बुलढाणा

बुलढाण्यात दगडफेक; बस जाळली

बुलढाणा,येथून दहा कि. मी. अंतरावर असलेल्या डोंगरखंडाळा या गावी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा प्रशासनाकडून हटविल्याच्या कारणामुळे गावात दगडफेक झाली. संतप्त गावकर्‍यांनी बुलढाणा पेठ मार्गे चिखली जाणारी बस क्रमांक एम.एच. ४० ८८५४ जाळली.    तसेच तहसिलदार सुरेश बगळे यांच्या वाहनावर वरवंड येथे झालेल्या दगडफेकीत त्यांच्यासह उपविभागीय अधिकारी सुहासिनी गोणोवार व तलाठी गणेश देशमुख तसेच चार पोलिस वाहनांवर दगडफेक झाली. अग्निशामक दलाच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी ..

दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख लंपास

- वरवट बकाल येथील घटना   संग्रामपुर (बुलढाणा),तालुक्यातील वरवट बकाल येथील बसस्थानक परिसरातून भरदिवसा दुचाकीच्या डीक्कीतून १ लाख रूपये लंपास झाल्याची घटना आज बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली .  कळमखेड येथील शेतकरी अशोकराव महाले हे आज कापूस विकून ३ लाख रुपये बँकेत भरण्या करण्याकरीता आले. त्यांनी दोन लाख रुपये बँकेत भरणा केल्यानंतर उर्वरित १ लाख रुपये आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवले, वरवट बकाल येथील बस स्थानकावर रसवंती वर उसाचा रस पित असताना चोरट्याने डिक्कीवर हात ..

प्रगट दिनासाठी लाखोंच्या संख्येने भक्त शेगावात दाखल

लाखोंच्या संख्येने भक्त शेगावात दाखल  शेगाव : विदर्भाची पांढरी असलेल्या शेगावात संत श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्य लाखोंच्या संख्येने भक्त शेगावात दाखल झाले आहेत. महाराजांच्या समाधी स्थळासह संपूर्ण शहर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आले आहे. उद्या २५ तारखेला जरी प्रगट दिन असला तरी  २० फेब्रुवारी पासून हा उत्सव सुरू झाला आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थानातर्फे करण्यात आले आहे. यामध्ये दररोज मंदिरात सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत काकडा आरती, सकाळी ७.१५ ते ..

भाजपा कॉग्रेसचे कार्यकर्ते आपसात भिडले

धोत्राभनगोजी येथील शालेय कार्यक्रमात वाद,चिखलीत पडसाद चिखली: तालुक्यातील धोत्राभनगोजी येथे शाळेच्या कार्यक्रमात आ.राहुल बोन्द्रे आणि भाजपाच्या श्वेताताई महाले यांच्या भाषणातून शाब्दिक वादावादी झाली.आणि त्यानंतर भाजपा कॉग्रेसचे कार्यकर्ते समोरा समोर आले, त्यातुनच एका भाजपा कार्यकर्त्याला मारहाण झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यासाठी धाव घेतली.याठीकाणी हजारांहून अधिकचा जमाव दाखल झाला.जमावाने केलेल्या दगडफेकीत 3 पोलीस कॉन्स्टेबल आणि 1 पीएसआय जखमी झाले.आक्रमक झालेल्या ..

शहीद नितीन राठोड यांचे व्हिडीओ ठरले शेवटचे

-सोशल मिडीयावर व्हायरल संग्रामपुर ता.प्र. जम्मू-काश्मीर येथील पुलवामामध्ये गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाण्याच्या २ जवानांना वीरमरण आले आहे. त्यापैकी नितीन शिवाजी राठोड यांचे टिकटॉक या ॲपवर बनवलेले दोन व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. देशभक्तीवर बनवलेले हे दोन व्हिडीओ त्यांचे शेवटचे ठरले आहेत.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील २ जवान शहीद झाले आहेत. त्यातच एका गरीब घराण्यातून जिद्दीच्या बळावर सैनिक बनणाऱ्या नितीन यांनी गावात..

शहीद नितीन राठोड यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बुलढाणा:शहीद जवान नितीन राठोड यांच्यावर चोरपांग्रा येथील गोवर्धन नगर येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या साक्षीने शासकीय इतमामात आज, सायंकाळी 5.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रारंभी शहीद नितीन राठोड यांचे पार्थिव लोणार तालुक्यातील चोरपांग्रा येथे दाखल होताच नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर पार्थिव शहीद नितीन राठोड यांच्या निवासस्थानी गोवर्धन नगर येथे आणण्यात आले. यावेळी उपस्थित जनसमुदायांनी शहीद नितीन राठोड अमर रहे, पाकीस्तान मुर्दाबाद, वंदे मातर्म, भारत माता की जयच्या ..

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ टुनकी येथील ग्रामस्थांचे मुंडन - संग्रामपुर तालुका कडकडीत बंद, - तालुक्यात ठिकठिकाणी शहिदांना श्रध्दांजली

बुलडाणा(संग्रामपुर):- जम्मु काश्मीरच्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकाळी 7 वाजतापासुन कडकडीत बंद ठेवून चौका चौकात पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या भारतीय सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सर्व धर्मिय बांधवांच्यावतीने ठिकठिकाणी रस्त्यावरून रॅली काढण्यात आली.     तालुक्यातील टुनकी येथील ग्रामस्थांनी मुंडन करून दहशदवासी हल्याचा निषेध करुन पाकीस्तान मुर्दाबाद, अशा घोषणा देत गावांमध्ये कडकडीत बंद ..

चोरपांगाऱ्याच्या नितीन राठोडला वीरमरण

बुलडाणा -पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड यांना वीरमरण आले आहे. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण तसेच एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.या दहशतवादी हल्ल्यात जिल्ह्यातील दोन ज..