुलगा गंभीरअचलपूर,चिखलदरा अचलपूर मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळली. या अपघातात वृद्ध आईचा घटनास्थळी मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी आहे. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी चिखलदरा मार्गावर घटांग जवळ झाला. शनिवारी ही घटना उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार, अचलपूर पंचायत समितीचे माजी सभापती व धामणगाव गढी येथील निवासी जयदेवराव गायकवाड यांचा मुलगा संजय ( ४५ ) व आई कुसुम उर्फ पार्वतीबाई गायकवाड ( ७०) हे दोघे धारणी येथून साक्षगंध आटोपून एमएच २७ ..

अमरावतीत वेगवेगळ्या ठिकाणी चौघांची आत्महत्या

अमरावती,शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये शनिवारी चौघांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे . त्यात दोन तरुणांसह एका तरुणीचा व एका इसमाचा समावेश आहे. पहिली घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सामरा नगर परिसरात उघडकीस आली. येथील २३ वर्षीय कल्याणी नांदुरकर या तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणीने आत्महत्येपूर्वी दोन पानांची एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी ती ताब्यात घेतली असून त्यात वैयक्तिक कारणांनी त्रस्त झाल्यामुळे आत्महत्या करित असल्याचे ..

अभाविपची शहीद सन्मान यात्राअमरावतीत देशभक्तीचा जागर

अमरावती,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने शनिवार 23 फेब्रुवारीला शहीद सन्मान यात्रा अमरावती महानगरातून काढण्यात आली. या यात्रेतून देशभक्तीचा जागर झाला. नागरिकांनी ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत करून 500 फुट तिरंग्यावर पुष्पवर्षाव केला.   पुलवामा येथे एसआरपीएफच्या जवानांवर आंतकवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. संपूर्ण देशातले वातावरण या दुर्देवी घटनेमुळे ढवळून निघाले. या घटनेने समाजमन सुन्न झाले होते. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ ..

मिळालेली रोजगाराची संधी टिकवणे आवश्यक : डॉ. चांदेकर

-अमरावती विद्यापीठात विभागीय रोजगार मेळावा-चार हजारांवर विद्यार्थ्यांचा सहभाग अमरावती,रोजगार मेळाव्यांतुन दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम विद्यापीठाच्या माध्यमातून केले जाते. परंतु, रोजगाराची संधी प्राप्त झाल्यावर ती टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चांगल्या भविष्यासाठी आजच्या युवा पिढीने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले.    विद्यापीठ ..

सरपंच सचिवांनी विनापरवाना झाडे तोडल्याची तक्रार

मंगरुळपीर,गट ग्रामपंचायत पिंप्री,बु.,खरबी,मोझरी येथील सचिवांनी विना परवाना ग्राम पंचायत कार्यालय परिसरातील विना परवाना झाडे तोडल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.   निवेदनात नमूद आहे की, पिंप्री ग्राम पंचायत कार्यालय परिसरात असलेल्या चाळीस ते पन्नास हजार रुपये किंमत असलेले अंदाजे सात ते आठ वृक्ष विनापरवाना तोडून सरपंच व सचिव यांनी सादर झाडांची विल्हेवाट लावली.त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा या विचाराची त्यांनी कार्यपद्धतीच बदलून टाकली आहे.म्हणून ..

आरोग्य मंत्री शिंदे उद्या मेळघाटात

-विविध शासकीय रुग्णालयांना देणार भेटी अमरावती, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे उद्या शुक्रवार, २२ फेब्रुवारीपासून दोन दिवस मेळघाटात असून या दरम्यान ते धारणी व चिखलदरा तालुक्यातील विविध शासकीय आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच रुग्णालयांना भेटी देणार आहे.    शुक्रवार, २२ फेब्रुवारीला सकाळी ९.४५ वाजता सेमाडोह येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यावर १०.३० वाजता हरिसालच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देतील. याठिकाणी त्यांच्या हस्ते राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उदघाटन ..

अग्निशमन अधीक्षकाला लाच घेतांना पकडले

- एसीबीची अग्निशमन कार्यालयात कारवाई अमरावती,  अग्निशमनचे ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ३ हजाराची लाच घेणार्‍या मनपाच्या अग्निशमन विभागाच्या अधीक्षकाला गुरुवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयातच रंगेहात पक..

अमरावतीत निवासी ज्ञान स्त्रोत व संशोधन केंद्र

-वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते शुक्रवारी भूमिपूजन   अमरावती,महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीमधून रूक्मिणी नगर भागातील विद्यापीठ मालकीच्या जागेवर निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र इमारत बांधकाम भूमिपूजन समारंभ शुक्रवार, २२ फेब्रुवारी, रोजी दुपारी १.३० वाजता राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शुभहस्ते होणार असून डॉ.के.जी. देशमुख सभागृहात २ वाजता कार्यक्रम होईल. समारंभाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर भूषविणार असून अतिथी ..

राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र उपविजेता

-अमरावतीचे रणवीरसिंग राहल होते संघाचे प्रशिक्षक अमरावती, राष्ट्रीय कॅडेट मुलींची कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच ओडिसातील कटक येथे झाली. त्यात महाराष्ट्राच्या संघाला उपविजेतेपद मिळाले. या संघाचे मुख्य प्रशिक्षक रणवीरसिंग राहल हे अमरावतीकर असून, त्यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.   भारतीय कुस्ती संघाचे संयुक्त सचिव विनोद तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण गटातील उपविजेतेबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुस्ती प्रशिक्षक राहल यांनी हा पुरस्कार ..

अवकाळी पाऊस ठाणेगाव विटा व्यावसायिकांचे नुकसान

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह ठाणेगाव परिसरात आलेल्या पावसामुळे विटा व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याआधी २६ जानेवारी आलेल्या पावसामुळेही विटा व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.अनेक सुशिक्षित बरोजगार हा व्यवसाय करून ..

तीन तासात साकारले शिवरायांचे शिल्प

-राजकमल चौकात पुर्णत्वास आणली कलाकृतीअमरावती, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज मंगळवारी सायंकाळी राजकमल चौकात १२  शिवप्रेमी तरुणांनी युवा मुर्तिकार सुदाम पाडवार यांच्या नेतृत्वात अवघ्या तीन तासात शिवरायांचे ७ फुट उंच अर्धाकृती शिल्प साकारुन उपस्थितांची दाद मिळविली.    मुर्तिकार सुदाम पाडवार याने शिवजयंती निमित्त शिवरायांचे शिल्प साकारण्याची इच्छा भाजपा नेते तुषार भारतीय यांच्याजवळ व्यक्त केली होती. त्यांनी हे शिल्प शहरातल्या अत्यंत वर्दळीच्या राजकमल चौकात साकारण्याची ..

अमरावतीत शिवाजी महाराजांचा जयघोष; फ्लॅशमॉबने वेधले लक्ष

अमरावती, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंगळवारी सकाळपासूनच अमरावती शहरात त्यांचा जयघोष सुरू झाला. विविध संघटना व युवा मंडळांनी भव्य शोभायात्रा काढून शिवरायांना मानाचा मुजरा केला. सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाचा फ्लॅशमॉब आणि मंगलवेषातील ढोल-ताशा पथकाच्या वादनाने सर्वांचे लक्ष वेधून गेले.  तारखेनुसार मंगळवारी शिवसेना सोडून काही राजकीय पक्ष व काही संघटनांनी आणि विविध शासकीय कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे यंदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा ..

विदर्भातील पहिली चारा छावणी रासेगावात

चांदूर बाजार, संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी वातावरण निर्माण होत आहे. या दुष्काळी परिस्थितीची सर्वात जास्त झळ पशु-प्राण्यांना बसते. चारा-पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात पशुधन मरण पावते किंवा विकल्या जाते. चारापाण्या अभावी शेतकरी, पशुपालक, पशुधन विकत..

पश्चिम महाराष्ट्र विदर्भाच्या भरोशावर :अ‍ॅड. अणे

-विदर्भ निर्माण मंचची जाहीर सभाअमरावती, विदर्भ आर्थिक दृष्ट्या कमकुवत नसून तो पश्चिम महाराष्ट्राला पोसत आहे. त्यामुळे विदर्भाला कमी लेखून चालणार नाही, अशी घणाघाती टिका विदर्भ निर्माण महामंचचे समन्वयक अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केली. काँग्रेस व भाजपने विदर्भवाद्यांची फसवणूक केली असून या दोन्ही पक्षांना हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी केले.   स्थानीक सांस्कृतिक भवन येथे विदर्भ निर्माण महामंचची जाहीर सभा गुरुवारी 14 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर समन्वयक शेतकरी ..