चंद्रपूर:

चंद्रपूर

वैनगंगा नदीत नाव बुडाली; दोघे बेपत्ता, सहा जणांना वाचविण्यात यश

वैनगंगा नदीत नाव बुडाली; दोघे बेपत्ता, सहा जणांना वाचविण्यात यश चंद्रपूर, वैनगंगा नदीपात्राच्या कढोली-हरांबा घाटावर अंत्यविधीसाठी जाताना नाव उलटली. यावेळी नावेमध्ये बसलेले आठही जण नदीमध्ये बुडाले. मात्र परिसरातील नागरिक व पोलिसांच्या सहकार्याने सहा जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.परंतु, दोघेजण बेपत्ता आहेत. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर व गडचिरोली येथील पथकांना प्राचारण करण्यात आले असून त्यांचा शोध सुरु आहे. रामचंद्र पेंदाम, परशुराम आत्राम ..

राज्यस्तरीय वैचारिक अभिवादन प्रश्नोत्तरी स्पर्धा परीक्षेचे आयोजन

  ब्रह्मपुरी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोशियन ऑफ इंजिनिअर्स शाखा नागपूरच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दिनांक ६ डिसेंबरला वैचारिक अभिवादन प्रश्नोत्तरी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा जातीभेद निर्मूलन ,मुक्ती कोणते पथे,अस्पृश्य मूळचे कोण ,क्रांती प्रतिक्रांती, बुद्ध की कार्ल मार्क्स ,राज्य आणि अल्पसंख्यांक, हिंदू कोड बिल या पुस्तकाच्या आधारित अभ्यासक्रमावर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक एक लाख रुपये ,दुसरे ..

शेतकर्‍यांना जोडधंदा म्हणून ‘अटल बांबू समृद्धी योजना’ : कोवे

  राजुरा,शेतकरीबांधवांना शेती पिकासोबतच बांबू लागवडीतून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी वनविभागाद्वारे अटल बांबू समृद्धी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन या प्रकल्पाचे चंद्रपूर वृत्त समन्वयक किशोर कोवे यांनी केले.विरुर-राजुरा येथे अटल बांबू समृद्धी योजनेबाबत तथा अंमलबजावणीकरिता राजुरा उपविभागीय वन अधिकारी आणि वनकर्मचार्‍यांची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. तसेच उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगत, पत्रकार ..

फेम इंडियातर्फे मुनगंटीवार यांना सर्वश्रेष्ठ मंत्री पुरस्कार प्रदान

या पुरस्काराने समाजसेवेची नवी ऊर्जा मिळाली : मुनगंटीवार चंद्रपूर,कोणताही पुरस्कार हा त्या क्षेत्रात काम करण्यासाठी ऊर्जा प्रदान करण्याचे माध्यम असते. आजचा पुरस्कार माझ्यासाठी आनंददायी, प्रेरणादायी व समाजाची सेवा करण्यासाठी नवी ऊर्जा बहाल करणारा असल्याचे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सर्वश्रेष्ठ मंत्री हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल फेम इंडिया परिवाराचे आभार त्यांनी व्यक्त केले.शनिवार, 9 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात फेम इंडिया या नियतकालीकातर्फे सर्वश्रेष्ठ मंत्री या पुरस्काराने ..

आर्थिक मदत आणि ट्रकचालकाच्या अटकेसाठी मृतदेह पोलिस ठाण्यात

रामनगर ठाण्यात तणावट्रकच्या धडकेत चिमुकल्याचा बळी.चंद्रपूर, ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या 9 वर्षीय चिमुकल्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, त्या ट्रकचालकास अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागण्यांसाठी मृतकाच्या कुटुंबियांनी शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता चिमुकल्याचा मृतदेह चक्क रामनगर पोलिस ठाण्यात आणून ठेवला. त्यामुळे येथे तणाव असून, वातावरण चिघळू नये म्हणून पोलिस ठाणे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वृत्तलिहेस्तोवर या ..

जिल्हा परिषद चंद्रपूरमध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न

चंद्रपूर, ज्या समाजातील शिक्षक आपली भूमिका चोख बजावतात तो समाज व ते राष्ट्र कधीही अधोगतीला जात नाही या डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उक्तीनुसार त्यांच्याच जयंती दिनी जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारे ५ सप्टेंबर ला कन्नमवार सभागृहात जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक तथा राष्ट्रिय क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या सोळा शिक्षकांचा जिल्हा शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक हा समाजाचा कणा आहे. उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. असे याप्रसंगी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आपले ..

हजारोंच्या उपस्थितीत प्रभाकरराव मामुलकर यांना साश्रुनयनांनी निरोप

गंगा पूजनाचा कार्यक्रम कौटुंबिक करून उर्वरित खर्च पूरग्रस्तांना मदत  राजुरा,ज्येष्ठ काँग्रेस नेते, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ,लोकनेते ,प्रभाकरराव मामुलकर यांच्यावर आज शिवाजी स्टेडियमच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व पक्षातील दिग्गज राजकीय मंडळी तसेच हजारो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. अत्यंत जड अंतकरणाने आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना सर्वांचे डोळे पाणावले. अंत्यसंस्कारानंतर दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात ..