भंडारा:

भंडारा

नागरिकत्व विधेयकाच्या निमित्ताने फूट पाडण्याचे षडयंत्र

अभाविपच्या प्रांत अधिवेशन उद्घाटनाच्यावेळी आकांत यांचे प्रतिपादनभंडारा,नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. घुसखोरांची ओळख करून शरणार्थीना नागरिकत्व देऊन त्यांचा सन्मान करणारे आहे. काही लोक आपआपसात लढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हे राष्ट्रीय षडयंत्र आहे. ते हाणून पाडण्याची गरज असून समाजात जाऊन प्रत्येकाला हे काम करावे लागणार आहे. विद्यार्थी शक्ती यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येईल, असा विश्वास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री प्रफुल्ल आकांत यांनी व्यक्त ..

परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून मारहाण; नाना पाटोलेंच्या गुंडांचे घृणित कृत्य

भंडारा,भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साकोली विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या गुंडांनी केल्याची घटना शुक्रवारी रात्री साकोली येथे घडली.   या घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, डॉ. परिणय फुके यांचे लहान बंधू श्री.नितीन फुके हे प्रकाशपर्व पोस्ट ऑफिस जवळ साकोली या त्यांच्या राहत्या घरातून रस्त्याने जात असताना नाना पटोले यांचा पुतण्या रिकी पटोले व काही गुंडांनी ..

आमदार चरण वाघमारे यांना अटक, ऐन निवडणुकीच्या तोंडावर वातावरण चिघळले

भंडारा, तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांना काल २८ रोजी तुमसर पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. आमदार चरण वाघमारे यांच्या अटकेनंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले असून वाघमारे समर्थकांनी भंडारा पोलीस ठाण्यासमोर चांगलीच निदर्शने केली. आपण गुन्हा केला नसल्याने जामीन घेणार नाही अशी भूमिका आमदारांनी घेतल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान आमदारांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर तुमसर मोहाडी येथील काही आमदार समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.१७ सप्टेंबर रोजी ..

मरणाच्या दारात पोहचलेल्या ‘त्या’ वृद्धाचे तरुणाने वाचविले प्राण!

तरुणाच्या तळमळीतून माणूसकीचा परिचय भंडारा,आज मी आणि माझा परिवार अशी मानसिकता फोफावत असताना कुणाकडून मदतीची अपेक्षा करणे म्हणजे मुर्खपणाचेच ठरेल! परंतु अशा बदलत्या मानसिकतेतही माणूसकी जपणारे जीवंत आहे, याचा प्रत्यय नरेंद्र पहाडे नामक युवकाच्या कृतीतून आला. मरणासन्न अवस्थेत तीन दिवसांपासून निर्जनस्थळी पडून असलेल्या एका वयोवृद्ध इसमास रुग्णालयात दाखल करुन मरणाच्या दारात पोहचलेल्या एकाचे प्राण त्यांनी वाचविले. रक्ताचं नात, ओळख नाही किंवा कोणताही स्वार्थ नाही केवळ सेवाभाव म्हणून या तरुणाने केलेली ..

तिरोड्याचे तहसीलदार संजय रामटेके लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात

तिरोडा, आज दि 30 जुलै ला तिरोड्याचे तहसीलदार संजय रामटेके लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अड़कले.प्राप्त माहिती नुसार धारगाव जि भंडारा निवासी तक्रारदाराचा ट्रक क्रमांक MH 36 –AA 2358 हा तुमसर तालुक्यातील चारगाव रेती घाटावरुन रेती वाहतूक करीत असताना बोदलकसा जंगलात तिरोड्याचे तहसीलदार संजय रामटेके यानी पकड़ला व कारवाही न करता सोडन्याकरीता व पुढे अवैध रेती वाहतूक करण्याकरिता 70 हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकड़े तक्रार केली. आज दि 30 जुलैला तहसीलदार रामटेके यांनी ..

भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी परिणय फुके

भंडारा: राज्यमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पदी परिणय फुके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज या संदर्भात शासन आदेश काढण्यात आला. परिणय फुके हे भंडारा-गोंदिया विधानसभा क्षेत्राचे सदस्य असून नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळात फुके यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली होती. त्यामुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद फुके यांच्याकडे येणार अशी चर्चा होती. भंडाराचे विद्यमान पालकमंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ..