संपादकीय

चिनी हुवाईची अमेरिकेला भीती!

हे युग इंटरनेटचे आहे. माहितीचे आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचे कमालीचे महत्त्व क्षणोक्षणी सिद्ध होत असलेल्या या काळात, या तंत्रज्ञानाशी जोडली गेलेली सारीच माणसं आणि त्यांचे विश्व तसे जगासमोर उघडसत्य ठरले आहे. एकदा या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला रे केला की, कुणीच स्वत:ला जगापासून लपवून ठेवू शकत नाही. तुमचा मोबाईलच तुम्ही आता कुठे आहात, काल कुठे होतात, हे सांगून जातो. आता तर लोकांचे वैयक्तिक विश्वही जगाला कळण्याचे दिवस आहेत. असं म्हणतात की पुढील काळ असा असेल, की तुमच्या घरातला फ्रीज तुम्ही उघडून बघितला ..

तमसो मा ज्योतिर्गमय।

भारतभरातील सुमारे एक हजार केंद्रीय विद्यालयांची सुरवात प्रार्थनासत्राने होते. त्याचा प्रारंभ ‘असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मा अमृतं गमय।’ या प्रार्थनेने, तर शेवट ‘ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु।’ या शांतिमंत्राने होते. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या या प्रथेविरुद्ध एक विनायक शाह नामक वकील २०१७ साली सर्वोच्च न्यायालयात गेला. १० जानेवारी २०१९ रोजी न्यायालयाने केंद्र सरकारला नोटिस पाठवून उत्तर मागितले. आता हे प्रकरण सुनावणीसाठी आले आहे. या याचिकेत प्रार्थनेची ही प्रथा ..

मोठ्या सर्जिकल स्ट्राईकची गरज

      विशेष संपादकीय...  जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातल्या अवंतीपूर येथे आज गुरुवारी दुपारी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे वीसपेक्षा जास्त जवान शहीद झाले, ही देशवासीयांसाठी अतिशय दु:खद घटना आहे. या घटनेची निंदा करण्यासाठी शब्दही अपुरे पडावेत एवढे अमानवीय कृत्य अतिरेक्यांनी केले आहे. पाकिस्तानच्या मदतीने फोफावलेल्या जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली असून, या घटनेने पाकिस्तानचा खरा चेहराही ..

चंद्राबाबू नायडूंना झाले तरी काय?

आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा तसेच राज्याच्या विभाजनाच्या आधी केंद्र सरकारने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करावीत, या मागण्यांसाठी तेलगू देसमचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी राजधानी दिल्लीत दिवसभराचे धरणे दिले. मंगळवारी तेलगू देसमच्या खासदारांनी राष्ट्रपतींना निवेदनही दिले.       अपेक्षेप्रमाणे नायडूंच्या या धरणे आंदोलनाला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि आपसह सर्व कट्‌टर मोदीविरोधकांनी पािंठबा ..

लोकहितकारी मुद्यांपासून भरकटलेली कॉंग्रेस!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना अक्षरश: वेडे केले आहे. एखादा वेडा कसे दररोज एकच एक वाक्य बोलतो, तसे राहुल गांधी ‘चौकीदार चोर है,’ असे बेंबीच्या देठापासून बोंबलत देशाला सांगत आहेत. खरे चोर कोण आहेत, हे देशाला माहिती आहे. त्यामुळे ‘खोटे बोल पण रेटून बोल,’ या वाक्प्रचाराप्रमाणे राहुल गांधी कितीही खोटे बोलले तरी जनतेवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. ज्यांनी चोरी केली आणि देशाची तिजोरी रिकामी केली, तेच आज ..

कम्युनिस्टांनी घडविलेला ‘मरीचजपी’ नरसंहार!

14 मार्च 2007 रोजी पश्चिम बंगालमध्ये नंदिग्राम झाले होते. नंदिग्रामच्या घटनेला आपण सामूहिक िंहसाचार म्हणत असलो, तर 1979 च्या जानेवारी महिन्यात याच राज्यातील मरीचजपी (आजचे नेताजीनगर) येथे झालेल्या हत्याकांडाला िंहसाचाराची जननीच म्हणावे लागेल! इतिहासाला कधी मरण नसते आणि तो उलगडला गेला, तर त्यात भल्याभल्यांची भंबेरी उडण्याची शक्यता असते. इतिहासाच्या पानांमध्ये इतकी ताकद असते की, त्यामुळे सत्तादेखील उलथवून टाकली जाऊ शकते! आज आपण अशाच एका, इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या महाभयानक नरसंहाराबद्दल चर्चा करणार ..

१९७७ व २००४ च्या निवडणुकीचे रहस्य!

फॉली नरिमन हे देशातील एक नामवंत कायदेपंडित मानले जातात. त्यांनी आता कोणत्याही न्यायालयात वकिली करण्याचे जवळपास थांबविले असले, तरी सीबीआय प्रकरणात त्यांनी, माजी सीबीआयप्रमुख आलोक वर्मा यांच्या बाजूने केस लढविली होती. नरिमन आता नव्वदीच्या घरात असून, त्यांनी १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर काही प्रकाशझोत टाकले आहेत. १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात आणिबाणी लावली होती आणि १९७७ मध्ये त्यांनी अचानक आणिबाणी न उठविता लोकसभा निवडणुकीची घोषणा केली होती. इंदिरा गांधी ..

फुगा फुटला की होऽ!

दोन आठवड्यांपूर्वी अचानक कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, आपली भगिनी प्रियांका वाड्रा हिला पक्षाची महासचिव म्हणून नेमले आणि माध्यमातील व राजकीय विश्लेषणात लुडबुडणार्‍या अनेकांना डोहाळे लागले होते-आता उत्तरप्रदेश, प्रियांका एकहाती राहुलना िंजकून देणार असल्याची दिवास्वप्ने अनेकांना त्या माध्यान्हीला पडलेली होती. गमतीची गोष्ट म्हणजे तेव्हा खुद्द प्रियांका भारतात नव्हती व पतीसह परदेशी होती. दरम्यान, प्रियांकाचा पती रॉबर्ड वाड्रा याने न्यायालयात धाव घेतलेली होती. आपल्याला सक्तवसुली संचालनालयाचे ..

व्हीआयपी संस्कृती अन्‌ प्रोटोकॉलचे स्तोम!

अण्णा हजारेंचे परवाचे उपोषण राजकीय कारणांनी गाजले. त्यावर टीकाही झाली. अण्णांचा विविध राजकीय पक्षांद्वारे, राजकीय स्वार्थापायी होणार्‍या गैरवापराचीही चर्चा यानिमित्ताने झाली. पण, या धामधुमीत त्यांनी मांडलेला एक महत्त्वपूर्ण मुद्दा मात्र बेदखलच राहिला. कुठल्याही चर्चेविना अडगळीत पडून राहिला. अलीकडच्या काळात लागलेली राजकारणाची कीड वगळली, तर अण्णांची एकूणच कारकीर्द सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी ठरली आहे. राळेगणसिद्धी नावाचे आदर्श गाव उभे करण्याचा मुद्दा असो, की मग भारतीय नागरिकांना घटनेने ..

शील : राष्ट्रीय व वैयक्तिक

रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री गुरुजी यांच्या ‘बंच ऑफ थॉट्‌स’ पुस्तकात एक कथा आहे. गुजरातचा राजा कर्ण याचा स्वच्छ चारित्र्याचा पंतप्रधान वेदशास्त्रसंपन्न तर होताच, शिवाय विविध कला आणि विज्ञान यांच्यातही पारंगत होता. एकदा एका मोहाच्या क्षणी राजाने त्याच्या एका सरदाराच्या सौंदर्यवती पत्नीचे अपहरण केले. त्याच्या या कृतीने हा पंतप्रधान संतप्त झाला. राजाला या पापाबद्दल चांगली अद्दल घडविण्याचा त्याने निश्चय केला. या निश्चयासाठी त्याने कोणता मार्ग निवडला? त्याला माहीत होते ..

ममता बॅनर्जी यांचा आक्रस्ताळेपणा

शारदा चिटफंड घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीच्या मुद्यावरून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीन दिवस जो तमाशा केला, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये अराजकाची परिस्थिती उद्भवली होती. ममता बॅनर्जी यांची प्रतिमा आक्रमक नेत्याची आहे. आक्रमक नेतृत्वाने मिळालेल्या लोकप्रियतेमुळे ममता बॅनर्जी यांनी 2011 मध्ये, पश्चिम बंगालमध्ये 30 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या माकपला पायउतार करत सत्ता मिळवली. एवढेच नाही, तर 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आपली सत्ता कायम ठेवली. आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा ..

नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने...

विदर्भात यंदा सांस्कृतिक दिवाळीच साजरी होते आहे. यवतमाळला अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले अन्‌ आता नागपुरात, गेल्या दोन-तीन वर्षांपासून हुलकावण्या देणारे नाट्यसंमेलन याच महिन्यात होते आहे. संमेलन म्हटले की वाद होतातच. मात्र, नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने त्याचे प्रमाण कमी असते. यंदा तर आतापर्यंत वादाचे गालबोट लागलेले नाही. पुढेही लागणार नाही, हे नक्की! गेल्या वर्षीच्या मुलुंड येथील नाट्यसंमेलनात संमेलनाचा बाज थोडा बदलला गेला. अगदी सुदूर विदर्भातल्या लोककलांचेही सादरीकरण झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष ..

चिनी पीएलएची पुनर्रचना आणि भारतीय सैन्य

- अभय बाळकृष्ण पटवर्धनगेल्या महिन्यात चीनची सरकारी एजन्सी शिन्हुआमध्ये ‘ट्रान्सफॉर्मेशनल चेंजेस इन पीएलए’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. चिनी राष्ट्रपती शी जीनिंपगनी, 2013 मधे सुरू केलेल्या चिनी संरक्षणदलांच्या पुनर्रचनेत, आर्मीच्या तीन लाख सैनिकांची कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे; नेव्ही, एयरफोर्स, रॉकेट फोर्स, स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स आणि सायबर वॉरफेअर िंवगची सैनिकीसंख्या अर्ध्याहून कमी झाल्यामुळे आर्मी िंवगच्या पीएलएमधील वर्चस्वाला मोठाच हादरा बसला आहे. 2013 च्या आधी 23 लाख संख्येच्या ..

अयोध्या प्रकरणाचे प्रश्नचिन्ह!

अयोध्या प्रकरणाची गुंतागुंत वाढत असताना, सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी केव्हा होईल, यावरील प्रश्नचिन्ह कायम आहे. यात भर पडली आहे ती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाची. श्रीराम जन्मभूमी परिसरातील 67 एकर जागा त्यांच्या कायदेशीर मालकांकडे सोपविण्याची परवानगी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली आहे. अयोध्येतील एकूण जवळपास 70 एकर जागा केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. त्यातील वादग्रस्त जागा फक्त 2.77 एकर आहे. उर्वरित जागा वादग्रस्त नाही. ती 1994 मध्ये केंद्र सरकारने ..

शेफारलेले कारटे...

साडेसहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नेमका दिवस सांगायचा तर 27 ऑगस्ट 2013 ची रात्र होती. लोकसभेत अन्नसुरक्षा कायद्याची चर्चा लांबलेली होती. तिथे आपल्या भाषणातून, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी, या कायद्याला सर्वांनी पािंठबा द्यावा म्हणून आग्रही आवाहन केलेले होते. नरम प्रकृती असलेल्या सोनियांना त्या लांबलेल्या बैठकीचा इतका शिणवटा आलेला होता, की अकस्मात त्यांची तब्येत सभागृहातच खालावली. धावपळ करून त्यांना एम्स या मोठ्या इस्पितळात उपचारासाठी तत्काळ हलवावे लागलेले होते. इतक्या गंभीर अवस्थेतही त्यांना ..

बेरोजगारी शिगेला?

            सर्वच क्षेत्रातले मोठे लोक ज्याचे राजकारण करतात, त्या बहुतांश बाबी या देशातल्या सामान्य माणसाच्या आकलनापलीकडच्या असतात. बजेट, फिस्कल डेफिसीट, जीडीपी, इन्फ्लेशन... असे कित्येक शब्द रोज कानावर पडत असले तरी डोक्यावरून जाणारे असतात अनेकांसाठी. बडी मंडळी त्यावर तासन्‌तास बोलू शकते म्हणून सामान्य बापुडे, गुमान ते ऐकतात एवढंच. जीडीपी नेमका कसा मोजतात, महागाईचा दर नेमका कसा वाढतो, सरकारच्या एखाद्या निर्णयावरून सेन्सेक्सचा दर कसा ..

नागरिकता दुरुस्ती विधेयक

नागरिकता दुरुस्ती विधेयकावरून सध्या ईशान्य भारतात आणि विशेषत: आसाममध्ये आंदोलन सुरू आहे. आसाम आंदोलनात शहीद झालेल्या काही कुटुंबीयांनी, त्यांना भाजपा सरकारने दिलेले स्मृतिचिन्ह शासनाला परत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. परंतु, हे सर्व प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल. 1978 साली आसामच्या मंगलडोई लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे हिरालाल पटवारी मरण पावल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. त्या वेळी लोकांच्या लक्षात आले की, मतदार यादीत बांगलादेशी मुसलमानांची संख्या प्रचंड ..

प्रियांकाचा राजकारणप्रवेश आणि कॉंग्रेसचे भविष्य...

 प्रियांका वढेरा यांना कॉंग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बनवून त्यांच्यावर पूर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवत कॉंग्रेसने आपली शेवटची चाल खेळली आहे. आतापयर्र्ंत सक्रिय राजकारणात येण्यास फारशा उत्सुक नसलेल्या प्रियांका गांधी-वढेरा अचानक आपल्या राजकारण प्रवेशास कशा तयार झाल्या, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. गेल्या काही वर्षांत सर्वाधिक खासदार असणार्‍या उत्तरप्रदेशात कॉंग्रेसची स्थिती सातत्याने खालावत आहे. राज्यातील कॉंग्रेसची ही घसरण श्रीमती सोनिया गांधी कॉंग्रेसच्या अध्यक्ष असतानाही थांबवू ..

उपजत गुणांमुळेच प्रणवदांना ‘भारतरत्न!’

तळागाळातील जनतेच्या कल्याणासाठी आयुष्यभर जिवाचा होम करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व नानाजी देशमुख, महान गायक, संगीतकार स्व. भूपेन हजारिका यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी या तिघा मान्यवरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार घोषित झाला आहे. नेहमीच्या सरकारी परंपरेनुसार यंदाच्या ‘भारतरत्न’ पुरस्कारांची घोषणा झाली आहे. महान समाजसेवक नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांच्या या पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल सर्वांनीच समाधान व्यक्त केले आहे. अमृतराव उपाख्य नानाजी देशमुख यांना ग्रामविकास, ..

काकाला मिश्या नसल्या तर?

‘आत्याबाईला मिश्या असत्या, तर तिला काका म्हटले असते...’ अशी एक उक्ती आपल्या पूर्वजांनी तयार करून ठेवली आहे. पण, आजकालचा बुद्धिवाद पोस्टट्रूथ म्हणजे सत्य संपल्यानंतरचा असल्याने, सत्ययुगाचा शेवट नव्या विज्ञानवादी बुद्धिवाद्यांनी जाहीर केला आहे. साहजिकच जे काही समोर येईल ते सत्याच्या मृत्यूनंतरचे सत्य मानावे लागते. त्याच पठडीत सगळे अभ्यास व सिद्धांत येत असतात. परिणामी राजकारण, समाजकारण वा कलाप्रांतासह निवडणुकांचेही अंदाज सत्याच्या पलीकडून येऊ लागल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. प्रियांका गांधी ..

प्रियांकाचे आगमन- संधी आणि आव्हान...

दिल्ली दिनांक / रवींद्र दाणी राजकारण हे सरकत्या रंगमचासारखे असते. ज्याचे रंग व दृश्ये सतत बदलत असतात. उत्तरप्रदेशात सपा-बसपा यांनी युती करून एक राजकीय चित्र तयार केले होते. त्याला जबर धक्का प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाने दिला. कॉंग्रेस अध्य..

भान प्रजासत्ताकाचे आणि नागरिकांच्या कर्तव्याचेही...

भारतीय राज्यघटनेची खूप सारी वैशिष्ट्ये आहेत. इथल्या नागरिकांच्या मानसिकतेचा, सामाजिक परिस्थितीचा, व्यवस्थेचा, त्याच्या सकारात्मक-नकारात्मक परिणामांचा सारासार विचार, सखोल अभ्यास करीत मानवी जीवनाच्या सर्वच पैलूंना स्पर्श करीत घटनाकारांनी त्यातील मुद्यांची मांडणी केलेली आपल्याला दिसून येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीच्या इतर सदस्यांच्या दूरदृष्टीचाही प्रत्यय त्यातून येतो, तो वेगळाच. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात एक समृद्ध, बलशाली, स्वयंपूर्ण असा भारत देश उभा राहण्यासाठी म्हणून ज्याची गरज आहे, ..

दृढ लवचीकता

व्हीएनआयटी या भारतातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थेचे अध्यक्ष विश्रामजी जामदार यांच्याशी गप्पागोष्टी हा एक सुखद अनुभव असतो. एकतर, आपल्या ज्ञानात भर पडते आणि दुसरे म्हणजे, विश्रामजींची प्रसन्नता संसर्गजन्य असल्यामुळे त्यांच्या सहवासातील व्यक्तीमध्ये ती नकळत शिरते. एवढ्यातच तरुण भारत कॉन्क्लेव्हच्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पागोष्टी झाल्या. ओघात विषय संघाच्या दैनिक शाखेवर आला. विश्रामजींनी नुकतीच घडलेली घटना सांगितली. प्रभात शाखेचा ध्वज व दंड ज्या घरी ठेवण्यात येतो, ते बाहेरगावी गेले होते. सकाळी स्वयंसेवक ..

विरोधकांचा मेळावा आणि देशाचे भवितव्य...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाताच्या ब्रिगेड मैदानावर जवळपास दीड डझन राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणत, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. देश व लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असून, जनतेने दुसर्‍या स्वातंत्र्यलढ्यासाठी तयार राहावे, असे आवाहनही या सर्वपक्षीय मेळाव्यातून करण्यात आले.लोकसभा निवडणुकीला आता दोन-तीन महिन्यांच्या कालावधी राहिला असताना अशा प्रकारचे राजकीय शक्तिप्रदर्शन आता रोजच होणार आहे. खरोखरच देश व देशातील लोकशाही धोक्यात आली काय?हा ..

यवतमाळच्या स्वामिनींचा दारूबंदीचा लढा...

आता मागच्या महिन्यात गाडगेबाबांची पुण्यतिथी होती. त्या वेळी त्यांचे अखेरचे कीर्तन- त्यांच्याच आवाजातले- पुन्हा एकदा एका मित्राने मला पाठविले. आजकाल हे सोपे झाले आहे. व्हॉटस्‌अॅपवर हे सहज शक्य असते. पंधराएक वर्षांपूर्वी गाडगेबाबांच्या या अखेरच्या अन्‌ एकमेव, त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेल्या कीर्तनाची ध्वनिफीत करण्यासाठी मोठाच आटापिटा करावा लागला होता. बोरीवली पोलिस स्टेशनसमोर त्यांनी केलेले हे कीर्तन. तिथून परतताना त्यांना वाटेतच मृत्यूने गाठले. तत्पूर्वी, एका पोलिस शिपायाने त्या ..

भारताची दृढ होत चाललेली सामरिक पकड!

अंतरिक्ष (स्पेस) भविष्यातील सामरिक कारवायांकरता (फ्युचर मिलिटरी ऑपरेशन्स) महत्त्वाचं रणांगण बनणार/शाबीत होणार आहे. भारताद्वारे अंतरिक्षाचं सैनिकीकरण (मिलिटरायझेशन) आणि तदनुसार पुढे होऊ घातलेल्या/होणार्‍या हत्यारीकरणामुळे (वेपनायझेशन) दक्षिण आशियामधे प्रचंड खर्चीक हत्यारी चुरस- आर्म रेस सुरू होईल आणि आधीच तरल असलेली राजकीय व सामरिक समीकरणं व परिस्थिती अजूनच स्फोटक बनेल. आजमितीला जगातील सशक्त देशांची मदार, सलग मिलिटरी कम्युनिकेशन आणि ऑपरेशनल टास्कसाठी मुख्यतः अंतरिक्षावरच आहे. नजदिकी भविष्यात, ..

1993 ची पुनरावृत्ती?

-भाऊ तोरसेकरयाच आठवड्यात उत्तरप्रदेशातील महागठबंधन पूर्ण झाले आहे आणि त्यातून काँग्रेसला कटाक्षाने बाहेर ठेवण्यात आलेले आहे. मागील अनेक निवडणुकांत समाजवादी व बसपाने ज्या दोन जागा लढवायचे टाळले, त्या अमेठी व रायबरेली जागा या गठबंधनाने काँग्रेससाठी सोडलेल्या आहेत. त्यामागे तेवढ्यापेक्षा काँग्रेसची उत्तरप्रदेशात अधिक पात्रता नाही, असा त्यांचा निष्कर्ष असावा. तो वेगळा विषय आहे. पण, असे केल्याने काँग्रेसला अपमानित करीत आहोत आणि असली तडजोड झुगारून काँग्रेस स्वबळावर सर्व जागी उमेदवार उभे करणार, हा धोका सपा ..

गोड बोलण्याचे दिवस...

गोड बोलण्याचे दिवस.....

ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज 7 आता कायमची बंद

कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये असलेली ऑपरेटिंग सिस्टिम  विंडोज 7 आता कायमची बंद होणार आहे. प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ (Windows 7) चा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टकडून करण्यात आली आहे.  पुढील वर्षी १४ जानेवारी २०२० पासून विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येणार आहे म्हणजे याचे अपडेट्स मिळणार नाहीत. या अपडेट्समध्ये सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस यांचाही समावेश आहे. या दोन्हीमुळे कम्प्युटरची सुरक्षा होत ..

अवघ्या २३ सेकंदात चोराला पकडण्याचा पराक्रम

आरपीएफनं अवघ्या २३ सेकंदात चोराला पकडण्याचा पराक्रम केला आहे. नागपूर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमुळे हा चोर आरपीएफच्या जाळ्यात अलगद सापडला. सुनील राय असं अटक करण्यात आलेल्या चोराचं नाव आहे...

औद्योगिक पीछेहाट

कोणत्याही प्रदेशाची आर्थिक उन्नती तेथे उद्योगधंदे किती प्रमाणात आहेत यावर अवलंबून असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या दोन-तीन दशकांत, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर विविध उद्योगांचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आणि अर्थात काही अपवाद वगळता, भारतातील सर्वच राज्यांना आणि प्रदेशांना त्याचा लाभ झाला आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याने खूप आधीपासून या आघाडीवर नेहमीच अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ..

डिसेंबरमध्ये मेट्रो ट्रेन ‘चायना टू नागपूर’

नागपूर - डिसेंबरमध्ये ‘माझी मेट्रो’च्या ताफ्यात दोन मेट्रो ट्रेनचा समावेश होणार आहे. तीन डब्यांची एक मेट्रो ट्रेन असून एकूण सहा डबे चीनवरून शहरात येणार आहेत. एका मेट्रो ट्रेनची निर्मिती झाली असून, त्यात अत्यावश्‍यक उपकरणे बसविण्यात येत आहेत. दुसऱ्या मेट्रो ट्रेनची निर्मितीही वेगाने सुरू आहे...

भारत-रशियामध्ये ४०,००० कोटींचा करार

अमेरिकेचा दबाव झुगारून भारताने रशियासोबत तब्बल ४०,००० कोटी रुपयांचा करार केला. या कराराअंतर्गत भारत अत्यंत ताकदीच्या एस ४०० मिसाइल्स रशियाकडून विकत घेणार आहे. ..

प्रलंबित प्रश्नांची कोंडी फुटावी!

एखाद्या प्रकल्पाच्या मागे दिरंगाई किती यावी? पाच वर्षे, दहा वर्षे? गोसेखुर्द प्रकल्पाच्या वाट्याला ती उणीपुरी साडेतीन दशके आली आहे. चुका आणि दिरंगाईच्या बाबतीत एखाद्या प्रकल्पाचा अभ्यासकांना अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी गोसेखुर्द प्रकल्प उत्तम उदाहरण म्हणता येईल. या प्रकल्पाचा मूळ पिंड हा शेतीसाठी सिंचनाची सोय हा आहे. याउपरही अनेक गोष्टी या प्रकल्पाने दिल्या आहेत. अनेक नव्या बाबी जन्माला घातल्या आहेत. हे झाले एका बाजूचे वास्तव. दुसऱ्या बाजूला अनेक उणिवा आजही आहेत. या उणिवांकडे सरकारने गांभीर्याने ..