निवडणूक विशेष

मोकाट सांडाचा अखिलेशच्या सभेत हैदोस

कन्नौज मतदारसंघात सपाच्या उमेदवार अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या प्रचारसभेच्या ठिकाणी एक मोकाट सांड घुसल्याने एकच गहजब माजला. या लोकसभा मतदारसंघातून अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या सपा-बसपा युतीच्या तिकीटावर निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ अखिलेश यादव आणि मायावती यांची संयुक्त सभा कन्नौजमधील तिरवा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. सभेची सर्व तयारीही पूर्ण झाली होती. अखिलेश आणि मायावती यांचे हेलिकॉप्टरही येण्याची वेळ झाली होती.  पण! हेलिकॉप्टर उतरण्याच्या ..

कॉंग्रेस 100 पर्यंत पोचणार काय?

लोकसभा निवडणुकीच्या ती टप्प्यांचे मतदान पार पडल्यानंतर राजकीय निरीक्षक आणि वाहिन्यांनी आपापले अंदाज वर्तविले आहेत. या तीन टप्प्यात भाजपाला मोठ्या संख्येत जागा मिळणार असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. पण, कॉंग्रेसला किती जागा मिळणार, हा पक्ष शंभरापर्यंत तरी मजल मारेल का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, एकेकाळी केंद्रात आणि बहुतेक राज्यांमध्ये सत्तेत असलेली कॉंग्रेस आता आपली पत वाचविण्यासाठी प्रादेशिक पक्षांसोबत युती करताना दिसत आहे. दुसरीकडे रालोआमधून काही सहकारी ..

खासदार निधी खर्च करण्याचीही समस्या!

  दरवर्षीच्या अर्थसंकल्पात, लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना त्यांचा मतदारसंघ वा संबंधित क्षेत्रातील विकास आणि विकासविषयक कामांसाठी खर्चाची तरतूद म्हणून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येत असली, तरी यापैकी अधिकांश निधी संबंधित खासदारांद्वारे विकासविषयक कामासाठी खर्च करण्यासाठी आपल्या खासदारांना वेळच नसतो, ही एक आश्चर्यकारक वस्तुस्थिती आहे.परिणामी, कोट्यवधी रुपयांचा मंजूर झालेला सार्वजनिक निधी त्याच्या वापरविना पडून राहतो व देशभरातील मतदार व जनसामान्यांशी निगडित असे रस्ते, ..

२०२३ पर्यंत माओवाद समूळ नष्ट करणार

२०१३ पर्यंत नक्षलवाद, माओवादाला मुळातून उपटून फेकण्यात येईल, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथिंसह कडाडले. झारखंडमध्ये चौथ्या टप्प्याच्या प्रचारार्थ एनडीएच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते आले असता, त्यांनी हा निर्धार व्यक्त केला. पलामू येथील भाजपा उमेदवार विष्णुदयाल राम यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना राजनाथिंसह म्हणाले, कॉंग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा येथे केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यांना देशाच्या सुरक्षेशी काहीही घेणेदेणे नाही.    माओवादाला त्यांचे अप्रत्यक्ष ..

कॉंग्रेसचा प्रचार करणार्‍या पोलिस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबईतील कॉंग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा प्रचार करणारे सहायक पोलिस आयुक्त नरिंसह यादव यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.   यादव हे कुस्तीपटू आहेत आणि निरुपम यांनी यादव यांच्या कुस्तीगीर संघटनेला भरपूर आर्थिक मदत केली आहे. यातही काही आक्षेपार्ह नाही. पण, पदावर असताना, कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करणे हे मोठ्या शिस्तभंगाच्या कारवाईला आमंत्रण देणारे असल्याचे कायद्यात नमूद आहे. संजय निरुपम यांनी यादव नगर भागात आपल्या प्रचारार्थ एका सभेचे आयोजन केले होते. नरिंसह यादव हे ..

अमरिंसग यांनी आजम खानची काढली खरडपट्टी

रामपूर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्या प्रचारार्थ खासदार अमर िंसह आले असता, त्यांनी रामपूरचे समाजवादी पक्षाचे उमेदवार आजम खान यांची चांगलीच खरडपट्टी काढली.   आजम खान यांनी जया प्रदा यांच्याबाबतील अतिशय हीन पातळीची विधाने केली असताना, आता मायावती, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, मेहबूबा मुफ्ती यासारख्या राजकारणात असलेल्या महिला गप्प का आहेत? याचे उत्तर मला हवे आहे. त्यांना जया प्रदा यांच्या अपमान मान्य आहे काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी याचीही आठवण ..

निवडणूक चिन्हांची चर्चा...

राजकीय पक्ष आणि निवडणूक व निवडणूकचिन्ह यांचा एक अन्योन्य संबंध असतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सर्वसामान्य जनता व मतदारांच्या संदर्भात राजकीय पक्षाचे निवडणूकचिन्ह म्हणजेच निवडणूक निशाणी हीच त्याची खरी ओळख असते. विशेषत: सार्वत्रिक निवडणुकी आल्या की, सर्वच राजकीय पक्ष-पुढारी आपापल्या पक्ष व उमेदवारांचे निवडणूकचिन्ह मतदारांच्या समोर प्राधान्याने व प्रामुख्याने आणून, आपला पक्ष व उमेदवार यांचा विजय होण्यासाठीच तर धडपडतात.   स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय लोकशाहीचा एक अविभाज्य व प्रमुख भाग ..

शत्रुघ्न सिन्हाच्या दुहेरी ‘गेममुळे’ बिहार कॉंग्रेसमध्ये असंतोष

शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या पाटणा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार असताना, आपला प्रचार सोडून ते समाजवादी पक्षाच्या उमेदवार त्यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांच्या प्रचारासाठी गेल्याने बिहार कॉंग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.   पूनम सिन्हा यांना लखनौ मतदारसंघातून समाजवादी पक्षाने, केंद्रीय गृह मंत्री राजनाथिंसह यंाच्याविरोधात लढण्यासाठी तिकिट दिले आहे. शत्रुघ्न सिन्हा हे पाटणा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. उत्तरप्रदेशात सपा-बसपा-रालोद युतीने कॉंग्रेसला बाहेर ठेवले आहे. उत्तरप्रदेशात ..

मुलायमसिहांचा मायावतींकडून प्रचार!

राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो, असे म्हटले जाते. त्याचे प्रत्यंतर नुकतेच मैनपुरीत आले. मैनपुरी येथे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या प्रचारासाठी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आल्या होत्या. जवळपास 24 वर्षानंतर मुलायमसिंह यादव आणि मायावती यांना एका व्यासपीठावर यावे लागले.   सपा आणि बसपा यांच्यात झालेली ही दुसरी आघाडी आहे. बसपात कांशीराम यांचे युग असतांना आणि मायावती दुय्यम भूमिकेत काम करत असतांना सपा आणि बसपा यांनी 1995 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ..

चहा की दूध?

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात नेमकी काय कामगिरी केली याबद्दल मतभेद राहू शकतात. पाठीराखे म्हणतील खूप काम केले. विरोधक म्हणतील नुसत्याच घोषणा केल्या. पण एक मुद्दा मात्र सर्वांना मान्य करावा लागेल. चायवाला आणि चौकीदार हे दोन शब्द त्यांच्या व्यवसायासह मोदींनी प्रतिष्ठित केले, तसेच त्यांना सतत चर्चेच्या केन्द्रस्थानी ठेवण्यात यश मिळविले. विशेषत: मोदीविरोधकांना या दोनपैकी एकाचा उल्लेख केल्याशिवाय पुढेच जाता येत नाही, अशी स्थिती आज आलेली आहे. मोदींची तारीफ करायला आणि त्यांच्यावर टीका करायलाही, ..

राज्यकर्ते, राजकारण्यांची अशीही अंधश्रद्धा!

राजकारणी-पुढारी मंडळींची वेगवेगळी अंधश्रद्धा कशा प्रकारे वर्षानुवर्षे सुरू असू शकते याचे प्रमुख उदाहरण म्हणून उत्तर प्रदेशच्या नोएडा विभागाचे देण्यात येते. उत्तर प्रदेशातील नोएडाला भेट देणारा मुख्यमंत्री एकतर निवडणुकीत पराभूत होतो िंकवा त्याला सत्ता सोडावी लागते अशी राजकीय-प्रशासकीय अंधश्रद्धा उत्तर प्रदेशात वर्षानुवर्षे प्रचलित होती. मात्र ही अंधश्रद्धा मोडित काढण्याचे महत्त्वपूर्ण व साहसी काम केले ते उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी.   नेएडाला भेट देणार्‍या ..

तिसर्‍या टप्प्यात 115 मतदारसंघांत मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याचे मतदान 18 एप्रिलला संपले. आता तिसर्‍या टप्प्यात 14 राज्यात 115 जागांवर 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. गुजरात व केरळ येथे सर्व लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यात केरळमधील वायनाड जागेचा समावेश आहे. येथून कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी निवडणूक लढवीत आहेत. त्यांना भाजपा व डाव्या आघाडीशी सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात 14 जागांवर मतदान होणार आहे.या जागा पुढीलप्रमणे : उत्तर प्रदेश : मुरादाबाद, रामपूर, सम्भल, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, बदायूं, आंवला, ..

केरळमध्ये निवडणूक प्रचार शिगेला

केरळमधील सर्वच सर्व 20 लोकसभा मतदारसंघात तिसर्‍या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता येथील प्रचार शिगेला पोचला आहे. केरळमध्ये यावेळी भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस समर्थित संयुक्त लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडी अशी तिहेरी लढत बघायला मिळणार आहे. भाजपाला येथून पथानमथित्ता, पलक्कड आणि तिरुवनंतपुरम या तीन जागा मिळण्याची आशा आहे. त्यामुळे येथे भाजपा पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. त्रिचूर या जागेवरही भाजपाने लक्ष्य केंद्रित केले आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात तिरुवनंतपुरम येेथे भाजपाला ..

इलेक्शन स्पेशल थाली आणि चौकीदार पराठा

लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणार्‍या आगामी लोकसभा निवडणुकांचा रंग सर्वत्र पाहायला मिळत आहे. मतदार, उमेदवार, राजकारण, सत्ता, पक्ष, आरोप- प्रत्यारोप आणि देशाचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या प्रतिनिधींची निवड केली जाणार याविषयी असणारं कुतूहल असंच काहीसं वातावरण आणि चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. बाजारपेठांमध्ये असणार्‍या कपड्यांच्या दुकानांपासून ते अगदी भांड्यांच्या दुकानांपर्यंत सर्वत्र निवडणूकांचीच छाप पाहायला मिळत आहे.   पक्ष म्हणू नका िंकवा नेते, प्रत्येकात..

चोरी चोरी...

फायरब्रँड भाजपानेत्या उमा भारती खरोखरच आग आहेत. राजकारणात येण्याआधी त्या आणि ऋतंभरा या दोन साध्वी देशभर गाजत होत्या. त्यांची भाषणे ऐकायला लोक गर्दी करीत असत. पुढे उमा भारती भाजपात आल्या, मुख्यमंत्री झाल्या, केन्द्रीय मंत्री झाल्या. यावेळी त्यांनी तब्येतीच्या कारणावरून स्वत:हून निवडणुकीतून माघार घेतली. (पाऊणशे पार काही ज्येष्ठांनीही असे केले असते तर किती बरे झाले असते!) पण म्हणून त्या राजकारणातून बाहेर पडल्या असे नाही.   पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना वारंवार चौकीदार चोर है... म्हणत हिणवणारे ..

नालायक...!

शुभ बोल रे...   -विनोद देशमुख   चौकीदार चोर है... या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सतत आरोप केला जात आहे. प्रामुख्याने कॉंग्रेसकडून आणि इतरही विरोधी पक्षांकडून देशभर या आरोपाचा गदारोळ उठविला जात आहे. त्याला उत्तर म्हणून भाजपाने मै भी चौकीदार... मोहीम काढली. तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी स्वत:ला चौकीदार घोषित केलं. हे सुरू असतानाच राहुल गांधीने आगीत तेल ओतलं! बिहारमधील एका सभेत ते म्हणाले- नरेन्द्र मोदी, नीरव मोदी, ललित मोदी... सब मोदी चोर कैसे? मोदी ..

निवडणुकीत ढोल-ताशा पथकांना मोठी मागणी

मराठी सणासुदीला किंवा गणेशोत्सवात तुम्ही ढोल-ताशांचा गजर ऐकला असेल, पण आता निवडणुकीतही ढोल-ताशांचा वापर उमेदवारांकडून होताना दिसत आहे. लोकसभा निवडणूक प्रचारात ढोल-ताशे निनादत आहेत. उमेदवारांना प्रचार आणि शक्तिप्रदर्शनासाठी ढोल-ताशांचं पथक प्रभावीपणे भूमिका पार पाडत असल्याचं चित्र आहे.   यापूर्वी गणेशोत्सव, नवरात्र, गुढीपाडवा सणाला शोभायात्रेत ढोल-ताशांचा आवाज निनादत असे. पण आता लोकशाहीच्या उत्सवातही या कला पथकांना आमंत्रण मिळत आहे. यातून तरुणांना चांगले पैसेही मिळत आहेत. उमेदवाराच्या ..

प्रीतम मुंडेंच्या पाठिशी छत्रपती संभाजीराजे

स्व. गोपीनाथ मुंडे यांनी माझ्या मुलींकडे लक्ष द्या अस सांगितलं होतं. त्यामुळे मुंडेंवरील प्रेमापोटी मी आज प्रीतम मुंडे यांच्या भेटीसाठी आलो आहे. मी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. बीड लोकसभा निवडणुकीत परळी इथे छत्रपती संभाजीराजे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपण भाजपाचे सहयोगी सदस्य आहोत. मोदींच पंतप्रधान होतील असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.  ‘गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाआधी ..

निवडणूक काळात अंमली पदार्थ व दारुचा महापूर

निवडणुका आल्या की मोठ्या प्रमाणात पैसा हा चलनात येतो. त्यात लोकसभा निवडणुका म्हटल्या की ओतल्या जाणारा पैसा हा कित्येक कोटींच्या घरात असतो. निवडणुकीदरम्यान जशी दारूची विक्री वाढते तसाच त्याचा परिणाम हा अमलीपदार्थांच्या विक्रीवरदेखील पडतो. यावेळी निवडणुकीतच अमलीपदार्थांची विक्री ५०-६० टक्क्यांनी वाढली आहे.   निवडणुकीची घेषणा होताच आचारसंहिता लागते. प्रत्येक उमेदवाराने प्रचारात किती पैसे खर्च करायचे, कितीच्या जाहिराती द्यायच्या, पक्षाने किती खर्च करायचे, या सगळ्याचे नियम असतात. पण नियमांना ..

पोपटाची कानात कुजबुज

सर्वांच्या मागून आलेला पोपट राजाच्या कानात मिठू मिठू बोलत आहे, त्यामुळेच मला पक्षातून बाहेर पडावं लागले, अशा शब्दात भाजप आमदार सुरेश धस यांनी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. बीडमधील भाजपच्या सभेत सुरेश धस यांनी नेहमीच्या शैलीत भाषण करत सर्वांनाच पोट धरून हसायला लावलं. सुरेश धस यांनी राष्ट्रवादी आणि पक्षातील नेत्यांवर टीका करताना पशु-पक्ष्यांचा छंद असलेल्या राजाची गोष्ट सांगितली. सर्वात शेवटी आलेला पोपट राजाच्या कानात मिठू-मिठू बोलत असून त्यामुळेच आपल्याला ..

कृष्णाच्या मथुरा नगरीत कोण मारणार बाजी?

मथुरा लोकसभा मतदारसंघात भाजपाने चित्रपट अभिनेत्री हेमामालिनी यांना दुसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत हेमामालिनी या मतदारसंघातून विजयी झाल्या. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात हेमामालिनी शेतातील गव्हाच्या ओंब्या कापत असल्याचे तसेच ट्रॅक्टरवर बसल्याचे चित्र चांगलेच गाजले होते. त्यावरून हेमामालिनी यांची टिंगटवाळीही करण्यात आली होती. त्यामुळे शोलेतील बसंतीच्या मदतीसाठी वीरूला धावावे लागले. आपल्या पत्नीच्या प्रचाराला आलेले चित्रपट अभिनेते धर्मेद्र यांनी आपला परिवार सुरुवातीपा..

बिहारमध्ये बंडखोरीने सारेच पक्ष हैराण

  बिहारमध्ये भाजपा-जदयु युती तर कॉंग्रेस-राजद यांच्यात युती झाली आहे. पण, बंडखोरीने या सर्वच पक्षांना अक्षरश: हैराण करून सोडले आहे.10 जागी आधीच बंडखोरी झाली असताना, आता यात नवी भर पडली आहे, ती कॉंग्रेसचे अ. भा. प्रवक्ते शकील अहमद यांची. शकील अहमद यांना मधुबनीतून तिकिट न देता ही जागा विकासशील इंसान पार्टीला दिल्यामुळे ते नाराज झाले आहेत. अहमद यांचे म्हणणे आहे की, मधुबनीत विईपा भाजपा-जदयु युतीला टक्कर देऊ शकणार नाही. त्यामुळे मी अ. भा. प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला ..

अखेर निजामाबादमध्येही झाले इव्हीएमनेच मतदान

तेलंगणातील निजामाबाद लोकसभा मतदारसंघात अखेर इव्हीएम यंत्राद्वारेच मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. हा मतदारसंघ देशातील सर्वाधिक चर्चेत त्या वेळी आला होता, जेव्हा अंतिम दिवशी एकूण 185 उमेदवार मैदानातच होते. त्यामुळे येथे मतदान मतपेटीतून घ्यायचे की, ईव्हीएम यंत्रांद्वारे असा बिकट प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला होता. एके क्षणी तर मतपत्रिकांद्वारेच मतदान घेण्याचा प्राथमिक निर्णयही घेण्यात येऊन, त्यासाठी लागणार्‍या मतपेट्यांची व्यवस्थाही करण्यात येणार होती. पण, तेवढ्या मतपेट्याच ..

हर्षवर्धन जाधव-अब्दुल सत्तार युती

  औरंगाबादचे कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आणि शिवसेना बंडखोर हर्षवर्धन जाधव यांना पािंठबा जाहीर केला आहे. हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन सत्तार यांनी पािंठबा घोषित केला.यापूर्वीही हर्षवर्धन जाधव यांना शांतिगिरी महाराजांनी पािंठबा दिला आहे. शांतीगिरी महाराज हे औरंगाबाद जिल्ह्यातील िंहदू धर्मीयांचं मोठं शक्तीस्थान मानलं जातं. सत्तार आणि शांतिगिरी महाराजांच्या पािंठब्यामुळे हर्षवर्धन जाधव ..

किंगमेकरची भूमिका चंद्रशेखर राव बजावणार का?

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून दुसर्‍यांदा शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांना राष्ट्रीय राजकारणात िंकगमेकरची भूमिका पार पाडण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. या स्वप्नासोबत िंकग होण्याचे अतिरिक्त स्वप्नही चंद्रशेखर राव एआयएमआयएमचे नेते असदुद्दिन ओवैसी यांच्या सौजन्याने पाहू लागले आहेत.   तेलंगणा राज्य निर्मितीसाठी चंद्रशेखर राव यांनी दिलेला आक्रमक लढा अभूतपूर्व असा म्हणावा लागेल. त्याचीच परिणती म्हणून तेव्हाच्या संपुआ सरकारला आंध्रप्रदेशचे विभाजन करून नव्या तेलंगणा ..

बजरंग अली !

निवडणुकीत धर्म, जात, पंथ आदींचा वापर करू नये, असे आचारसंहितेत कितीही सांंगितले जात असले तरी, कोणताही पक्ष, नेता याला जुमानताना दिसत नाही. काही लोक थेट जातधर्माची नावे घेतात, तर काही अप्रत्यक्षपणे, आडूनआडून तीच गोष्ट करतात. एकमेकाला नावे ठेवत सारेच एकसारखे वागतात! आपल्या लोकशाहीचे दुर्दैव हेच आहे.   निवडणुकीनंतरच्या साडेचार वर्षांमध्ये फारसा गाजावाजा न होणारे जातधर्म निवडणुकीच्या तोंडावर एकदम उफाळून येतात. जातधर्मांचे मुखंड, तसेच राजकीय पक्षांचे नेते जातीय समीकरणे मांडू लागतात. कोणता ..

पोहण्याचा मोह होतो तेव्हा...

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार करण्यासाठी खासदार संभाजीराजे दोन दिवसाच्या चांदगड तालुक्यात दौर्‍यावर होते. प्रचारादरम्यान धलगरवाडी येथे रस्त्याकडेला असलेल्या नदीत पोहणारी मुले दिसली आणि संभाजी राजेंना नदीत पोहण्याचा मोह आवरता आला नाही.   खासदार संभाजी राजेंनी गाडी थांबवत कसलाही विचार न करता पाण्यात सूर मारला. सुरक्षा रक्षक मनाई करत असतानाही राजेंनी पाण्यात सूर मारला. खुद्द राजांना आपल्यामध्ये पाहून नदीत पोहत असलेल्या तरुणांनासुद्धा भरपूर आनंद ..

संजय राऊत यांचे बेताल वक्तव्य

लोकसभा निवडणुकामुळे राजकीय पक्षांच्या प्रचार तोफा धडाडत आहेत. त्यातच, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना, अनेकदा नेत्यांचा तोल घसरतो. विवादास्पद विधाने आणि राजकारणासाठी भाषेची सीमारेषा ओलांडली जात आहे. आता, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिलं आहे. ‘भाड मे गया कानून और भाड में गयी आचारसंहिता’, असे वादग्रस्त विधान राऊत यांनी केलं आहे.   मुंबईमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचा तोल गेला. कायदे आमच्यासाठी बनवण्यात ..

ऊर्मिलाच्या प्रचारात मोदी, मोदीचे नारे

एकीकडे भाजपाच्या महिला उमेदवारांना अश्लील टिपण्णीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कार्यकर्त्यांच्या अश्लील नाचाचा सामना करावा लागला आहे. यावर मातोंडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस संरक्षणाचीही मागणी केली आहे. या हुल्लडबाजींमध्ये एक महिला प्रवासी पडल्याने जखमी झाली आहे.   बोरिवलीमध्ये सोमवारी सकाळी हा घाणेरडा प्रकार घडला. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला ..

कश्मीर हमारा है...

 शुभ बोल रे...  विनोद देशमुख9850587622    या नावाचा एक खेळ आम्ही लहानपणी संघाच्या शाखेत खेळत असू. मैदानात जमिनीवर अखंड भारताचा मोठा नकाशा काढायचा. भारत आणि पाकिस्तान असे दोन गट करायचे. त्या नकाशावरच दंडयुद्ध वगैरे होऊन शेवटी काश्मीर भागावर भगवा झेंडा फडकवायचा आणि सर्वांनी एकसुरात नारा द्यायचा- काश्मीर हमारा है...!   हा बाल-तरुण मुलांचा एक खेळ असला तरी त्यातून राष्ट्रप्रेमाचे प्रशिक्षण दिले जात होते, ही गोष्ट संघाचे आंधळे विरोधक तरी अमान्य करू शकतात ..

विरोधकांचा विस्तारित अजेंडा

 ही तो रश्रींची इच्छा!  र. श्री. फडनाईक    हरीपूरच्या हर्‍याने, हरप्रयत्नाने मिळविलेली चपराशाची नोकरी सुटल्यानंतर, कुठे काहीच न जमल्याने राजकारण जवळ केले! तो त्याच्या गल्लीतला लीडर झाला! राजकारणाचा त्याचा अभ्यास मात्र दांडगा! राजकीय भाकीत करण्यात त्याचा हात, या क्षेत्रातले जाणते राजे सुद्धा धरू शकत नाहीत. त्यामुळे हर्‍याने हल्ली केलेले भाकीत हसण्यावर नेण्यासारखे नाही; त्याची दखल गांभीर्यानेच घ्यावी लागेल!   हर्‍या म्हणाला : गेल्या पाच ..

फेक न्यूजच्या नियंत्रणासाठी सायबर सुरक्षा

  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर केला जाणारा प्रचार सर्वांत आघाडीवर आहे. प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून विरोधकांविरुद्ध फेक न्यूज व खोडसाळ घटना पसरविल्या जात आहेत. अशा बातम्यांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभागाने पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियाच्या प्रचाराबाबत जागृतीसाठी सायबर पोलिसांनी सायबर सुरक्षा ही मार्गदर्शक पुस्तिका बनविली आहे.   या पुस्तिकेत निवडणूकविषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ईमेल्स, सोशल मीडियाचा ..

सेना-भाजपाचा वाद पती-पत्नीसारखा

  शिवसेना-भाजपमधील भांडण हे नवरा-बायकोसारखं आहे. नवरी आता स्वतःच माझ्याकडे नांदायला आली आहे, अशा कोपरखळ्या पालघरच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी मारल्या. वनगा यांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ‘काही कारणास्तव रागवून बाहेर राहिलो, मात्र आता बायकोच आपणहून नवर्‍याकडे आली आहे. म्हणून मीच सांगितलं, बाबा आता तूच संसार कर.’ असं श्रीनिवास वनगा म्हणाले. पालघर जिल्ह्यातील तलासरीमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात श्रीनिवास वनगा बोलत ..

खासदार आणि त्यांचे सहकारी, कर्मचारी : एक वस्तुस्थिती

दत्तात्रय आंबुलकर  जनप्रतिनिधी म्हणून खासदारांना सहकारी-कर्मचारी नेमण्याची तरतूद असते. मात्र अशा प्रकारे खासदार म्हणून आपले सहकारी-कर्मचारी नेतमताना सध्याच्या म्हणजेच 15 व्या लोकसभेतील तब्बल 146 खासदारांनी आपल्या पत्नीसह विभिन्न नातेवाईकांचीच नेमणूक केल्याची लक्षणीय बाब उजेडात आली असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे- महिती अधिकारांतगत उपलब्ध माहितीनुसार सध्याच्या 146 खासदारांपैकी लोकसभेच्या 104 तर राज्यसभेच्या 42 सदस्यांनी मिळून त्यांच्या 191 नातेवाईकांची नेमणूक त्यांच्या वैयक्तिक कार्यालयीन ..

सातारा: उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील सामना

रात्री घरी जाताना एक खडू घेऊन जा आणि आपल्या घरातल्या भिंतीवर धनुष्यबाणाचे चिन्ह काढा आणि त्याच्याखाली लिहा ‘उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच’ मग बघा कशी एनर्जी येते असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. भिंतीवर पुसल्या जाणार्‍या खडूने ‘उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणारच’ असं लिहायचं आणि रोज घरातून बाहेर पडताना भाजप आणि शिवसेनेचा बॅच खिशाला लावूनच घराबाहेर पडायचं, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी खास उपाय ..

एमआयएमची महाराष्ट्र, तेलंगणा, बिहारकडे धाव

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात तेलंगणासह देशात २० राज्यांमधील ९१ लोकसभा मतदारसंघात मतदान गुरुवारी संपले. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा हैदराबादमधून मैदानात आहेत. या जागेवरून त्यांनी २००४, २००९ आणि २०१४ मध्ये निवडणूक जिंकली आहे.  ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मतदानानंतर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, यावेळी एमआयएम तेलंगणासह बाहेर देखील आपला डंका वाजवणार आहे. आमचा पक्ष ..

लोकशाहीविषयी कळकळ व्यक्त करा आणि युरोप दौर्‍यावर जा!

सोखासदार आणि त्यांचे सहकारी, कर्मचारी : एक वस्तुस्थितीशल मीडियातून, जाहीर भाषणांमधून लोकशाही बद्दलची कळकळ व्यक्त करणार्‍या, मतदानाबद्दलची आस्था मांडणार्‍या माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची लोकशाहीबद्दलची तळमळ पोकळ असल्याचे दिसून आले आहे. तरुणांनी मतदान करावे, यासाठी अथकपणे भाषणे ठोकणार्‍या देशमुखांचे शब्द म्हणजे केवळ बापुडा वारा असावा, असे त्यांच्या ताज्या फेसबुक पोस्टवरून स्पष्ट झाले आहे. या तोंडपाटीलकी विरुद्ध नेटीझन्सनी देशमुखांना झोडपून काढले आहे. राजा तू चुकत ..

राजकारण्यांसाठी निवृत्तीची वयोमर्यादा असावी काय?

श्यामकांत जहागीरदार   लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरलीमनोहर जोशी, लोकसभेच्या अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन यांच्यासह 15 नेत्यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यामुळे राजकारण्यांसाठी निवृत्तीची वयोमर्यादा असावी काय, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सर्व नेत्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी नव्वदी पार केली तर डॉ. मुरलीमनोहर जोशी 85 च्या घरात आहे.  राजकारण सोडले तर अन्य सर्व क्षेत्रात निवृत्ती आहेच. मग ते क्षेत्र खाजगी असो की सरकारी. सरकारी खात्यात तुम्ही कितीही मोठ्या ..

खर्‍या कार्यकर्त्याचे घडले दर्शन!

   भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या युतीने दिलेला जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार बदलणार या गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या आणि सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल झालेल्या चर्चेला गुरुवारी सकाळी चाळीसगावचे आ. उन्मेष पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पूर्णविराम मिळाला. या निमित्ताने नेते, कार्यकर्ते आणि कार्यकर्ते-नेते या वृत्ती-प्रवृत्तीतील फरकही ठसठशीतपणे दिसून आला.    महायुतीने निर्णय घेऊन प्रारंभी आ. स्मिताताई वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी ..

अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची बाजू

  भाजपकडून राज ठाकरेंवर टीका होत असताना आता अजित पवारच राज ठाकरेंच्या बाजूनं मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, त्यांना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नसल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं.मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा भाजपकडून भाषण करत होते त्यावेळेस भाजपाच्या नेत्यांना आतुन उकळ्या फुटत होत्या. बरं वाटत होतं. पण आता त्यांच्या विरोधात राज ठाकरे भाषण करायला लागले की विनोद तावडे पोपटासारखे बोलायला लागले. त्यांच्यावर टीका टिप्पणी करायला लागले असल्याचे अजित पवार म्हणाले. &..

ऊर्मिला मातोंडकरची संपत्ती व शिक्षण किती?

 प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर लोकसभेच्या रिंगणात कॉंग्रेसच्या तिकीटावर आपलं नशीब आजमावणार आहे. 48 वर्षीय उर्मिलाने सोमवारी वांद्राच्या कलेक्टर ऑफिसमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रतिज्ञापत्रात उर्मिलाने आपली संपत्ती, शिक्षण, गुन्हेविषयक माहिती जाहीर केली आहे.   ऊर्मिला मातोंडकरची जंगम मालमत्ता 41 कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये शेअर्स, बॉंड, म्युचुअल फंड (28.28 कोटी) यांचा समावेश आहे. याशिवाय उर्मिलाकडे एक मर्सिडीज कारही आहे.उर्मिलाच्या स्थावर मालमत्तेमध्ये वांद्रे ..

राहुल गांधी वायनाडमधून लढल्यास भाजपाला फायदा?

  कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता अमेठीसह केरळमधील वायनाडमधून देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यावर आता डाव्यांनी आपली नाराजी व्यक्त करत राहुल गांधी यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. कॉंग्रेसला उभारी देण्यास दक्षिण भारतानं मोठा हातभार लावला आहे असं इतिहासामध्ये पाहिल्यानंतर दिसून येतं. पण, आता कॉंग्रेसच्या फायद्याऐवजी राहुल गांधी यांच्या या निर्णयाचा भाजपला फायदा होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणं देखील तशीच आहेत. दक्षिण भारतामध्ये लोकसभेच्या 130 जागा येतात. राहुल ..

अब्दुल सत्तारांचं बंड झाले थंड!

  औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. तसंच त्यानंतर त्यांनी आपण अपक्ष लढणार असल्याचंही जाहीर केलं होतं. पण आता अब्दुल सत्तार यांचं बंड शांत झालं असून ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये घरवापसी करतील, अशी माहिती आहे. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देत लोकसभा निवडणूक अपक्ष लढवणार असल्याची भूमिका घेतली होती. पण त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. सत्तार यांनी गिरीश महाजनांसह थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ..

छत्रपती शिवरायांचे गुण माझ्यामध्ये आयुष्यभर राहावेत : उदयनराजे भोसले

   मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, माझ्या लोकांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवरायांचे हेच गुण आयुष्यभर माझ्यामध्ये आहेत आणि ते आयुष्यभर राहावेत, अशी इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.     उदयनराजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते, त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. मागच्या जन्मी माझ्याकडून थोडं पुण्याचं काम घडलं असेल, म्हणून मी एवढ्या मोठ्या ..

मोदी तसे चांगले नेते -पवार

    राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तसे चांगले आहेत पण निवडणुकी दरम्यान ते उन्माद दाखवतात असे पवार म्हणाले. व्यक्तीगत हल्ला आणि आरोपांपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ही जबाबदारी पंतप्रधान मोदींनी घेतल्याचा टोलाही त्यांनी लगावला. कोणावरही व्यक्तीगत हल्ला करु नका असे त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटले. अहमदनगरमधील शेगावमधील एका प्रचार सभेत ते बोलत होते.    आपल्या ..

कोण हा वाड्रा?

कॉंग्रेसच्या राणीमांचे जावई, राजपुत्राचे मेव्हणे, राजकन्येचे पती दामाद-ए-हिन्द रॉबर्ट वाड्रा अखेर राजकारणात नाक खुपसते झाले! लालकृष्ण अडवाणी यांना तिकीट नाकारून भाजपाने चांगले नाही केले. ज्येष्ठ मार्गदर्शकाचा मानसन्मान राखायलाच हवा, असा न मागितलेला सल्ला त्यांनी भाजपाला देऊन टाकला. याबद्दल भाजपाच्या तमाम ज्येष्ठश्रेष्ठ नेत्यांनी जावईबापूंचे जाहीर आभार मानले पाहिजे. गेली सहा दशकं पक्ष चालवूनही त्यांना जे कळले नाही, ते वाड्रा नावाच्या नव्या पोराने त्यांना सांगितले; नव्हे सुनावले!   वाड्राच्या ..

मी केवळ सिग्नल देत होतो : पवार

माढ्याची जागा सुरुवातीपासून आमच्याकडे आहे. ही जागा आणण्यासाठी अधिक काळजी घ्यावी म्हणून मी केवळ तिथून निवडणूक लढवणार असे सिग्नल देत होतो. मात्र मी तिथून लढणार नव्हतो. तसा माझा विचार नव्हता. आम्हाला विजयिंसह मोहितेंना तिथून लढवायचं होतं. मात्र त्या मतदारसंघात बाकीच्या 5 विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाला विरोध होता. मात्र इथला उमेदवार हा त्यांच्या सहकार्याने दिला असता, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. या सर्व घडामोडींचे विश्लेषण करीत असतानाच, कॉंग्रेसचा जनाधार कमी होत आहे, ..

एकीकडे जर-तर, दुसरीकडे इतिहास!

परवा एका मोठ्ठ्या (म्हणजे प्रचंड) नेत्याचे भाषण झाले. कुठे झाले हे महत्त्वाचे नाही. झाले म्हणजे झाले! झाले गेले विसरून जा, या श्रेणीतले नव्हते बरे ते! वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी, त्यांच्या पद्धतीने त्याचा वृत्तांत दिला. कोणाच्या मते भाषण घणाघाती होते, तर आणखी कोणाच्या मते, ज्याची कातडी फाटली आहे अशा ढोलकीतून निघणार्‍या ‘संगीता’सारखे ते होते! काहींच्या मते भाषणाला अलोट गर्दी होती, तर काहींच्या निरीक्षणानुसार गर्दी फक्त स्टेजवरच झाली, मैदान बरेचसे रिकामे होते! कोणाला भाषण मुद्देसूद जाणवले, ..

माझ्याकडे 1.67 लाख कोटी रुपये -मोहन राज

- स्विस बँकेत खाते, वर्ल्ड बँकेचे 4 लाख कोटी कर्जनिवडणूक कोणतीही असो, हवशे-नवशे-गवशे आपण पाहिले आहेत. निवडणूक हा तसा पाहिल्यास पैशाचा खेळ. अनेक उमेदवारांजवळ अगदी दीडशे कोटींची अधिकृत संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक लढताना कबूल केले आहे. पण, तुम्ही असा एखादा अपक्ष उमेदवार पाहिला का, जो म्हणतो, माझ्याजवळ 1 लाख 67 हजार कोटी रुपये नगदी आहेत म्हणून...या उमेदवाराचे नाव जे. मोहन राज. त्याने तामिळनाडूतील पेरुंबुदूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक अर्ज दाखल करताना आपली एवढी संपत्ती जाहीर केली आहे. शिवाय ..

‘न्याय’ योजना ही गरिबांची शुद्ध फसवणूक

कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकताच आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात पाच कोटी कुटुंबांना दर महिना 6 हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या पत्रपरिषदेला विख्यात अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहिंसग हेही उपस्थित होते.   इथपर्यंत ठीक. पण, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या योजनेची अंमलबजावणी कशी करणार? लाभार्थी कोण असणार? त्यांच्यापर्यंत पैसा कसा पोहोचणार? एवढा प्रचंड पैसा कसा उभा करणार? या प्रश्नांची ठोस उत्तरे ना राहुल गांधींनी दिली ना दिवट्या ..

रामपूर सोडण्याची इच्छा नव्हती : जयाप्रदा

उत्तरप्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. उमेदवारी अर्जासोबतच पक्षाच्या उमेदवारांचे एकमेकांवर शाब्दिक हल्लेही सुरू झालेत. महागठबंधनचे उमेदवार आझम खान यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर भाजप उमेदवार जयाप्रदा यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर एकेकाळच्या गाजलेल्या अभिनेत्री आणि सध्याच्या भाजपच्या उमेदवार जयाप्रदा यांनी एका जाहीर सभेत भाषणही केलं. यावेळी, जुन्या आठवणींनी त्यांना भावूक केलं... इतकंच नाही तर त्यांना आपले अश्रूही आवरणं ..

संभाजी ब्रिगेड 9 जागा लढवणार

संभाजी ब्रिगेडने येत्या लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. माढा, भिवंडी, जालना, उस्मानाबाद, रावेर, पुणे, सोलापूर मतदारसंघात संभाजी ब्रिगेड निवडणूक लढवणार आहे. इतर ठिकाणी युती व आघाडीचे उमेदवार सोडून इतर सेक्युलर उमेदवारांना पािंठबा देणार असल्याचं संभाजी ब्रिगेडने सांगितले.   ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे उमेदवार नसतील, त्या ठिकाणी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना वगळता इतर उमेदवारांना सहकार्य करणार आहे. चार प्रस्थापित पक्षांनी आलटून- पालटून सत्ता उपभोगली आहे, मात्र सर्वसामान्या..

दक्षिणायन...

अयन म्हणजे जाणे; पुढे सरकणे. दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत जातो, त्याला उत्तरायण म्हणतात. हाच सूर्य 21 जूनला कर्क संक्रांतीला कर्क राशीत प्रवेश करून दक्षिणायनाला सुरुवात. सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी 3 एप्रिलपर्यंत उत्तरायणात (उत्तर भारतात) होते. 4 एप्रिलला ते दक्षिणायनात गेले! म्हणजे, दक्षिण भारताच्या केरळ राज्यातील वायनाड मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. आपण दक्षिण भारताचेही प्रतिनिधी आहोत, हे दाखवून देण्यासाठी त्यांचा हा खटाटोप ..

राजकारणातील तीन ‘प’

 द.वा.आंबुलकर    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन ‘प’चे प्राबल्य अवश्य आणि आवश्यक असते. हे तीन ‘प’ आहेत- प्रचार, प्रभाव व पैसा. यापैकी प्रचार आणि प्रभाव दृश्य असतात, तर ‘पैसा’ हा अदृश्य असूनही प्रसंगी सर्वात प्रभावी ठरतो. या ‘प’ची प्रभावळ पक्ष-प्रांतनिरपेक्ष स्वरूपात व खर्‍या अर्थाने ‘अखिल भारतीय’ असते, ही एक संसदीय सत्यस्थितीच म्हणावी लागेल.निवडणुकीसाठी आपल्याकडे निधिसंकलनाची ऐतिहासिक परंपरा असून ती आजही कायम ..

अनेक आजी-माजी मुख्यमंत्री पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत

 श्यामकांत जहागीरदार विरोधी पक्षांच्या महाआघाडीच्या पंतप्रधानपदाच्या दावेदारांमध्ये आणखी एकाची भर पडली आहे. विरोधी पक्षांच्या महाआघाडीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राकॉंचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बसपाच्या नेत्या मायावती यांच्यासोबत तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांचीही भर पडली आहे. चंद्रशेखर राव यांच्या पंतप्रधान पदाच्या दावेदारीला आपला पािंठबा राहणार असल्याचे प्रतिपादन ..

जनताच दाखवेल त्यांना जागा!

ही तो रश्रींची इच्छा! र. श्री. फडनाईक  गौतम गंभीरची ओळख सांगण्याची गरज नाही. चौफेर टोलेबाजीसाठी ख्यात असलेला हा क्रिकेटपटू एवढ्यातच भाजपामध्ये अधिकृतरीत्या दाखल झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नि:स्वार्थ आणि सक्षम नेतृत्वाने प्रभावित होऊन मी या पक्षात आलो आहे, असे त्याने पक्षात प्रवेश करताना सांगितले.उमर अब्दुल्ला यांची थोडक्यात ओळख अशी : ते नॅशनल कॉन्फरन्स या, जम्मू-काश्मीरशी सीमित असलेल्या पक्षाचे नेते आहेत व जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आहेत.    मीडियातील ..

रिपोर्ट कार्ड मूल्यांकनात राज्यातील खासदार अव्वल

एका एनजीओने देशातील खासदारांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार केले असून त्यानुसार लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये मुंबई दक्षिणचे खासदार अरिंवद सावंत (97.3 टक्के) मुंबई उत्तरचे खासदार गोपाळ शेट्टी (97.3 टक्के) प्रथम आहेत. तर द्वितीय क्रमांकावर लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचा (96.1 टक्के)आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुंबई दक्षिण मध्यचे खासदार राहुल शेवाळे या दोघांचा (95.8 टक्के) पहिल्या पाचात समावेश आहे.लोकसभेत सर्वाधिक चर्चामध्ये सहभाग घेणार्‍या ..

तिकीटवाटपात महिलांचे प्रमाण नगण्य

पुरुष नेत्यांना महिलांकडून असुरक्षिततेची भावना वाटत असल्याचे शायना एनसी आणि अन्य पक्षातीलही महिला पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीला काही दिवसच उरले असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे उमेदवारांची पळवापळवी सुरू असताना दुसरीकडे त्याच पक्षात निष्ठावंतांना डावलल्याचे प्रकार समोर येत आहेत. याच पार्श्र्वभूमीवर भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी हे मत व्यक्त केले आहे. सर्वच पक्षात महिला नेत्यांना डावललं जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वच पक्ष हे पुरुष प्रधान ..

टिमकी वाजवावीच लागेल!

देशातील इनेगिने विरोधक पार डबघाईला आले आहेत! स्वत:च्याच डबक्यात चाबकडुबक करीत आहेत! हे डबकं वाढविण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही! विरोध या नात्याने स्वत:ची जबाबदारी पार पाडण्याची कधी कोशीश केली नाही. त्याबाबत त्यांचे कसब केव्हाही स्पष्ट झाले नाही. ‘आडात नाही, तर पोहर्‍यात कुठून येणार?’ अशी मल्लिनाथी त्यावर करण्यास त्यांनी वाव ठेवला. नकारघंटा वाजविणे यालाच ते विरोध समजले! त्यामुळे त्यांचे डबके डबकेच राहिले! त्यात होते नव्हते ते पाणीही आता आटू लागले आहे; चिखल तेवढा राहिला आहे! ..

निवडणुकीत उमेदवारीसाठी सर्वपक्षीय आयाराम-गयाराम

सुजय विखे-पाटील - नगरमधील भाजपचे उमेदवार आहेत. सुजय विखे-पाटील यांच्या तीन पिढ्या कॉंग्रेसमध्ये होत्या, सुजयचे वडील आणि आजोबा शिवसेनेकडून राज्यात आणि केंद्रात मंत्रीही होते.   प्रताप पाटील चिखलीकर - नांदेडचे भाजपचे उमेदवार. मूळ कॉंग्रेसचे असलेले प्रताप पाटील चिखलीकरांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून ते लोहा-कंधार मतदारसंघातून आमदार आहेत. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांना आव्हान दिलं आहे.भारती पवार - िंदडोरीतील भाजपच्या उमेदवार. भारती ..

तेजप्रतापचे तेजस्वीविरुद्ध उघड बंड

बिहारमध्ये एकीकडे राजदला कॉंग्रेसच्या असंतोषाचा सामना करावा लागत असतानाच, आता लालू यादव यांच्या कुुटुंबातील भाऊबंदकी समोर आल्याने अख्खे यादव कुटुंबीय त्रासून गेले आहे. सध्या राजद चालवीत असलेले तेजस्वी यादव यांची डोकेदुखी तर तेजप्रतापने आणखीनच वाढविली आहे. वास्तविक पाहता, तेजप्रताप हा तेजस्वीपेक्षा मोठा भाऊ. पण, सारा कारभार तेजस्वीच्या हाती असल्याने तेजप्रताप हे खवळले आहेत. त्याचे कारण म्हणजे, त्याच्या पसंतीच्या एकाही उमेदवाराला जागा न देणे. त्यामुळे त्याने जाहीर बंड पुकारले आहे. लालू यादव यांचे ..

गुरूचे धनू व वृश्चिक राशीतील भ्रमण सत्ताधार्‍यांना यशाकडे नेणारे...

   ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य   दि. 11 ऑक्टोबर 2018 रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केलेला ‘गुरू’ ग्रह दि. 29 मार्च, शुक्रवार रोजी सायकाळी 7.08 वा. ‘धनू’ राशीत प्रवेशता झाला. याच दिवशी ‘बुध’ ग्रह मार्गी लागला असून शनी आणि केतू हेसुद्धा सध्या ‘धनू’ या गुरूच्याच राशीतून भ्रमण करीत आहेत. हे सर्व ग्रह सत्ताधारी पक्षास सत्ता राखण्यास अनुकूल आहेत, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.     2..

भाजपाकडून राज्यभरात एक हजार सभा

  पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, राज्याचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप राज्यात तब्बल एक हजार प्रचारसभा घेणार आहे. राज्यात 48 मतदारसंघांत भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका उडवून देणार आहे. राज्यात 4 टप्प्यात मतदान होतंय. आज वर्ध्यातील सभा आटोपली. पंतप्रधान राज्यात तब्बल 8 रॅली करणार आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल 75 सभांना संबोधित करणार आहेत. केंद्रातले भाजपचे जवळपास सर्व महत्त्वाचे नेते राज्यात सभांचा ..

अमेठीतील पराभवाच्या धास्तीनेराहुल गांधी वायनाडला गेले का?

बबन वाळके    कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी आपल्या परंपरागत अमेठी मतदारसंघासोबतच केरळमधील वायनाड येथून लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, तर्कवितर्कांना अक्षरश: उधाण आले आहे. अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती की, राहुल गांधी केरळ, कर्नाटक िंकवा तामिळनाडूतील एका जागेवरून निवडणूक लढणार आहेत. त्यात केरळच्या वायनाडचे नाव आघाडीवर होते. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राहुल गांधी यांनी असा निर्णय का घेतला असावा? अमेठीत ..

किलच्या कशाला पाडायच्या!

  ही तो रश्रींची इच्छा!  र. श्री. फडनाईक राजकारणातनं काही कारण नसताना नसते ते राज उघड केले जातात! लोकांना जे माहीत नाही, ते लोकांच्या हिताचे असो वा नसो, कामाचे असो वा नसो, त्याचे चवर्ण केले जाते. चूक आहे ते!आता हेच पाहा ना, इंडियन नॅशनल कॉंग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे; आहे ना! या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी आहेत; आहेत ना! ते उत्तर प्रदेशातील अमेठीतून उभे राहत आले आहेत, यावेळी सुद्धा ते तिथूनच ‘लढणार’ आहेत. याशिवाय ते केरळमधील वायनाड या मतदारसंघातूनही आपले नशीब ..

भ्रष्टाचाराविरोधात सदाचाराची लढाई : अनंत गिते

  ज्यांनी 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला, ज्यांनी शेतकर्‍यांच्या शेकडो एकर जमिनी कवडीमोल दराने विकत घेतल्या, बेनामी कंपन्या काढून मनी लॉन्ड्रींग केले आहे, असा खासदार रायगडचा नसावा. तो सदाचारी आणि निष्कलंक असावा, त्यामुळे भ्रष्टाचारी प्रवृत्तींना गाडण्यासाठी मी पुन्हा एकदा रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. ही लढाई भ्रष्टाचार विरुद्ध सदाचाराची असणार आहे, धुरंधर राजकारणाची पिलावळ रोखण्यासाठी पुन्हा एकदा साथ द्या असे आवाहन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते ..

भगदाडं बुजविण्याची मोहीम!

  ही तो रश्रींची इच्छा! र. श्री. फडनाईक शेवटी कॉंग्रेसवर ‘व्हिप’ काढण्याची पाळी आली. आता या निर्वाणीच्या आदेशालाही कोणी जुमानले नाही, तर त्याच्यावर कोणती सुप्रीम कारवाई करणार, याचा त्या पक्षाने तपशील दिला नसला, तरी अवज्ञा करणार्‍याच्या कानशिलात लगावण्यापर्यंत ही शिक्षा जाऊ शकते, असा कयास बांधायला जागा आहे; ‘स्पीच लँग्वेज’वरून तसेच दिसते!झाले काय, की कॉंग्रेसनेते जेव्हा गठ्ठ्यागठ्ठ्याने भाजपाच्या खेम्यात जाऊ लागले, तेव्हा त्याची दखल घेणे श्रेष्ठींना भाग पडले. ..

यादव कुटुंबातील भाऊबंदकी; तेजप्रतापची नौटंकी

 बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात उभी फुट पडली आहे. तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव या लालुप्रसादांच्या दोन मुलांममधील भाऊबंदकी चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे लालूप्रसादांचे तुरुंगातील जगणेही हराम झाले आहे.  लालूप्रसादांच्या कुटुंबात सध्या तेजप्रताप आणि मिसा भारती एकीकडे तर तेजस्वी यादव दुसरीकडे आहे, अशी विभागणी झाली आहे. राज्यसभेच्या सदस्य असलेल्या मिसा भारती तेजप्रतापची बाजू घेत असल्यामुळे राजदच्या स्टार प्रचारकांच्या पहिल्या यादीत मिसा भारती ..

शेंडी विंचरणे सुरू आहे!

      ही तो रश्रींची इच्छा! र. श्री. फडनाईकएवढ्यात तूप खूप महाग कसे झाले, याचा आम्ही शोध घेतला असता, कळले, की निवडणुका उंबरठ्यावर आल्या असल्याने तुपाचा खप वाढला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे! आम्ही गोंधळलो! या समीकरणाचा आम्हाला काही बोध होईना. शेवटी आमच्या एका राजकीय मित्राने आमचा मानसिक गुंता सोडविला. त्याने दिलेल्या स्पष्टीकरणावर आधारित आमचे हे भाष्य!त्याच्या मते, या निवडणुकीत सारे विरोधी पक्ष हिंदूंची शेंडी विंचरण्याच्या व त्यानंतर तिच्यावर तूप चोपडण्याच्या ..

‘नोटा’ची लोकप्रियता घातक

 लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ‘यापैकी एकही नाही’ म्हणजेच ‘नोटा’ या पर्यायाचा बरेच मतदार वापर करू शकतात, अशी साशंकता वर्तविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश विधानसभांच्या निवडणुकांमध्ये दोन प्रमुख पक्षांच्या खालोखाल मते ‘नोटा’ला मिळाली होती. त्यामुळे ‘नोटा’ची लोकप्रियता वाढत असल्याची भीती राजकीय निरीक्षकांना वाटू लागली आहे. विशेषत: ज्या राज्यांमध्ये दोन पक्षांमध्ये थेट लढत होते त्या राज्यांमध्ये, ..

मोदींच्या सभेची जय्यत तयारी

 राज्यातील प्रचाराचा नारळ वर्धेत फुटणार  पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा वर्धेत येत आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराचा नारळ वर्ध्यातच फोडला जाणार आहे.2014 ची लोकसभा निवडणूक 10 एप्रिल रोजी झाली होती. त्या निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा मोदी यांनी मार्च 2014 मध्ये ज्या मैदानावर केला होता, त्याच स्वावलंबी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी 1 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता विजय संकल्प रॅलीला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ..

अबब! निजामाबादमध्ये 185 मतदार रिंगणात!

 तेलंगणातील निझामाबाद लोकसभा मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या कालावधीनंतर तब्बल 185 उमेदवार रिंगणात उरल्याने निवडणूक आयोगापुढे मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पण, त्यातून मार्ग काढत येेथे आता कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यात येत आहे. येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे.    आता निझामाबाद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आयोगाने तातडीने दहा लाख मतपत्रिका छापण्याची ऑर्डर दिली आहे. तसेच मतपेट्या लगतच्या व अन्य राज्यांमधून मागविण्यात येत आहेत. या मतदारसंघाने मात्र ..

डॉ. मुरलीमनोहर जोशी यांंचा राजकीय प्रवास

   श्यामकांत जहागीरदार  लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरलीमनोहर जोशी यांना भाजपाने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने भाजपातील अडवाणी, डॉ. जोशी युगाचा अंत झाल्याची चर्चा सुरू झाली. मुळात अशी चर्चा अनाठायी आहे. निवडणुकीत उमेदवारी दिली नाही, म्हणून कोणाची राजकीय कारकीर्द संपत नाही. भाजपाच्या विस्तारातील अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरलीमनोहर जोशी यांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. या तीन तसेच अन्य अनेक नेत्यांच्या तसेच हजारोंच्या संख्येतील कार्यकर्त्यांच्या ..

बिहार : मतदारसंघ वाटप होऊनही कॉंग्रेसमध्ये असंतोष कायम

  देशात तर महागठबंधन झाले नाही. पण, बिहारमध्ये झाले. या महागठबंधनात कॉंग्रेसच्या वाट्याला फक्त नऊ जागा मिळाल्याने आणि वरिष्ठ नेत्यांनी त्या मान्य केल्यामुळे कॉंग्रेस पक्षात प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. हा असंतोष थांबविण्यासाठी शुक्रवारी राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मतदारसंघांची घोषणा केली. पण, या पत्रपरिषदेला कॉंग्रेसचा एकही मोठा नेता उपस्थित नव्हता. ज्या पाच जागांवरून वाद होता, तो तसाच कायम राहिला आहे. यामुळे बंडखोर उभे राहतीलच, अशी स्थिती सध्या आहे.      नालंदाची ..

बच्चे, मनके सच्चे!

  ही तो रश्रींची इच्छा! र. श्री. फडनाईक  परवा मेनका काकूंनी आपल्या पुतण्याला शेख चिल्लीची उपमा दिल्याचे मीडियाच्या वृत्तावरून कळले. याबाबत, आमचा मीडियावर आक्षेप आहे : हे लोक घरगुती बाबी कशाला जाहीर करतात हो! आता काकू आपल्या पुतण्याला काय म्हणते याचेशी लोकांना काय कर्तव्य! पण त्यांनी ती गोष्ट जाहीर केली! वृत्त कळल्यावर आम्ही, हा शेख चिल्ली कोण आणि त्याच्यात आणि या पुतण्यात काय साधर्म्य आहे, याचा शोध घेत बसलो. कळलं ते एवढंच, की हे एक काल्पनिक पात्र आहे, आणि हे पात्र आपल्या वरवरच्या ..

प्रत्येक निवडणूक लढविणार्‍या के. आर. गौरी

 दत्तात्रय आंबुलकर    केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या असणार्‍या के. आर. गौरी या 92 वर्षीय महिला कार्यकर्तीने 1957 पासून झालेल्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत उभे राहून प्रत्येक निवडणूक लढविण्याचा एक आगळा-वेगळा राजकीय विक्रम साधला आहे.के. आर. गौरी यांच्या राजकारणाच्या प्रवासातील विक्रमी सुरुवात पण तसे पाहता एका राजकीय विक्रमाने झाली. 1957 मध्ये केरळमध्ये प्रथमच आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आलेल्या गौरी ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या मंत्रिमंडळातील ..

गद्दारी न केल्यानेच कुणाला घाबरत नाही...

   चंद्रकांत पाटलांच्या धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं प्रत्युत्तर माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी दिलं आहे. संजय शिंदेंनी भाजपशी गद्दारी केली असून त्याची किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं होतं.आपण कधी भाजपमध्ये प्रवेशच केला नव्हता, त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही आणि आपण कोणाच्या धमकीला घाबरत नाही असे शिंदे म्हणाले. संजय शिंदे हे भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. रणजितिंसह मोहिते पाटलांनी ..

राजकीय पुढारी आणि त्यांचे आगळे-वेगळे छंद

     राजकीय पुढारी आणि त्यांचे व्यक्तीमत्त्व म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती त्यांची तद्दन राजकीय प्रतिमा! त्यांची भाषणे, राजकीय हालचाली इ. मात्र राजकारण्यांच्या या राजकीय जीवनापलिकडे त्यांच्या राजकीय जीवनात या पुढार्‍यांचे विविध छंद आणि आवडी-निवडी यांच्याशी संबंधित अशा आयामांची फारच थोड्या जणांना कल्पना असते.उदाहरणार्थ अटलजी त्यांच्या उमेदीच्या व धकाधकीच्या राजकीय व्यग्रतेत, पण त्यांनी आपला कवितेचा छंद मात्र अखेरपर्यंत जोपासला. त्यांच्या कविता राष्ट्रप्रेम, ..

महाराष्ट्रात 48 पैकी 37 जागा युतीला

 देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील मतदारांचा मूड आणि कौल यात केंद्रातील सत्ता स्थापनेत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघ प्रत्येक पक्षासाठी महत्वाचे आहेत. एबीपी न्यूज-नेल्सनने हा निवडणूकपूर्व अंदाज व्यक्त केला आहे.     विदर्भातही अन्य भागांसारखीच स्थिती आहे. ..

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी इव्हीएम वाटप पूर्ण

  लोकसभा निवडणुकीसाठी शहरासह जिल्ह्यात वापरण्यात येणार्‍या ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होिंटग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) यंत्रांचे पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चारही मतदारसंघांमध्ये वाटप करण्यात आले.    पहिल्या टप्प्यातील वाटप पूर्ण करण्यात आले असून, यानंतर प्रत्येक लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी दुसर्‍या टप्प्यात मतदान केंद्रनिहाय यंत्रांचे वाटप करणार आहेत. सकाळी 11 वाजता भोसरी येथील वखार महामंडळाच्या गोदामात यंत्रांची ..

स्मृती इराणी : अभिनेत्री ते राजकीय नेत्या

  श्यामकांत जहागीरदार9881717817   केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आणि कॉंग्रेसच्या महासचिव तसेच पूर्वी उत्तरप्रदेशच्या प्रभारी श्रीमती प्रियांका गांधी वढेरा यांच्यात शाब्दिक जुगलबंदी सुरू झाली आहे. दोघींनी एकदुसर्‍याचे नाव घेतले नसले तरी दोघींचाही रोख एकदुसर्‍याकडे असल्याचे जाणवते.     काही जण फक्त निवडणूक लढण्यासाठीच अमेठीत येतात, असे प्रियांका गांधी वढेरा यांनी म्हटले आहे, तर रामाचे अस्तित्व नाकारणारे आता रामभक्त बनण्याचे नाटक करत ..

निवडणूक काळात नऊ दिवस राहणार 'ड्राय डे'

  देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी मोठ्या जोरात सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपल्यापरीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी जाहीरनामे आणि आश्र्वासनांचा पाऊस पाडताना दिसत आहेत. असं असतानाच निवडणूक आयोगाने निवडणुकींची घोषणा केल्यापासून आचारसंहिता लागू झाली असल्याने अनेक निर्बंधही राजकीय पक्षांवर घालण्यात आले आहेत. सात टप्प्यांमध्ये देशभरात निवडणूक आचारसंहितेच्या नियमांनुसार वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या दिवशी दारू विक्रीची दुकाने असणार आहे. मतदानाच्या दिवशी प्रत्येक संबंधित शहरामध्ये दोन ..

भाजपमध्ये जाणार नाही, पण शुक्रवारी निर्णय जाहीर करणार : सत्तार

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असली तरी भाजपमध्ये जाण्याचा माझा कोणताही विचार नाही, असं सांगतानाच येत्या शुक्रवारी होणार्‍या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पुढील निर्णय घेण्यात येईल, असं कॉंग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी आज स्पष्ट केलं.   प्रसारमाध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आपले नेते आहेत. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही. मात्र येत्या 29 मार्च रोजी मेळावा आयोजित ..

विजयाची खात्री नसल्याने रामटेक मधून वासनिकांची माघार?

  विश्वंभर वाघमारे  ९४२२२१०५०६  कॉंग्रेस पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस असलेले मुकुल वासनिक यांनी रामटेक या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदार संघातून यावेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय का घेतला? त्यांनी घेतलेले या माघारी बद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून यावर बरेच तर्कवितर्क लढविण्यात येत आहे.     वस्तुतः लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर रामटेक मधून मुकुल वासनिकांचे नाव चर्चेत होते. उमेदवारी त्यांनाच मिळणार याबद्दल दुमत नव्हते. केवळ निवडणूक ..

कॉंग्रेस अर्धी लढाई आताच हारली

 आघाडी करण्यात राहुल अपयशी - राजकीय निरीक्षकांचे विश्लेषण  लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी आपापले दंड थोपटले आहेत. पण, या सर्व घडामोडीत कॉंग्रेस कुठे आहे? असा प्रश्न आता कॉंग्रेसमधूनच उपस्थित होऊ लागला आहे. तर, राजकीय भाष्यकारांनीही आलेली संधी राहुल गांधी यांनी गमावली, अशी टीका केली आहे. राजकीय निरीक्षकांनी असे विश्लेषण केले आहे की, कर्नाटकमध्ये जदएससोबत युती करून तेथे सत्तेत सहभागी झाल्यानंतर सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर आले होते. ती ..

राज, गोटे अन्‌ तोटे, दे ढील...

कल्पेश जोशी  राग, द्वेष, संताप आणि प्रतिशोध माणसाला कुठल्या थरापर्यंत घेऊन जाऊ शकतो, याचे उत्तर आजपर्यंत शब्दशः कोणत्याही महान तत्त्ववेत्त्याला माहीत झाले नव्हते. पण आज असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर बारामती असे आपण देऊ शकतो!राग, द्वेष किंवा प्रतिशोध घ्यायचा असेल आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला चीतपट करायचं असेल तर बारामतीला जा. बारामतीचे काका त्या बाबतीत सगळ्यांना आशादायी ठरू लागले आहेत (?). याबाबतीत अलीकडील अगदी दोन नवीन उदाहरणे देता येतील. एक म्हणजे महान व्यंगचित्रकार व ..

बुलढाण्यात ‘वंचित’मुळे दुसर्‍या नंबरसाठी ‘काटे की टक्कर’!

लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याअगोदर वंचित आघाडीने आपला उमेदवार घोषित केल्यामुळे दुसर्‍या नंबरसाठी काटे की टक्कर होणार अशीच चर्चा आहे.महाराष्ट्रातून सर्वात प्रथम वंचिताचा उमेदवार संतनगरी शेगावमधून जाहीर झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणाला वे..